AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Employees Lay Off : सर्वात मोठी नोकर कपात; एक मेल आला अन् झटक्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कारण फक्त…

Employees Lay Off : उबर कंपनीने सर्वात मोठी नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एक मेल आल्यानतंर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत .

Employees Lay Off  : सर्वात मोठी नोकर कपात; एक मेल आला अन् झटक्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कारण फक्त...
job lost Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 03, 2026 | 7:45 AM
Share

जगातील सर्वात मोठी कॅब उबेर कंपनीने नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जवळपास 3300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीतील एकूण 10 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकलं आहे. 2020 साल म्हणजे कोरोना काळानंतर कंपनीने केलेली सर्वात मोठी नोकर कपात केल्याचे बोलले जात आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टुनुसार, उबरमध्ये पुनर्रचना केल्यानंतर मॅनेजरची संख्या 20 टक्क्यांनी कमी केली आहे. कंपनीने एकूण किती मॅनेजरला कामावरून काढलं, हे स्पष्ट केलेलं नाही. मॅनेजरसहित इतर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकलं आहे. उबरने गेल्या वर्षी जगभरातील 34000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. उबेर कंपनीला व्यवस्थापन करताना अनेक आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या Waymo सारख्या चालक नसलेल्या वाहतूक सेवेमुळे गुंतवणूकदारांचा कल दुसरीकडे वळू लागला आहे. त्याचा परिणाम उबेरवर दिसत आहे. त्याचबरोबर उबेर कंपनीच्या शेअरवर देखील दिसत आहे. यामुळे उबेर कंपनी खर्च कमी करण्याचा विचार करताना दिसत आहे.

उबरचे सीईओ दारा यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे की, गेल्या काही वर्षांत कंपनीचा जलद विस्तार झाला, त्यामुळे कंपनीत अनेक विभाग निर्माण झाले आहेत. परंतु यामुळे कंपनीच्या कामाची प्रक्रिया संथ झाली आहे. त्यामुळे कर्मचारी कमी करून उर्वरित विभागांमध्ये ताळमेळ बसवायचा आहे. आता एक किंवा दोन जणांच्या कर्मचाऱ्यांचा गट करून कंपनी काम करणार आहे. आता कंपनी इंजिनीअरिंग, सायन्स आणि डिलिव्हरीसारख्या विभागाची प्रक्रिया सरळ आणि सोपी करणार आहे. यासहित रेस्टॉरंट, रिटेल आणि व्हाइट लेबल डिलिव्हरी या विभागाशी संबंधित तीन ऑपरेशनल टीमचे विलीनीकरण करण्याची कंपनीची योजना आखली आहे. सीईओ पुढे म्हणाले, ‘पुनर्रचना केल्यानंतर होणारी बचत ही कंपनी विकास, नवीन तंत्रज्ञानावर पुन्हा गुंतवणार आहे. यासहित उबेर जगभरातील चालक, डिलिव्हरी कुरीअर्स आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक पैसा गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. त्याचसोबत भविष्यात चालक नसलेल्या कॅब सेवा तयार करण्याचाही विचार करत आहे’.

Follow Us
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा