घरात नेहमी नॉनव्हेज बनतं, लग्नाच्या सहा महिन्यात पत्नीकडून घटस्फोटाची मागणी

हरियाणाच्या पानिपतमध्ये घटस्फोटाची एक आश्चर्यकारक प्रकरण पुढे आलं आहे. येथे खाण्याच्या आवडी-निवडीवरुन एक दाम्पत्य घटस्फोट घ्यायला निघालं आहे.

Wife Divorce Non-Vegetarian Husband, घरात नेहमी नॉनव्हेज बनतं, लग्नाच्या सहा महिन्यात पत्नीकडून घटस्फोटाची मागणी

चंदीगड : हरियाणाच्या पानिपतमध्ये घटस्फोटाची एक आश्चर्यकारक प्रकरण पुढे आलं आहे (Wife Divorce Non-Vegetarian Husband). येथे खाण्याच्या आवडी-निवडीवरुन एक दाम्पत्य घटस्फोट घ्यायला निघालं आहे. पती मांसाहारी आहे, म्हणून पत्नीने लग्नाच्या सहा महिन्यातच घटस्फोट मागितला आहे (Wife Divorce Non-Vegetarian Husband). विशेष म्हणजे या दोघांनी प्रेम विवाह केला होता. हे दोघे वेगवेगऴ्या धर्माचे असून संबंधित पती हा मांसाहारी तर पत्नी शाकाहारी आहे. लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यातच यांचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलं आहे. या प्रकरणात पत्नीला पतीच्या मांसाहारी असण्यावर आक्षेप आहे. घरी दर दुसऱ्या दिवशी मांसाहारी जेवण बनतं यामुळे तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सासरी दर दुसऱ्या दिवशी मांसाहारी जेवण बनत असल्याने कंटाळून मुलगी तिच्या माहेरी निघून केली. त्यानंतर तिने न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. मुलीच्या मते, “मुलाने लग्नापूर्वी तो मांसाहारी असल्याचं सांगितलं होतं. मात्र, दर दुसऱ्या दिवशी घरात मांसाहारी जेवण बनतं आणि खाल्लं जातं, हे सांगितलं नव्हतं”. “मला वाटलं की तो बाहेर नॉनव्हेज खात असेन, मात्र लग्नानंतर मला माहित झाले की घरात नेहमीच ते बनतं”, असं मुलीने सांगितलं.

हे प्रकरण संरक्षण अधिकारी रजनी गुप्ता यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दोघांना बोलावून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘जर मुलगा घरच्यांना सोडून वेगळा राहायला तयार असेल तर घटस्फोट नको’, अशी मागणी मुलीने केली आहे. तर ‘घरच्यांच्या संमतीने लग्न झालं, आता त्यांना कसं सोडू?’, असं मुलाचं म्हणणं आहे. तसेच, लग्नापूर्वी मुलीला सर्व कल्पना दिल्याचा दावा मुलाने केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *