मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, कांदिवली क्राईम ब्रांचच्या पोलीस निरीक्षकाची ATS कडून चौकशी

आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सांगितलं होतं. (Mansukh Hiren Sunil Mane ATS)

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, कांदिवली क्राईम ब्रांचच्या पोलीस निरीक्षकाची ATS कडून चौकशी
पोलीस निरीक्षक सुनील माने
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 7:34 AM

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएसने (ATS) क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनील माने (Sunil Mane) यांना बोलावलं आहे. सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक आहेत. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेंची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. (Mansukh Hiren Death Case Kandivali Crime Branch PI Sunil Mane enquiry by ATS)

मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक (Mukesh Ambani Bomb Scare) मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एटीएसच्या हाती महत्त्वाची लीड मिळाली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा ताबा घेण्यासाठी एटीएस कोर्टात प्रयत्न करणार आहे.

“कांदिवली क्राईम ब्रांचमधून चौकशीचा फोन”

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना यासंबंधी दावा केला होता. आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं होतं.

CIU अधिकारी रियाझ काझी माफीचा साक्षीदार?

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करण्यास नकार देणारे निलंबित API सचिन वाझे यांचा खेळ आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण आता सचिन वाझे प्रमुख असलेल्या गुप्तवार्ता विभागातील (CIU) अधिकारी रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहेत रियाझ काझी?

रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी होते. सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होते. याशिवाय, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्याचा आरोप आहे. याशिवाय, सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फूटेजही रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती असल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे यांच्या कृत्यांचा पर्दाफाश होणार आहे.

संबंधित बातम्या:

Sachin Vaze : गुन्ह्यात वापरलेला दुसरा शर्टही मिळाला, जिथे शर्ट जाळला, तिथे नेऊन वाझेंची चौकशी

आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका; निष्पक्ष चौकशीसाठी पोलीस आयुक्तांची बदली: अनिल देशमुख

(Mansukh Hiren Death Case Kandivali Crime Branch PI Sunil Mane enquiry by ATS)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.