
राजकारणात मतभेद आणि मतभिन्नता असते, परंतू व्यक्तिगत सलोखा कधी विसरु द्यायचा नसतो असे विचार राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज नवी दिल्ली येथे मांडले. दैनिक ‘सामना’चे दिल्ली ब्युरो चीफ पत्रकार नीलेशकुमार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ आठवणींचा कर्तव्य पथ’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणले की स्वातंत्र्याआधी आणि नंतरचा काळ याचा उल्लेख आणि इतिहासाचा मोठा ठेवा या पुस्तकात मांडला आहे. ही संसदेची इमारतीत अनेक इतिहासाची साक्षीदार आहे. जुन्या संसदेचे बांधकाम आर्टीस्ट एडविन लुट्येन्स यांनी केले होते. आजही हीअंत:करणात ठसलेली ही वास्तू आहे. नवीन वास्तू आली. तरी जुनी वास्तू हिच आपली वाटते असेही ते यावेळी म्हणाले.
युवक काँग्रेस संघटनेत काम केले होते. त्यावेळी राष्ट्रीय समितीच्या मार्गदर्शक इंदिरा गांधी होत्या. दिल्लीत अधिवेशन ठेवले होते. पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी या बैठकीला येणार होते. आम्ही औत्सुक्याने या बैठकीला गेलो. अनेक राज्याचे नेते होते. आम्ही कोणते मुद्दे मांडयचे, मी कसे बोलायचे, या सगळ्यांची तयारी करत होतो. त्या बैठकीला आयु्ष्यात पहिल्यांदा नेहरुंना जवळून पाहीले. तीस लोकांच्या बैठकीत पंडित नेहरुंसमोर आम्ही बसलो होतो. त्यावेळी त्यांना हे प्रश्न विचारायचे आम्ही विसरुन गेलो. त्या इराद्याने आम्ही गेलो पण, त्यांना बघतच बसलो. त्याचं व्यक्तीमत्वं इतक्या उंचीचे होते की आम्ही प्रश्न विचारायला विसरलो होतो असा किस्सा यावेळी शरद पवार यांनी भाषणात सांगितला.
संसदेच्या इतिहासाची अनोखी परंपरा आहे. डॉ. बाबासाहेब नेहरुच्या मंत्रीमंडळात होते. बाबासाहेबांचे नाव घेतले की आपल्याला संविधान आठवते. पण या देशाची आर्थिक उन्नती करण्यासाठी आंबेडकर यांनी महत्वाचे निर्णय घेतले. शेती संपन्न करण्यासाठी धरणे बांधली पाहीजे हा विचार त्यांनी मांडला. भाक्रांनांगलसारखी धरणे उभी राहीली. बाबासाहेब कामगार मंत्री म्हणून कायदे केले. संसदेत बॅरिस्टर नाथ पै, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस,चंद्रशेखर मधु दंडवते यांच्या सारखे महाराष्ट्रातील मातब्बर संसदपटू पाहीले. एकदा पंडीत नेहरु सभागृहातून बाहेर निघाले होते आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाचा पुकारा झाला. तेव्हा पंडित नेहरु पुन्हा परत आले आणि त्यांचे भाषण ऐकले असा किस्सा सांगत पवार यांनी या लोकांनी संसदेला प्रतिष्ठा दिल्याचे सांगितले.
दिल्लीची अनेक वैशिष्ट्ये संजय राऊत यांनी सांगितली आहेत. अनेक लोकांनी श्रेष्ठत्व आणि कतृत्व येथे सिद्ध केले आहे. जेवढे पंतप्रधान झाले त्यांना पाहिले. वैयक्तिक यशवंत चव्हाण यांच्या संपर्कात वाढलो. थोड्याच दिवसात चित्र बदलले निवडणूक विधानसभेला उभे राहीले पाहीजे १९८४ राजीनामा दिला विधानसभेला उभे राहीलो, ६० आमदार घेऊन काम सुरु केले. एआर अंतुले, बाबासाहेब मुख्यमंत्री झाले. काँग्रेस विचाराच्या लोकांनी एकत्र यावे अशी भूमिका राजीव गांधी यांनी मांडली असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की एकदा राजीव गांधी यांचा सकाळी चार वाजता मला फोन आला. आप दिल्ली आओ…लगेत शक्य नाही मी उद्या येतो असे सांगितले. सकाळी दिल्लीला गेलो तर ते म्हणाले की तुला महाराष्ट्रात जायचे आहे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यायची आहे. बाबासाहेब भोसले यांची सुट्टी झाली मला मुख्यमंत्री केले. १९८९-९० पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. राजीव गांधी यांची हत्या झाली. पंतप्रधान कोणाला करायचे हा प्रश्न आला. माझी निवडणूकीची जयारी नव्हती. दोन लोकांत निवडणूक झाली. मला ११८ आणि तर नरसिंह रावांना १९० मते पडली. नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि मी संरक्षण मंत्री म्हणून काम केले असे पवार यावेळी म्हणाले.