AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेतून सर्वात मोठी बातमी; उद्यापासून टॅरिफ वसुली बंद, अखेर जगानं घेतला सुटकेचा श्वास

मोठी बातमी समोर येत आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता मंगळवारपासून अमेरिका टॅरिफची वसुली थांबवणार आहे, याबाबत अमेरिकेच्या सीमा शुल्क विभाग आणि सीमा सुरक्षा विभागाकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे.

अमेरिकेतून सर्वात मोठी बातमी; उद्यापासून टॅरिफ वसुली बंद, अखेर जगानं घेतला सुटकेचा श्वास
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 23, 2026 | 7:24 PM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर निर्माण केलं होतं, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा जगभरातील निर्यातदारांना मोठा फटका बसला, दरम्यान या संदर्भात गेल्या शुक्रवारी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला, ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ हा बेकायदेशील असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. सु्प्रीम कोर्टाचा हा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे, मात्र या निर्णयानंतर काही तासांमध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला, डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी 10 टक्के ग्लोबल टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर तो वाढून 15 टक्के इतका केला. आता अमेरिकेतून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे समोर आलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता अमेरिका उद्यापासून म्हणजे मंगळवार पासून अतिरिक्त टॅरिफची वसूली थांबवणार आहे, याबाबत अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाकडून घोषणा करण्यात आली आहे.

टॅरिफ कोड निष्क्रिय करणार

प्राप्त रिपोर्टनुसार या संदर्भात अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये 1977 च्या आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा (IEEPA) च्या अंतर्गत वसूल करण्यात येणारं टॅरिफ कनेक्शन मंगळवारपासून बंद करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता या टॅरिफची वस्तुली अमेरिकन वेळेनुसार रात्री 12.01 मिनिटांपासून तर भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी 10.30 पासून बंद होणार आहे. तसेच सर्व प्रकारचे टॅरिफ कोड देखील निष्क्रिय करण्यात येणार आहेत.

गेल्या शुक्रवारी टॅरिफचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं, त्यानंतर आता मंगळवारपासून टॅरिफची वसुली थांबवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. मात्र या अंतर्गत केवळ IEEPA अंतर्गत येणारी टॅरिफ वसुलीच थांबवण्यात येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळत लावलेले इतर शुल्क यामुळे कुठेही प्रभावित होणार नाहीयेत, त्याची वसुली सुरूच राहणार आहे. अतिरिक्त टॅरिफ वसुली थांबवण्यात आल्यामुळे आता अनेक देशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा