AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांनी CJP चे आंदोलन मोडून काढले, लाठीमार करीत जंतर-मंतर रिकामे केले..

दिल्ली पोलिसांनी कॉक्रोज जनता पार्टीने संसदेकडे कूच केल्यानंतर हे आंदोलन लाठीमार आणि बळाचा वापरत करीत मोडून काढले. जंतर मंतर येथील सर्व आंदोलकांवर लाठीमार करुन पोलिसांनी CJP चे व्यासपीठ रिकामे केले आहे.

पोलिसांनी CJP चे आंदोलन मोडून काढले, लाठीमार करीत जंतर-मंतर रिकामे केले..
CJP PROTEST - courtesy : PTI
| Updated on: Jul 20, 2026 | 4:51 PM
Share

CJP निदर्शकांनी चलो संसद असा नारा देत संसदेकडे कूच केल्याने दिल्ली पोलिसांनी जोरदार लाठीमार करीत हे आंदोलन मोडून काढले आहे. काल रात्रीपासूनच दिल्लीच्या जंतरमंतर स्थळावर आंदोलकांनी डेरा घातला होता. मात्र, सकाळी भाजपाचे मंत्री जे.पी.नड्डा स्वत: आंदोलकाच्या शिष्टमंडळाशी बोलणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर कॉक्रोज जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसांचे उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतरही अचानक आंदोलकांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून हे आंदोलन मोडून काढले. जंतरमंतर येथेही लाठीमार करुन सर्व आंदोलनावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन ते रिकामे करण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी दिल्ली जिल्ह्यात काल रात्री पासूनच BNSS चे कलम १६६ लागू (आधीचे सीआरपीसी कलम 144 ) केले होते. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनासाठी कोणतीही परवानगी नव्हती. सकाळी आंदोलन स्थळाजवळ सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांनी सुरु केलेले उपोषण कायम होते. त्यानंतर दुपारी मंत्री जे.पी.नड्डा यांनी शिष्ठमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले होते. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसांचे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली.

दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी जंतरमंतर, पार्लेमेंट स्ट्रीट, सेंट्रल व्हीस्टा, कनॉट प्लेस आणि शंकर चौक स्थळावर थ्री-टियर सुरक्षा ग्रिड तयार करण्यात आले. यात दिल्ली पोलिस जवानांचे दोन घेरे आणि पॅरामिलिट्री फोर्सची एक घेरा याचा समावेश आहे. अशी तिहेरी सुरक्षा या ठिकाणी लागू करण्यात आली. कोणत्याही आपत्कालिन स्थितीचा निपटारा करण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीमची चोवीस तास स्टँडबाय ठेवण्यात आली. त्यानंतर नेते अभिजीत दीपके यांनी उपोषण मागे घेतले तरी संसदेच्या दिशेने मोर्चा निघाल्याने पोलिसांनी नंतर या भागातील इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद केली आणि नंतर लाठीमार सुरु करण्यात आला.

बॅरिकेट्स तोडून पुढे चाल सुरु केल्याने…लाठीमार

आंदोलकांनी संसदेकडे जाणारे बॅरिकेट्स तोडून पुढे चाल सुरु केल्याने संसदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांशी पोलिसांची झटापट झाली. यावेळी लाठीमार केल्याने पोलिसांवरही आंदोलकांनी दगडफेक केली, त्यामुळे वातावरण स्फोटक झाले आणि पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना उचलून व्हॅनमध्ये भरण्यास सुरुवात केली आणि जंतर मंतर आणि कॅनॉट प्लेसला रिकामे केले.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी