Maharashtra Breaking News Live : वंचित बहुजन आघाडीची सभा थोड्याच वेळात

| Updated on: Nov 25, 2023 | 9:20 PM

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील.... राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी.... तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील घडामोडी, महत्वाच्या बातम्या... वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : वंचित बहुजन आघाडीची सभा थोड्याच वेळात

मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : पाच राज्यातील निवडणुकीत राजस्थानमधील निवडणूक आज होत आहे. राज्यस्थानमध्ये १९९ जागांसाठी मतदान सुरु केले आहे. शिवसेना कोणाची? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी आजपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर मनसे स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल, असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आले आहे. पहिला विसर्ग १०० क्युसेक्सने करण्यात आला. नगर जिल्ह्यातून बंदोबस्तात पाणी सोडले जाणार आहे. राजकीय, जिल्ह्या जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचणास मिळणार आहे. त्यासाठी आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Nov 2023 06:26 PM (IST)

    ‘हजारो गुन्हे दाखल झाले तरी चालतील’, रविकांत तुपकर आक्रमक

    बुलढाणा | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप केला. “हजारो गुन्हे दाखल झाले तरी चालतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेवटपर्यंत लढणार. शहीद झालो तरी चालेल, मात्र मागे हटणार नाही. यह तो अभी ट्रेलर हैं”, असं रविकांत तुपकर म्हणाले. कायदा हातात घेऊन आंदोलन करू नका, असं आवाहन तुपकर यांनी कार्यकर्त्यांना केलंय.

  • 25 Nov 2023 05:51 PM (IST)

    समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वागू नका- अजित पवार

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवसांचं शिबीर कर्जतला होणार आहे. तेव्हा मी माझी भूमिका मांडेल. समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वागू नका. सत्ताधारी असो की विरोधक किंवा राजकारणाशी संबंध नसलेलं लोकं असतील, या सर्वांनी सावध भूमिका घेतली पाहीजे. तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे.

  • 25 Nov 2023 05:45 PM (IST)

    संजय सिंग यांच्या जामीन अर्जावर कोर्ट 28 नोव्हेंबरला सुनावणी करणार

    मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेल्या आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या जामीन अर्जावर राऊस एव्हेन्यू कोर्ट 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार आहे.

  • 25 Nov 2023 05:34 PM (IST)

    अजित पवार यांच्याकडून विकास कामांची पाहणी

    डेंग्युतून बरे झाल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामांची पाहाणी केली. मेट्रोच्या कामांचा आढावा घेतला.

  • 25 Nov 2023 05:30 PM (IST)

    रविकांत तुपकर यांना पोलिसांकडून अटक

    रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

  • 25 Nov 2023 05:15 PM (IST)

    पंकजाताई कधीही नाराज राहू शकत नाही- बावनकुळे

    पंकजा मुंडे यांच्या रक्तारक्तात भाजपा आहे. त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितलं. तर पंकजा मुंडे यांच्यासोबत न्याय व्हावा अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी सांगितलं.

  • 25 Nov 2023 05:02 PM (IST)

    राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन होणार- अशोक गेहलोत

    राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, आम्हाला जनतेचा आशीर्वाद मिळाला आहे, पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. कोण काय बोलतंय याने मला काही फरक पडत नाही, मी माझ्याबद्दल बोलतोय.

  • 25 Nov 2023 04:57 PM (IST)

    मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

    मुंबईतील शिवाजी पार्क मैदानामध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानच्या सन्मानात महासभेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संबोधित करतील. तर काँग्रेसचे नेते नाना पटोले हे पण उपस्थित असतील. शिवाजी पार्क या मैदानामध्ये जवळपास 35000 खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. पण आकडा एक लाखाच्यावर जाईल आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी या सभेला होईल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

  • 25 Nov 2023 04:46 PM (IST)

    खासदार संजय पाटील यांची राजीनामा देण्याची भूमिका

    कोयना धरणातुन पाणी अडवणूक प्रकरणी भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यात कोयना-कृष्णा पाणी संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. कोयनेतुन सांगलीला पाणी सोडण्यावरून महायुती मध्येही संघर्ष पेटणार असं चित्रं आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाटील यांनी सडकून टीका केली आहे. कोयना धरणाचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही,मंत्री देसाई यांची लुडबुड खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. हक्काचे पाणी घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 25 Nov 2023 04:38 PM (IST)

    कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

    रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. पोलीस स्टेशन समोरील झाडावर नितीन राजपूत हा कार्यकर्ता चढला. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळेत खाली उतरवले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याचं पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • 25 Nov 2023 04:25 PM (IST)

    राजू शेट्टी लवकरच विदर्भ दौऱ्यावर

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे विदर्भ दौऱ्यावर येत आहे. ऊस प्रश्न असो वा सोयाबीन प्रश्न असो शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध लढा तीव्र करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोयाबीन प्रश्नी बुलडाणा जिल्ह्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. या घटनेचे घाटावर आणि घाटाखाली पडसाद उमटले. ठिकठिकाणी शेतकऱ्यांना अटकेचा निषेध केला.

  • 25 Nov 2023 04:10 PM (IST)

    ओबीसीमधून आरक्षण नको- बबनराव तायवाडे

    मनोज जरांगे याना काय मागायचं तो त्यांचा प्रश्न आहे, आम्ही त्यावर वक्तव्य करणार नाही. पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. ओबीसीमधून आरक्षण देता कामा नये, अशी आमची भूमिका असल्याचे बबनराव तायवाडे यांनी भूमिका मांडली. या भूमिकेवर ते ठाम राहिले. सरकारने सुद्धा ते मान्य केलं होतं सरकार आणि विरोधी पक्ष या सर्वांचं यावर एकमत झालेला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले.

  • 25 Nov 2023 04:04 PM (IST)

    मुंब्रामध्ये भंगार दुकानात स्फोट

    मुंब्र्यातील चांद नगर, कौसा परिसरातील मुघल पार्क इमारतीतील भांगरच्या दुकानात भीषण स्फोट झाला. इमारतीच्या तळ मजल्यावर एकूण ७ गाळे व एकूण २४ रूम आहेत व तळ मजल्यावरील मागील बाजूस ४ रूम आहेत. त्यात एकूण ७६ रहिवासी राहत होते. त्यांना महानगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात कौसा येथील शिमला पार्क शाळेत ठेवण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आसपासच्या इमारतीतील काचा फुटल्या.

  • 25 Nov 2023 03:55 PM (IST)

    2024 मध्ये मोदीच पंतप्रधान होतील- चंद्रशेखर बावनकुळे

    527 वर्षांपासून राममंदिराची वाट पाहिली जातं आहे. ते स्वप्न पूर्ण झाले. मुस्लिम माहिलां देखील भापला मतदान करणार कारण त्यांचा संसार वाचवण्याचं काम मोदींनी केल आहे. महिला आनंदी आहेत, नवीन संसद भावनात पहिला कायदा महिलांना आरक्षण देण्याचे काम केले. त्यामुळे 2024 मध्ये मोदीच पंतप्रधान होतील, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

  • 25 Nov 2023 03:45 PM (IST)

    रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर कार्यकर्ते आक्रमक

    उदयनगर, भामखेड तसेच पेठ येथे टायर जाळलं आहे.  कुठलाही गुन्हा केलेला नसताना तुपकर यांना अटक केल्याचा आरोप रविकांत यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी केला आहे.

  • 25 Nov 2023 03:30 PM (IST)

    छगन भुजबळ यांची इंदापूरमध्ये 9 डिसेंबर होणार सभा

    छगन भुजबळ यांची  9 डिसेंबर रोजी इंदापूर येथे सभा होणार आहे. त्यापूर्वी पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी मध्ये रॅली काढून त्यांचे जंगी स्वागत पुरंदर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे..

