AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: “सचिन वाझेंचे गॉडफादर उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या आधी त्यांनी राजीनामा द्यावा”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत.

VIDEO: सचिन वाझेंचे गॉडफादर उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या आधी त्यांनी राजीनामा द्यावा
भाजप नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Mar 19, 2021 | 2:08 PM
Share

नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, असं सांगतानाच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आधी मुख्यमंत्र्यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. (Uddhav Thackeray is sachin vaze’s godfather, he must resign, says Narayan Rane)

नारायण राणे यांनी संसद भवन परिसरात मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही मागणी केली. सचिन वाझे आधी सस्पेंड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना डिपार्टमेंटमध्ये घेतलं. तसेच त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीही दिली. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच वाझे पोलीस दलात परत आले. यावरून मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचं दिसून येतं, असं राणे म्हणाले.

वाझेंकडेच महत्त्वाची प्रकरणं कशी?

मुख्यमंत्र्यांनी वाझेंकडून सर्व कामे करून घेतली आहेत. त्यामुळे अनिल देशमुखांच्या आधी मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरेंना वर्षभर चांगलं काम करता आलं नाही. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणं वाझेंकडे देण्यात आली होती. संबंध नसतानाही वाझेंकडे ही प्रकरणं का देण्यात आली? असा सवालही त्यांनी केला.

राऊत मुख्यमंत्र्यांचा बचाव करणारच

वाझेंचा गॉडफादर कोणीच नसल्याचं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याबाबत राणे यांना विचारलं असता त्यांनी थेट संजय राऊत आणि उद्वव ठाकरेंवर टीका केली. ‘सामना’द्वारे राऊत मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचं काम करत आहेत. चुकीचं काही घडलं असेल तरीही मुख्यमंत्र्यांचा बचाव केला जातो. राऊत मुख्यमंत्र्यांचा बचाव करणारच. ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, असंही ते म्हणाले.

कोण आहेत सचिन वाझे?

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.

मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. (Sachin Vaze Reinstated in Crime Branch) सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली. सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते. (Uddhav Thackeray is sachin vaze’s godfather, he must resign, says Narayan Rane)

संबंधित बातम्या:

वाझे प्रकरणात जप्त कारचे मूळ मालक शिवसेना पदाधिकारी, दोन वर्षांपूर्वीच गाडी विकल्याचा दावा

सचिन वाझे प्रकरणाचे नवी मुंबई कनेक्शन, सापडलेल्या 5 गाड्यांपैकी एक गाडी नवी मुंबईतील

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, कांदिवली क्राईम ब्रांचच्या पोलीस निरीक्षकाची ATS कडून चौकशी

(Uddhav Thackeray is sachin vaze’s godfather, he must resign, says Narayan Rane)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली