‘खरे बोलणे हे बंड असेल तर आहोत आम्ही बंडखोर’.. वादात सापडलेल्या नुपुर शर्मा यांना भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा पाठिंबा

| Updated on: Jun 10, 2022 | 6:30 PM

अल्पसंख्याकांना नेहमीच सत्य सांगितले की त्यांना त्रास का होतो, असा प्रश्नही प्राज्ञासिंह यांनी उपस्थित केला आहे. परधर्मातील अनेकांनी हेच केले आहे. डाव्यांचाही इतिहास हाच असल्याचे त्यांनी सांगितले. विरोध करणाऱ्यांना कापून टाकण्यात आले, अशी टीका साध्वींनी केली आहे.

खरे बोलणे हे बंड असेल तर आहोत आम्ही बंडखोर.. वादात सापडलेल्या नुपुर शर्मा यांना भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा पाठिंबा
sadhvi support nupur
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – मोहम्मद पैंगबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अडचणीत सापडलेल्या नुपूर शर्मा (Nupur Sharma)यांचे भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर (BJP MP pragnyasingh Thakur)यांनी खुलेपणाने समर्थन (support)केले आहे. जेव्हा अलपसंख्याकांना सत्य सांगितले जाते, तेव्हा त्यांना त्रास का होतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर सत्य सांगणे हा बंडखोरपणा असेल तर आम्ही बंडखोर आहोत, असे सांगत त्यांनी नुपूर शर्मा यांची पाठराखण केली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहिलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर या पुन्हा नुपुर शर्मा यांच्याबाबत केलेल्या या वक्तव्याने चर्चेत आल्या आहेत. भारत हा हिंदूंचा देश आहे, आणि सनातन धर्म इथे कायम जिवंत राहील, असेही साध्वी म्हणाल्या आहेत.

सत्य ऐकण्याचा त्रास का होतो

अल्पसंख्याकांना नेहमीच सत्य सांगितले की त्यांना त्रास का होतो, असा प्रश्नही प्राज्ञासिंह यांनी उपस्थित केला आहे. परधर्मातील अनेकांनी हेच केले आहे. डाव्यांचाही इतिहास हाच असल्याचे त्यांनी सांगितले. विरोध करणाऱ्यांना कापून टाकण्यात आले, अशी टीका साध्वींनी केली आहे. नुपूर शर्मा काहीतरी म्हणाल्या, तर त्यांना धमकी देण्यात आली. त्यांनी एक ट्विटही केले आहे की, सत्य सांगणे ही बंडखोरी असेल, तर हो आहोत आम्ही बंडखोर, जय सनातन, जय हिंदुत्व

हे सुद्धा वाचा

मी नेहमी सत्यच बोलते म्हणूनच बदनाम

नेहमीच सत्य सांगते म्हणूनच आपण बदनाम आहोत, असंही भोपाळच्या खासदार असलेल्या प्रज्ञासिंह म्हणाल्या. वारणसीतील ज्ञानवापी मशिदीत कुणी काहीही सांगितलं तरी तिथे शिवलिंग आहे, हे सत् आहे, असे साध्वी म्हणाल्या. त्याला कारंजे म्हणणे हे हिंदू मानदंड, देवी देवतांचा आणि सनातन धर्मांवर कठोराघात असल्याची टीका त्यांनी केली आहे. जे सत्य आहे ते आम्ही तुम्हाला दाखवूच असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद

एका टीव्हीवरील चर्चेत भाजपाच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मौहम्मद पैगंबराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर याचा मोठा निषेध करण्यात आला. त्यानंतर भाजपाने त्यांना प्रवक्ते पदावरुनही हटवले. नुपूर शर्मा यांनीही या प्रकरणी बिनशर्त माफी मागितली. त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अरब आणि मुस्लीम राष्ट्रांनीही याप्रकरणी भारताची निंदा केली आहे. तर उ. प्रदेशह देशभरात या प्रकरणात निदर्शने आणि हिंसाचार करण्यात आला आहे.