ज्याची भीती होती तेच घडलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय, मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडणार

अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरूच आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर एका भीषण युद्धाला सुरुवात झाली, अजूनही हे युद्ध सुरूच आहे.

ज्याची भीती होती तेच घडलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय, मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडणार
trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 10:28 PM

अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरूच आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर एका भीषण युद्धाला सुरुवात झाली, अजूनही हे युद्ध सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेनं इराणच्या सर्व पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या आहेत. तर दुसरीकडे ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकन सैन्यांची तळं आहेत, त्या -त्या देशांवर इराणकडून भीषण हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आता तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, मध्य पूर्वेतून मोठी बातमी मोर आली आहे.

अमेरिकेनं आता फारसच्या खाडीमध्ये आणखी एक एअर क्राफ्ट आणि दहा हजार सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या एका सिनीअर सैन्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार USS थियोडोर रूजवेल्ट हे एअर क्राफ्ट रविवारी आपल्या सैन्य बेसवरून फारसच्या खाडीमध्ये रवाना झालं आहे. हे एअर क्राफ्ट मध्य पूर्वेच्या दिशेनं पुढे सरकत आहे. लवकरच हे एअर क्राफ्ट फारसच्या खाडीमध्ये पोहोचेल. दरम्यान हे एअर क्राफ्ट फारसच्या खाडीमध्ये पोहोचल्यानंतर या क्षेत्रात अमेरिकेचे तीन एअर क्राफ्ट तैनात असतील. या एअर क्राफ्टवर दहा हजार सैन्य तैनात करण्यात येणार आहेत.

Loading...

दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. आधी युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेनं देखील या भागात नाकेबंदी केली. त्यामुळे या मार्गाने होणारी कच्च्या तेलाची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. संपूर्ण जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची तर भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेला पैकी तब्बल चाळीस टक्के कच्च्या तेलाची याच मार्गाने वाहतूक होते. एवढा हा मार्ग महत्त्वाचा आहे. मात्र या युद्धामुळे सध्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र आता हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us