  • 25 Nov 2023 03:15 PM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या निषेधार्थ पत्ते खेळून आंदोलन

    धुळ्यातील पांजरा नदी किनारी नूतन उद्यानाच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.

  • 25 Nov 2023 03:00 PM (IST)

    रविकांत तुपकर यांच्या अटकेचा शेतकऱ्यांकडून निषेध

    बुलढाणा : रविकांत तुपकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ चिखली तालुक्यातील पेठ येथे रस्त्यावर टायर जाळून निषेध. शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून केला निषेध.

  • 25 Nov 2023 02:55 PM (IST)

    9 डिसेंबरला छगन भुजबळ यांचे सासवड ते जेजुरी रॅली काढत होणार जंगी स्वागत

    पुणे : छगन भुजबळ यांची इंदापूर येथे सभा होणार असून त्यापूर्वी पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी मध्ये रॅली काढून त्यांचे जंगी स्वागत पुरंदर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी पुणे येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमास छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. पुरंदर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने सभा घेण्याची देखील मागणी यावेळी करण्यात येणार आहे. ओबीसी व मराठा समाज प्रत्येक गावात एकत्रित गुण्या गोविंदाने नांदत असताना मराठा समाजाला आरक्षण जरूर मिळावे पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे अशी देखील मागणी पुरंदर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

  • 25 Nov 2023 02:45 PM (IST)

    अजित पवार गटाचे उपाध्यक्ष प्रशांत भिसे यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई अजित पवार गटाचे उपाध्यक्ष प्रशांत भिसे यांनी आज मातोश्रीवर आपल्या सहकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

  • 25 Nov 2023 02:40 PM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे धुळ्यात आगमन

    धुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे धुळ्यात आगमन. बावनकुळे यांचे धुळ्यात भव्य स्वागत. भाजप कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी बावणकुळे धुळ्यात. भाजपा कार्यकर्त्यांना करणार संबोधित. हर घर अभियाणाची सुरुवात करणार. घराघरात जाऊन पत्रकाचे वाटप करणार.

  • 25 Nov 2023 02:35 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुन्हा पुणे दौरा

    पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर येणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत अमित ठाकरे देखील येणार आहेत. 27 नोव्हेंबर पासून दोघेही 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येणार आहे. पुण्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे पुण्यात पक्ष संघटनेच्या महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

  • 25 Nov 2023 02:22 PM (IST)

    रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी घेतले ताब्यात.

    बुलढाणा : रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुपकर यांना काल पोलिसांनी आंदोलन न करण्याची नोटीस दिली होती. सोयाबीन कापूस प्रश्नावर तुपकर यांनी मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचं तुपकर यांनी म्हटले आहे.

  • 25 Nov 2023 02:22 PM (IST)

    देशात नव्हे तर जगात एकच हिंदू हृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे – उद्धव ठाकरे

    मुंबई : एक निवडणूक जिंकलो आपण, पुन्हा आपण जिंकू. पालघरमध्ये मी भेटी-गाठी साठी दौरा करणार आहे. जनतेला काय पाहिजे हे सरकारला कळत नसेल तर जनतेचा आवाज शिवसेना बनेल. मी जेव्हा जाहीर सभा घेईन तेव्हा बोलेनच. मी कोणा व्यक्ती विरोधात नाही, मी वृत्ती विरोधात आहे. समोर दिसत असलेली हुकूमशाही तोडून मोडून टाकली नाही तर पुन्हा कधीच होणार नाही. पालघरमध्ये सभा घेईन. ठाण्यातून देखील अनेकजण आले आहेत. सत्ताधारी पक्षाकडे लोकं जात असतात. या देशात नव्हे तर जगात देखील एकच हिंदू हृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे. ती ही उपाधी चोरु पाहतायेत. या राजकारणातील गद्दारांना गाडायला मला वेळ लागणार नाही. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

  • 25 Nov 2023 02:16 PM (IST)

    कल्याण स्टेशन परिसरात मध्यरात्री वाहनांना नो एन्ट्री

    कल्याण : कल्याण स्टेशन परिसरात 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत सर्व वाहनांना नो एंट्री असणार आहे. कल्याण स्टेशन परिसरातील स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे 14 गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडी होऊ नये या साठी स्टेशन परिसरात येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांना पर्यायी रस्ता दिला जाणार आहे.

