Discount Train Ticket Booking : ट्रेनचं तिकीट प्रचंड स्वस्त, रेल्वेची भन्नाट ऑफर; या अॅपमधून बुकिंग केल्यास…

Train Ticket Booking : आता जनरल तिकीट घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील काउंटरवर लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या रेल्वेच्या अॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीटही बुक करू शकता.

Discount Train Ticket Booking : ट्रेनचं तिकीट प्रचंड स्वस्त, रेल्वेची भन्नाट ऑफर; या अॅपमधून बुकिंग केल्यास...
Rail One News
Image Credit source: Google
| Updated on: Aug 11, 2026 | 9:04 PM

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता जनरल तिकीट घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील काउंटरवर लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या रेल्वेच्या अॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीटही बुक करू शकता. भारतीय रेल्वे आपल्या RailOne अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे RailOne अॅपवरून जनरल तिकीट बुक केल्यास प्रवाशांना सवलतही मिळते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ऑनलाइन जनरल तिकीट, सवलतही मिळणार

भारतीय रेल्वेकडून वेळोवेळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून रेल्वे प्रवाशांना विविध सुविधांची माहिती दिली जाते. DRM प्रयागराज, NCR या X हँडलवरही याबाबत पोस्ट करण्यात आली आहे. यात प्रवासाची सुरुवात, RailOne अॅपसोबत’ असे सांगण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून आता डिजिटल पेमेंटद्वारे अनारक्षित तिकीटही सहज बुक करता येते.

रेल्वे काउंटरवरील रांगेचा त्रास संपणार

रेल वन अॅपच्या माध्यमातून जनरल तिकीट बुक केल्यास 3 टक्के सवलतही दिली जात आहे. या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेचा आणि तिकीट बुकिंगवरील सवलतीचा उद्देश रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरच्या लांब रांगांपासून प्रवाशांची सुटका करणे हा आहे. त्यामुळे प्रवाशांना काउंटरवर रांगेत उभे राहण्याऐवजी घरबसल्या सहज तिकीट बुक करता येणार आहे.

डिजिटल तिकीटिंगला प्रोत्साहन

भारतीय रेल्वेकडून रेलवन अॅपच्या माध्यमातून ही सुविधा देण्यामागचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे जास्तीत जास्त रेल्वे प्रवाशांना डिजिटल तिकीटिंगशी जोडणे. या अॅपवर तिकीट बुक करण्यासाठी UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करता येतो. मोबाइल फोनच्या माध्यमातून काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तिकीट बुक करता येते.

घरबसल्या अशा पद्धतीने करा तिकीट बुकिंग

  • गुगल प्ले स्टोअर किंवा गुगल अॅप सटोअरवरून रेलवन अॅप डाउनलोड करा.
  • अॅपला लोकेशन आणि नोटिफिकेशनच्या परवानग्या द्या.
  • तुमचे IRCTC अकाउंट असल्यास यूजरनेम आणि पासवर्डच्या माध्यमातून थेट लॉगइन करा.
  • नवीन यूजर्स मोबाइल नंबर आणि OTP व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून लॉगइन करू शकतात.
  • लॉगइन केल्यानंतर होम स्क्रीनवरील Book Tickets या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर Unreserved Ticket या पर्यायावर क्लिक करा.
  • आता सोर्स आणि डेस्टिनेशन स्टेशन तसेच प्रवासाची तारीख निवडा.
  • यानंतर पेमेंट करा आणि तुम्हाला QR तिकीट मिळेल.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us