Vijay Mallya: ती माझी सर्वात मोठी चूक… अचानक विजय मल्ल्याने अशी पोस्ट का केली? थेट कोर्टला…
Vijay Mallya Post Viral: विजय मल्ल्याने नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टची चर्चा होत आहे. या पोस्टातून त्याने एक सवाल विचारला आहे,

Vijay Mallya Post: बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे संस्थापक आणि युनायटेड ब्रुअरीज ग्रुपचे माजी अध्यक्ष विजय मल्ल्या यांच्यावर बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकांनी त्यांच्याकडून जास्त शुल्क आकारले असल्याचा त्यांचा दावा आहे. बँकांनी थकीत रक्कम परत करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या एका संघाने अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाला कळवले की, ऑगस्ट महिन्यापर्यंत मल्ल्यांकडून अंदाजे ₹८,७५२ कोटी वसूल करणे बाकी आहे.
दरम्यान, मल्ल्या यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला एक आदेश जोडून इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. मल्ल्या यांनी लिहिले, “कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला आदेश. मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की तो काळजीपूर्वक वाचा. मी अजूनही चोर किंवा फसवणूक करणारा आहे का? मी माझ्या स्वतःच्या पैशाने राजासारखे आलिशान जीवन जगलो आणि तोच माझा सर्वात मोठा गुन्हा ठरला. मला याची शिक्षा मिळत आहे. देव सर्वांसाठी सारखा असतो, एक दिवस मला न्याय मिळेल.”
लंडनमध्ये राहणाऱ्या विजय मल्ल्याने, आपल्यावरील फौजदारी खटले रद्द करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बँकांनी त्यांची संपूर्ण थकबाकी वसूल केल्यामुळे त्यांच्यासोबतचा वाद मिटला आहे, असा युक्तिवाद त्याने केला होता. एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या एका संघाने अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाला कळवले की, ऑगस्ट महिन्यापर्यंत मल्ल्याकडून अंदाजे ८,७५२ कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे, तर कर्ज वसुली अधिकाऱ्यांनी आतापर्यंत १०,२७० कोटी रुपये वसूल केले आहेत.
बँकांनी न्यायालयाला असेही कळवले की, या प्रकरणात जप्त केलेले काही शेअर्स सुरक्षित असून त्यांची विक्री झालेली नाही. बँकांनी कर्ज वसुली न्यायाधिकरण (DRT) आणि जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री किंवा ती परत मिळवून वसुली करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे, ईडी आणि सीबीआयने किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जासंदर्भात बँक फसवणूक, गुन्हेगारी कट आणि मनी लाँडरिंगच्या आरोपांखालील प्रकरणांचा पाठपुरावा केला आहे.
ईडीचे म्हणणे आहे की, वसुलीमुळे दिवाणी दावे निकाली निघत असले तरी, त्यामुळे PMLA अंतर्गत सुरू असलेली फौजदारी कारवाई आपोआप संपुष्टात येत नाही. मल्ल्याने असा युक्तिवाद केला होता की, त्याच्या कर्जदारांकडून झालेली वसुली त्याच्या थकीत रकमेपेक्षा जास्त आहे आणि त्याच्याविरुद्धची कारवाई रद्द करावी. मल्ल्या मार्च २०१६ मध्ये परदेशात फरार झाला. सरकारने त्याला फरारी घोषित केले आहे.