  • 25 Nov 2023 02:15 PM (IST)

    वाचाळविरांनी क्षमतेपेक्षा जास्त बोलू नये- चंद्रशेखर बावनकुळे

    वाचाळविरांनी क्षमतेपेक्षा जास्त बोलू नये, माझी जेवढी औकात आहे, तेवढच मी बोललं पाहिजे. औकातीत जेव्हढे आहे तेवढंच केलं पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

  • 25 Nov 2023 01:58 PM (IST)

    Maharashtra News : हिंदू ह्रदय सम्राट फक्त एकच ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे – उद्धव ठाकरे

    हिंदू ह्रदय सम्राट फक्त एकच ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेकडो कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज सकाळ पासूनच मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.

  • 25 Nov 2023 01:54 PM (IST)

    Maharashtra News : मुंबई, ठाण्यातील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

    मुंबई, ठाणे , पालघरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश सुरू आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे स्वःता हजर आहेत.

  • 25 Nov 2023 01:45 PM (IST)

    Maharashtra News : शिर्डीच्या साईबाबाच्या द्वारकामाईमध्ये तुलसी विवाह संपन्न

    शिर्डीच्या साईबाबाच्या द्वारकामाईमध्ये तुलसी विवाह संपन्न पडला. परंपरेनुसार तुलसी विवाह संपन्न पडला. श्री गणेश पुजन नैवेद्य दाखवणं असे कार्यक्रम संपन्न. विवाहाला साई भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे.

  • 25 Nov 2023 01:31 PM (IST)

    Maharashtra News : राहूल गांधींचं वंचित बहूजन आघाडीला पत्र

    राहूल गांधींनी वंचित बहूजन आघाडीला पत्र पाढवलं आहे. आजच्या सभेला उपस्थित राहू शकत नाही याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. राहूल गांधी यांनी वंचितच्या सभेला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 25 Nov 2023 01:25 PM (IST)

    Maharashtra News : संजय राऊत उद्धव ठाकरेंना लागलेली पनवती- प्रतापराव जाधव

    संजय राऊत उद्धव ठाकरेंना लागलेली पनवती आहेत त्यांच्या मुळेच पक्ष फुटला अशी प्रतिक्रीया प्रताप जाधव यांनी दिली आहे.

  • 25 Nov 2023 01:17 PM (IST)

    Maharashtra News : समाजात कटूता निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी- अजित पवार

    प्रत्येकाला आपल्या समाजाबद्दल मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे मात्र समाजात कटूता निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजिप पवार यांनी मांडले आहे. सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून अनेकांच्या तिखट प्रतिक्रीया येत आहे. त्या अनुशंगाने अजित पवार यांनी आपले मत मांडले. तर अजित पवारांनी त्यांच्याच माणसांना समज दिल्यास बरं होईल, असं जरांगे पाटिल म्हणाले.

  • 25 Nov 2023 01:05 PM (IST)

    Maharashtra News : जामखेडमध्ये धनगर बांधवांचं उपोषण मागे

    जामखेडमध्ये धनगर समाजाचे आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. ते आता मागे घेण्यात आले आहे. नवव्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आले

  • 25 Nov 2023 12:50 PM (IST)

    राजधानी नवी दिल्लीत प्रदूषण कायम

    नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत प्रदूषण कायम आहे. दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स अजूनही गंभीर श्रेणीमध्येच आहे. लोधी रोड परिसरातील AQI 344 ची नोंद झाली आहे. धुक्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी प्रदूषणामध्ये विषारी घटकांचे प्रमाण अजूनही कायम आहेत.

