AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! युद्धविरामाची चर्चा फिस्कटणार? अमेरिकेचा इराणला जबर धक्का, ज्याची भीती होती तेच घडलं

अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा झाली आहे. इस्लामाबादमध्ये पुढील वाटाघाटी सुरू आहेत. मात्र त्याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, अमेरिकेनं इराणला मोठा धक्का दिला आहे.

मोठी बातमी! युद्धविरामाची चर्चा फिस्कटणार? अमेरिकेचा इराणला जबर धक्का, ज्याची भीती होती तेच घडलं
Donald Trump Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 11, 2026 | 5:02 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये मोठं युद्ध झालं, या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. अखेर युद्धाच्या 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. दोन आठवड्यांसाठी हा युद्धविराम असणार आहे. या युद्धविरामासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला. पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. दरम्यान आता पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये शांतीवार्ता सुरू आहे.  यापूर्वीच इराणने आपल्या काही अटी अमेरिकेपुढे ठेवल्या होत्या. अमेरिकेकडून आखाती देशात असलेली इराणची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, ती संपत्ती मुक्त करावी आणि इस्त्रायलकडून लेबनॉनवर सुरू असलेले हल्ले तातडीने थांबवावेत अशी मागणी इराणकडून करण्यात आली होती.

मात्र शांती वार्त सुरू असतानाच आता अमेरिकेनं इराणला मोठा धक्का दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेनं इराणची जप्त केलेली संपत्ती सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात दोन्ही देशांमध्ये सुरू असलेली शांती वार्ता फिस्कटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेनं इराणची संपत्ती मुक्त करण्यास नकार दिला असून, हा इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

स्ट्रीट ऑफ होर्मूज अजूनही बंदच 

दरम्यान अमेरिका आणि इराण दोन्ही देशांकडून युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे. युद्धविरामाची घोषणा करतानाच अमेरिकेनं इराणसमोर स्ट्रीट ऑफ होर्मूज तातडीनं सुरू करण्याची अट ठेवली होती. मात्र युद्धविराम होऊन देखील इराणने अजूनही स्ट्रीट ऑफ होर्मूज सुरू केलेला नाहीये. एका दिवसात या मार्गाने केवळ 15 च जहाजं जातील असं इराणने म्हटलं आहे. त्यामुळे अजूनही जगावर ऊर्जा संकट कायम आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावर आता ब्रिटनने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज अजूनही सुरू केलेलं नाही, यावर बोलताना ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले की, या संदर्भात मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोललो आहे. आम्ही आता स्ट्रीट ऑफ होर्मूजवर सैन्य कारवाईचा विचार करत आहोत. जर समजा अशी कारवाई झालीच तर पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होऊ शकते.

Follow Us
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'