
मेरठ : शहरात डेंग्यु आणि अन्य मच्छर चावल्यामुळे होणाऱ्या आजाराची साथ पसरली आहे. आजाराच्या या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर पालिकेकडून फॉगिंगच काम सुरु आहे. शुक्रवारी दिल्ली गेट ठाणा क्षेत्रात जली कोठी भागात मच्छर मारण्याच औषध शिंपडणयात आलं. मच्छर मारण्याच्या हे औषध जरा जास्तच प्रभावी ठरलं. नेहमीप्रमाणे मेरठच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संध्याकाळच्यावेळी नगर निगमकडून फ़गिंगचा काम केलं जातं. फॉगिंग करताना मच्छर पळवणं आणि मारण्यासाठी धूर केला जातो. शुक्रवारी संध्याकाळच्यावेळी मेरठ नगर पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 74 मधील कोठी पूर्वा अहमद नगरमध्ये फॉगिंगच काम सुरु होतं. तेव्हा एका घरात जरा जास्तच धूर करण्यात आला.
परिणामी त्या घरातील 5 महिला, 2 पुरुष आणि 2 लहान मुलं बेशुद्ध झाली. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जास्त प्रमाणात औषध फवारणी केली, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. एकाच कुटुंबातील 9 जण बेशुद्ध झाले. इकराम इलाही यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सांत्वन करण्यासाठी घरी बरेच लोक आले होते. फॉगिंग करणाऱ्यांनी जर जास्तच धूर फवारणी केली. त्यामुळे घरात आलेल्या अनेकांचा श्वास गुदमरला. घरात उपस्थित असलेल्या 5 महिला, 2 पुरुष आणि 2 मुल असे 9 जण बेशुद्ध झाले. कुटुंबीयांनी लगेच रुग्णवाहिकेच्या माणसाला फोन केला. पण रुग्णवाहिका आली नाही. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने घरातील बेशुद्ध लोकांना रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
परिसरात एकच खळबळ उडाली
पीडित कुटुंबातील सदस्य नईमने सांगितलं की, घरात मृत्यू झाल्याने बरेच लोक घरी आले होते. रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या खिडकीचा पडदा उघडताच अचानक धुर घरात घुसला. नाका-तोंडात धुर गेल्याने श्वास कोंडला गेला. रुग्णांना आधी ऑक्सिजन लावण्यात आला. त्यानंतर उपचार सुरु झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या सिटी मजिस्ट्रेट अनिल कुमार यांनी रुग्णांची विचारपूस केली. दोघांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं. अन्य 7 जणांवर उपचार सुरु आहेत. नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असं अनिल कुमार यांनी सांगितलं.