  • 25 Nov 2023 12:35 PM (IST)

    “..तर आगामी निवडणुकीत चारी मुंड्या चित करून मी भगवा झेंडा घेऊन येईन”

    “माझ्या नशिबात असेल तर आगामी निवडणुकीत चारी मुंड्या चित करून मी भगवा झेंडा घेऊन येईन. नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईन. माझ्या नशिबात नसेल तर पुन्हा येणार नाही,” असं गुलाबराव पाटील म्हणाले. जळगावातील पाळधी इथल्या भजनी मंडळांना साहित्य वाटप कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर भाषणात फटकेबाजी केली.

  • 25 Nov 2023 12:20 PM (IST)

    20 मंत्री एकमेकांविरोधत उभे राहिलेत- विजय वडेट्टीवार

    20 मंत्री एकमेकांविरोधत उभे राहिलेत. तिघांनाही एकत्र बसवून समजवण्याची दिल्लीतील हायकमांडवर वेळ आल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

  • 25 Nov 2023 12:06 PM (IST)

    भाजप हिंदुत्व म्हणतं पण मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी कुठलाही फंड दिला नाही- प्रियांका चतुर्वेदी

    “आमच्या देशात एक चीफ फेक आहेत. ते भाजपच्या माध्यमातून काम करत आहेत. भाजप हिंदुत्व म्हणतं पण मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी कुठलाही फंड दिला नाही. या कामासाठी त्यांना सीएसआर फंड किंव इतर काहीच दिलं नाही. आमचा पक्ष हिंदुत्ववादी विचाराचा आहे म्हणून आम्ही ते काम पूर्ण केलं,” असा टोला उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी लगावला.

  • 25 Nov 2023 11:33 AM (IST)

    Live Update : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचारी संपाचा आरोग्य यंत्रणेवर परिणाम

    राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचारी संपाचा आरोग्य यंत्रणेवर परिणाम… कुपोषित बालकांवर उपचार आणि देखभाल केंद्र बंद असल्याने कुपोषण वाढण्याची भीती… राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेले तेराशे कर्मचारी आणि अधिकारी संपावर असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर परिणाम…

  • 25 Nov 2023 11:26 AM (IST)

    Live Update : मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय

    मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ९ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे सध्याचा फलाट क्रमांक एक हा फलाट क्रमांक आठ होणार असून अन्य बदल देखील करण्यात आले आहेत.

  • 25 Nov 2023 11:10 AM (IST)

    Live Update : कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक आल्याने कांद्याचे भाव कोसळले

    सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक आल्याने कांद्याचे भाव कोसळले आहेत. चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल 25 ते 30 रुपये प्रति किलो दर आहे. मागील महिन्यात कांद्याला 60 ते 70 रुपये भाव होता. आवक वाढल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण

  • 25 Nov 2023 10:59 AM (IST)

    ठाण्यात भाजपला मोठा धक्का ,दिव्यातील माजी महिला शहर अध्यक्षा ज्योती पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

    ठाण्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दिव्यातील माजी महिला शहर अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ज्योती पाटील या महिलांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत असतात, मात्र भाजपने डावलल्याने त्या नाराज आहेत.

    शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता त्या शेकडो महिलांसह, मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील.

  • 25 Nov 2023 10:56 AM (IST)

    धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्यांची जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे घेणार भेट

    जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे तसेच मंत्री संदिपान भुमरे हे धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहे.

    जालना जिल्ह्यातील जामखेड येथे धनगर समाजाचे गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी हे आंदोलक आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांच्या आंदोलनाचा नववा दिवस आहे.

