AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर…

दिल्लीतील जंतर मंतर येथे रविवारी रात्रीच आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे. दिल्ली पोलिसांनी संसदेकडे जाणाऱ्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून कलम १६३ लागू केले आहे.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर...
jantar -mantar, delhi
| Updated on: Jul 20, 2026 | 9:01 AM
Share

दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या जंतरमंतर येथून पोलिसांनी उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे उद्या २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा घोषीत केला आहेत. कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) निदर्शनांसाठी दिल्लीतील जंतरमंतर तरुणांची रात्रीच गर्दी जमली आहे.उष्णता आणि प्रचंड दमटपणा असूनही दिल्लीतील आंदोलन स्थळ तरुणांनी भरलेले आहे. उद्या सोमवारच्या संसदेवरील आंदोलनसाठी रविवारी रात्रीच लोक जमले असून ते रात्रभर येथेच थांबणार आहेत.

जंतरमंतरवर निदर्शकांनी झोपण्याच्या चादरीही सोबत आणल्या आहेत. लोकांनी पोस्टर्स, बॅनर्स आणि झोपण्याच्या चादरी आणल्या आहेत. दरम्यान, सीजेपीच्या प्रस्तावित ‘चलो संसद’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नवी दिल्लीत सुरक्षा वाढवली आहे. दिल्ली पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पोलिसांकडून कसून तपासणी केल्यानंतरच आंदोलनस्थळी प्रवेश दिला जाणार आहे.

दिल्ली पोलिसांचे निवेदन:

कोणत्याही निषेध मोर्चा किंवा मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी मागितलेली नाही किंवा दिलेली नाही असे पोलीस उपआयुक्त (डीसीपी) सचिन शर्मा यांनी रविवारी एक सार्वजनिक निवेदन जारी करीत म्हटले आहे. त्यात ते म्हणतात की, नवी दिल्ली जिल्ह्यात बीएनएसएसच्या कलम १६३ (पूर्वीचे सीआरपीसीचे कलम १४४) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

आंदोलन स्थळ वगळता मिरवणुकांवर बंदी

जंतर मंतर येथील आंदोलन स्थळ वगळता मोर्चे, मिरवणुका आणि निदर्शनांवर कठोरपणे बंदी घातलेली आहे. यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. डीसीपींनी इशारा दिला आहे की, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर बीएनएसएसच्या कलम २२३ आणि इतर कायद्यांनुसार कारवाई केली जाऊ शकते असेही दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मोर्चाला परवानगी नाहीच…

दिल्ली पोलिसांनी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. बॅरिकेड्स उभारले आहेत. वाहनांची तपासणी वाढवली आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, प्रस्तावित मोर्चासाठी सीजेपींना परवानगी देण्यात आलेली नाही. आम्ही उच्च सुरक्षा क्षेत्रात कोणत्याही बेकायदेशीर मोर्चाला परवानगी देणार नाही. संसदेच्या अधिवेशनादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त कायम राहील. याशिवाय,कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...