AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US, Iran War : युद्ध पुन्हा सुरू होणार? अमेरिकेची इराणला मोठी धमकी, जगाची चिंता वाढली

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेकडून इराणला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. अजून यावर इराणकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.

US, Iran War : युद्ध पुन्हा सुरू होणार? अमेरिकेची इराणला मोठी धमकी, जगाची चिंता वाढली
America, Iran WarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 7:25 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये 39 दिवस भीषण युद्ध सुरू होतं. या युद्धामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मात्र तरी देखील इराणने युद्धातून माघार घेतली नव्हती, इराणकडून मध्य पूर्वेत असलेल्या अमेरिकेच्या अनेक सैन्य तळांना लक्ष्य करण्यात आले तसेच इस्त्रायलवर देखील मिसाईल हल्ले करण्यात आले. या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील मोठं नुकासन झालं. शेवटी या युद्धात पाकिस्तानने मध्यस्थी केली. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. याचदरम्यान पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांमध्ये शांतीवार्ता होईल असं ठरलं होतं.

ठरल्याप्रमाणे पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांमध्ये युद्धविरामावर वाटाघाटी झाल्या, मात्र ही चर्चा यशस्वी होऊ शकली नाही. दरम्यान आता पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाच्या चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. मात्र ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच अमेरिकेनं इराणला मोठी धमकी दिली आहे. जर तुम्ही शांतीवार्ताचा प्रस्ताव फेटाळला तर आम्ही पुन्हा तुमच्यासोबत युद्ध करू असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटलं आहे. यावर अजून इराणकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.

दरम्यान दुसरीकडे स्ट्रीट ऑफ होर्मूजच्या मुद्द्यावरून इराणने देखील अमेरिकेला धमकी दिली आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूजमध्ये अमेरिका आणि इराणच्या युद्धनौका आमने-सामने आहेत. जर तुम्ही आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमची एकही युद्धनौका वापस जाऊ देणार नाहीत, सर्व युद्धनौका बुडून टाकू असं इराणने म्हटलं आहे. दरम्यान त्यामुळे आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. इराणने जरी स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केला असला तरी देखील काही देशांना त्यांनी या मार्गाने जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. तसेच इराणकडून भारताच्या जहाजांवर कोणताही ट्रोल आकाराला जाणार नाहीये.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...