  • 25 Nov 2023 10:39 AM (IST)

    संजय राऊत स्वत:च पनवती – प्रतापराव जाधव यांची टीका

    संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना लागलेली पनवती आहेत, अशी टीका खासदार प्रतापराव जाधव यांनी केली. राऊतांना (इतरांना) पनवती म्हणण्याचा काय अधिकार, ते स्वत:च पनवती आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

    राऊत यांनी गोव्यात जाऊन ज्यांचा प्रचार केला, त्यांना तीन अंकातही मतं मिळाली नाहीत. राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली अशी टीकाही जाधव यांनी केली.

  • 25 Nov 2023 10:32 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा कराड दौरा रद्द

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा कराड दौरा रद्द झाल्याचे वृत्त आहे. कालपासून मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ते हैदराबाद येथील कार्तिका कोटी दीपोत्सवात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • 25 Nov 2023 10:25 AM (IST)

    हिंगोली – हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव, हरभरा पिके धोक्यात

    हिंगोली जिल्ह्यात सत्तत बदलत असलेल्या वातावरणामुळे हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकांना फटका बसत आहे. कृषीविभागाने शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

  • 25 Nov 2023 10:16 AM (IST)

    अशा पद्धतीचे राजकारण एकनाथ खडसेंना शोभत नाही – खासदार उन्मेष पाटील यांची टीका

    गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन यांच्यावर टीका करणाऱ्या एकनाथ खडसे यांना खासदार उन्मेष पाटील यांनी सुनावले. एकनाथ खडसे यांचा राजकारणाचा खूप मोठा अनुभव आहे. मात्र असं असतानाही ते ज्या पद्धतीने गिरीश महाजन यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहे. त्याचा आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. अशा पद्धतीचे राजकारण एकनाथ खडसेंना शोभत नाही असे पाटील म्हणाले.

  • 25 Nov 2023 10:07 AM (IST)

    दिवाळीत नागरिकांची समृद्धी महामार्गाला पसंती

    दिवाळीत नागरिकांची समृद्धी महामार्गाला पसंती, १ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान लहान-मोठ्या सव्वा पाच लाख वाहनांचा समृद्धीवरून प्रवास. पुणे, मुंबई, अमरावती, अकोला अशा प्रमुख शहराच्या चाकरमान्यांनी दिली समृध्दी महामार्गाला पसंती.

  • 25 Nov 2023 09:57 AM (IST)

    पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे मुस्ती गावातील नागरिक हैराण

    पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे मुस्ती गावातील नागरिक हैराण झालेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात पोल्ट्री फार्ममुळे शेतकरी त्रस्त झालेत. पोल्ट्रीतील कोंबड्यामुळे शेतीपिकात अनेक जनावरे येत आहेत. त्यामुळे शेतीपिकाचे नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. दरम्यान प्रशासनाने या पोल्ट्री फार्मवर तात्काळ निर्बंध न आणल्यास युवा भीमसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

  • 25 Nov 2023 09:45 AM (IST)

    वर्धा मार्गावरील पुलाचं काम, ठरणार वाहतुकीसाठी डोकेदुखी

    नागपूर च्या हिवाळी अधिवेशनात होणाऱ्या गर्दीसाठी शहरातील दोन निर्मानधीन पूल अडथडा ठरणार आहे. अधिवेशना दरम्यान वाहतूकीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. वर्धा रोड वरील पंचशील चौकात पावसात खचलेला पूल आणि विद्यापीठ लायब्ररी जवळी पुलाच काम सुरू आहे. दोन्ही पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होणार आहे.  अधिवेशना दरम्यान शहीद गोवारी उड्डाणपूल सुद्धा बंद असण्याची शक्यता आहे.

  • 25 Nov 2023 09:30 AM (IST)

    इंद्रायणी भाताची कापणी अंतिम टप्प्यात

    पुण्यातील मावळमध्ये भात पिकांच्या आगारात इंद्रायणी भाताची कापणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. भात कापणीसाठी मजूर मिळेल म्हणून मावळ कृषी खात्याकडे शेतकऱ्यांनी भातकापणी साठी यंत्राची मागणी केली होती. मात्र तेरा हजार पाचशे हेक्टरवर मावळात भात शेती असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर भात यंत्र कापणीची कमतरता आहे. शेतकऱ्यांना थोडीशी वाट पाहावी लागली.  सध्या किन्हई गावात भात कापणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हे यंत्र एका तासात दोन एकर भाताचे क्षेत्र कापून भाताचे दाणे एकत्रित करते. त्यामुळे शेतकऱ्यांना भात झोडपणी करण्याची वेळ येत नाही.

