AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच मिळणार ‘पीएम किसान’ योजनेचा दहावा हफ्ता

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री शेतकरी सम्मान निधी योजनेंतर्गत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. हा या योजनेंतर्गत देण्यात येणारा दहावा हफ्ता आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच मिळणार 'पीएम किसान' योजनेचा दहावा हफ्ता
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 9:27 AM
Share

नवी दिल्ली – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री शेतकरी सम्मान निधी योजनेंतर्गत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. हा या योजनेंतर्गत देण्यात येणारा दहावा हफ्ता आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत म्हणून दर तीन महिन्यांना दोन हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजारांचा हफ्ता जमा करण्यात येतो. शेतकरी म्हणून नोंदणी असलेले 11.37 कोटी नागरिक केंद्राच्या या योजनेची लाभार्थी आहेत. आतापर्यंत या योजनेंतर्गत  शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटींपेक्षा अधिक पैसे जमा झाले आहेत.

….तर मिळणार चार हजार रुपये 

दरम्यान ज्यांना प्रधानमंत्री शेतकरी सम्मान निधीचा 9 हफ्ता मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर यावेळी 9 आणि 10 अशा दोन्ही हफ्त्यांचे मिळून एकूण चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांना केंद्राकडून दोन हजार रुपये देण्यात येतात. म्हणजेच सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति महिला 500 रुपयांची मदत करण्यात येत आहे. हे पैसे अडचणीच्या काळात वापरता येत असल्याने, शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

‘असे’ चेक करा लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव

या योजनेसाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या नावांची एक यादी प्रसिद्ध केली जाते. त्या यादीमध्ये आपले नाव असेल तरच आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आपले त्या यादीमध्ये नाव आहे की नाही? हे चेक करण्यासठी सर्वप्रथम पीएम किसानच्या वेबसाईटला भेट द्या, त्यानंतर तिथे फॉर्मर कॉर्नर नावाचा ऑप्शन सिलेक्ट करा.  त्यानंतर तिथे गेल्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीवर क्लीक करा. त्या यादीमध्ये आपले नाव, गाव, तालुका, जिल्हा अशी सर्व माहिती भरा. त्यानंतर जर त्या यादीत तुमचे नाव असेल तर ते समोर येईल. या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनाच  हे पैसे मिळतात.

संबंधित बातम्या 

देश ऐतिहासिक वळणावर, सौरभ कृपाल पहिले समलैंगिक जज होण्याची शक्यता, कॉलेजियमची शिफारस

आधी तुरुंगातील जेवण घ्या, अनिल देशमुखांना कोर्टाने फटकारले; घरचे जेवण देण्याची मागणी फेटाळली

प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान; कारवाई करून विषय संपवा, मुंबईच्या महापौरांची मागणी

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...