भारतातील अशी 3 गावं, प्रत्येक बापाचं स्वप्न याच गावात आपल्या मुलीचं लग्न व्हावं, लग्नासाठी लागते रांग

भारतामध्ये अशी काही गावं आहेत, जी कोणत्या न कोणत्या कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. देशात अशी तीन गावं आहेत, ज्या गावात आपल्या मुलीचं लग्न व्हावं यासाठी मुलींच्या वडिलांकडून प्रयत्न केला जातो. त्या मागे एक खास कारण आहे.

भारतातील अशी 3 गावं, प्रत्येक बापाचं स्वप्न याच गावात आपल्या मुलीचं लग्न व्हावं, लग्नासाठी लागते रांग
भारतामधील तीन सर्वात श्रीमंत गावं
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 11, 2026 | 5:32 PM

प्रत्येक वडिलांची अशी इच्छा असते, की आपल्या मुलीचं अशा मुलासोबत लग्न व्हावं, ज्या मुलाला कुठलंही व्यसन नसावं, तो वेलसेटल असावा, श्रीमंत असावा. मुलीच्या सासरचे लोक तिला समजून घेणारे असावेत. आपल्या मुलीचं भलं व्हावं, तिला तिच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये. भारतामधील अशी तीन गावं आहेत, जी प्रचंड श्रीमंत आहेत. ही गाव दिसायला जरी छोटी असतील तरी या गावांनी श्रीमंतीच्या बाबतीमध्ये भल्या भल्या शहरांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या गावातील लोक निर्व्यसनी आहेत. त्यांनी आपल्या गावात विकासाचं एक नवं मॉडेल तयार केलं आहे. त्यामुळे या परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील मुलींचे वडील या गावात आपल्या मुलीचं डोळे झाकून लग्न करतात. या गावातील तरुणासोबत आपल्या मुलीचं लग्न व्हावं, यासाठी देखील अनेक वधूपित्यांचा प्रयत्न असतो.

राठधाना – राठधाना हे गाव हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यात येतं. या गावाला करोडपतीचं गाव म्हटलं जातं. हे गाव दिल्लीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. दिल्लीपासून जवळ असल्याचा या गावाला प्रचंड फायदा झाला आहे. पू्र्वी ज्या शेतात फक्त गहू आणि मोहरीचं उत्पन्न व्हायचं, त्याच जमिनीने या लोकांना करोडो रुपये मिळून दिले आहेत, या लोकांनी आपल्या शेतात प्लॉट निर्माण केले आहेत, या प्लॉची विक्री कोट्यवधी रुपयांमध्ये होत आहे.

Loading...

धरमज – हे गाव गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यामध्ये येतं. या गावाला एनआयआरचे गाव देखील म्हटलं जातं. याच कारण म्हणजे काही वर्षांपूर्वीच या गावातील लोक परदेशात सेटल झाले आहेत. मात्र ते कधीही आपल्या गावाला विसरले नाहीत. या गावात थेट अमेरिका, युके आणि आफ्रिकेमधून पैसा येतो. या गावातील प्रत्येक कुटुंबातील एक तरी व्यक्ती परदेशात आहे, त्यामुळे या गावात प्रचंड पैसा आहे. हे एक खेडं गाव असूनही इथे तुम्हाला कुठेच मातीचं कच्चं घर दिसणार नाही, सर्वत्र बंगलेच बंगले आहेत.

केरा – केरा हे गाव देखील गुजरातमध्येच आहे, केरा हे गाव गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आहे. हे गाव बाहेरून खूप शांत दिसतं, परंतु या गावातील लोक हे प्रचंड श्रीमंत आहेत, हे गाव छोटं असून देखील या ठिकाणी अनेक मोठ्या बँकांची कार्यालये आहेत. या लोकांची सेव्हिंग हा देशभरात चर्चेला विषय ठरतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us