  • 25 Nov 2023 09:15 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात कुणबी दाखले शोधण्यासाठी अडचणी

    सोलापूर जिल्ह्यात मोडी लिपीतील कुणबी दाखले शोधण्यासाठी अडचणी येत आहेत.  जिल्ह्यात मोडी लिपीचे जाणकार आणि अनुवादक कमी असल्याने अनेक कागदपत्रे धुळखात पडली. जिल्ह्यात केवळ 19 प्रमाणपत्रधारक मोडीलिपीचे अभ्यासक असून त्यांच्यामार्फत कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे.  यातील अनेकांना मोडी लिपी लिहिता येते मात्र वाचता येत नसल्याचे अडचण येतेय. जिल्हा प्रशासन आणि आत्तापर्यंत 50 लाखापेक्षा अधिक कागदपत्रे तपासणी असून त्यात 31 हजार पेक्षा अधिक कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

  • 25 Nov 2023 08:47 AM (IST)

    Pune news | स्मार्ट पुण्यात आरोग्य योजना केवळ नावाला

    स्मार्ट आरोग्य योजनेची पुण्यात फक्त 3 ते 5 टक्के लोकांनाच फायदा झाल्याची माहिती समोर. एका खाजगी संस्थेने केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याची माहिती समोर.

  • 25 Nov 2023 08:34 AM (IST)

    Jalna news | अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणातील आरोपीला अटक

    अंतरवली सराटी दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक. जालना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक. काल सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास केली अटक. अंबड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आरोपींचा मुक्काम. अंबड पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. आज सकाळी 11 वाजता अंबड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात करणार हजर

  • 25 Nov 2023 08:18 AM (IST)

    Congress | काँग्रेसच्या माजी आमदाराच्या गाडीला अपघात

    गडचिरोलीतील काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार नामदेवराव उसेंडी नागपूरहून गडचिरोली परतत असताना वाहनाचा मोठा अपघात. माजी आमदाराचे वाहन व एक खाजगी वाहन समोरासमोर मोठी धडक. काँग्रेस पक्षाची मीटिंग संपवून नागपूरहून परत गडचिरोली येत असताना राञी झाला अपघात. माजी आमदार व त्यांच्यासोबत असलेले सर्व सुखरूप. मोठी जीवीत हानी टळली. वाहनाचे खूप मोठे नुकसान. आमदार उसेंडी यांनी दिली महिती

  • 25 Nov 2023 07:58 AM (IST)

    Marathi News | मोबाईलवर बोलणाऱ्यांवर कारवाई होणार

    पीएमपीच्या बस चालकांना प्रशासनाने इशारा दिला आहे. चालक मोबाईलवर बोलताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. काही चालक बेजबाबदार पद्धतीने गाड्या चालवतात त्याचा त्रास सहन करावा लागतोय, अशा तक्रारी पीएमपी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.

  • 25 Nov 2023 07:44 AM (IST)

    Marathi News | अजित पवार आज पुण्यात

    अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहे. पुणे येथील विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कामांचा आढावा घेतील. त्यानंतर दुपारी प्रशासनासोबत बैठक आयोजित करण्यात आलीं आहे. आज सारथीच्या नवीन इमारतीच्या कामाचा दादा आढावा घेणार आहेत.

  • 25 Nov 2023 07:34 AM (IST)

    Marathi News | राजस्थानमध्ये मतदानास सुरुवात

    राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा दरम्यान मतदान होणार आहे. भाजप आणि काँग्रेसने आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे.

Published On - Nov 25,2023 7:22 AM

Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.