AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : एका महिन्यात 8.2 लाखांचा व्यवसाय! जोडप्याची ‘ती’ बिझनेस आयडिया झाली हिट; जान्हवी कपूरही झाली फॅन

बंगळूरूमधील एका जोडप्याने स्वत: चा ब्रँड सूरू केला. अवघ्या 5 लाख रूपयांच्या सुरूवातीच्या भांडवलातून सुरू झालेल्या या व्यवसायाने सहा महिन्यांत सुमारे 16 लाख रूपयांचा टप्पा गाठला. विशेष म्हणजे मार्च 2026 मध्ये त्यांच्या ब्रँडने केवळ एका महिन्यात 8.2 लाख रूपयांचा व्यवसाय सुरू केला.

Success Story : एका महिन्यात 8.2 लाखांचा व्यवसाय! जोडप्याची ‘ती’ बिझनेस आयडिया झाली हिट;  जान्हवी कपूरही झाली फॅन
| Updated on: Nov 27, 2026 | 5:03 PM
Share

नोकरी किंवा पारंपरिक व्यवसायाच्या पलीकडे जाऊन स्वत:व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. मात्र बाजारात नेमकी कशाची डिमांड आहे. हे ओळखणं महत्त्वाचं असते. बंगळूरूमधील जुओला आणि अर्शिन या पती – पत्नीने अशीच एक संधी ओळखली आणि फोन कव्हरचा स्वत:चा ब्रँड सूरू केला. अवघ्या 5 लाख रूपयांच्या सुरूवातीच्या भांडवलातून सुरू झालेल्या या व्यवसायाने सहा महिन्यांत सुमारे 16 लाख रूपयांचा टप्पा गाठला. विशेष म्हणजे मार्च 2026 मध्ये त्यांच्या ब्रँडने केवळ एका महिन्यात 8.2 लाख रूपयांचा व्यवसाय सुरू केला.

बाजारातील कमतरता ओळखून सुरू केला व्यवसाय

जुओला आणि अर्शिन यांनी भारतीय मोबाईल अॅक्सेसरीज बाजारात एक वेगळी संधी पाहिली. बाजारात आकर्षक दिसणारे फोन कव्हर मिळत होते. पण ते अनेकदा टिकाऊ नसतं. तर मजबूत कव्हर दिसायला साधे असायचे. विशेषत: महिलांना आवडतील असे स्टायलिश आणि मजबूत फोन कव्हर उपलब्ध होण्यात कमतरता होती.

हीच गरज लक्षात घेऊन या दोघांनी मार्च 2025 मध्ये कियोको या ब्रँडची सुरूवात केली. यासाठी त्यांनी सुरूवातीला पाच लाख रूपयांचे भांडवलं गुंतवलं. फॅशन आणि चांगली गुणवत्ता या दोन्ही गोष्टी एकाच उत्पादनात देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

घेतलेलं MBA चे शिक्षणं, मिळालेल्या पदव्या सगळं सोडून दोघांनी एकत्र करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरूवातीला उत्पादक शोधणे, मालाची वाहतूक आणि उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल मागवण्याची अट अशा अनेक अडचणी आल्या. काही वेळा खराब दर्जाचा मालही मिळाला. तरीही त्यांनी उत्पादनाच्या गुणवत्तेशी तडजोड केली नाही.

खूशी कपूरच्या व्हिडिओमुळे व्यवसायाला मिळाली चालना

सुरूवातीच्या काळात त्यांना इन्स्टाग्रामवरील संदेशांमधून महिन्याला केवळ 10 ते 20 ऑर्डर मिळत होत्या, त्यानंतर या दोघांनी स्वत:च्या व्यवसायामागची मेहनत, उत्पादन तयार करण्याची प्रक्रिया, पॅकिंग आणि इतर कामांचे छोटे व्हिडिओ आणि मिनी व्लॉग्स सोशल मीडियावर शेअर करायला सुरूवात केली.

एकदा त्यांनी अभिनेत्री खूशी कपूरला त्यांच्या ब्रँडचं फोन कव्हर दिलं आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऑर्डरमध्ये मोठी वाढ झाली. एका दिवसात 100 हून अधिक ऑर्डर मिळाल्या. यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूरनेही स्वत:साठी फोन कव्हर मागवले. आलिया कश्यप आणि संजना गणेशन प्रसिद्ध व्यक्तींनीही त्यांच्या ब्रँडची उत्पादने वापरली.

एका महिन्यात 8.2 लाख रूपयांचा व्यवसाय

कियोको ब्रँडने ऑक्टोबर 2025 मध्ये 1.1 लाख रूपयांच्या फायद्यातून सुरूवात केली. जानेवारी 2026 मध्ये हा फायदा 1.7 लाख रूपये झाला, तर फेब्रुवारीमध्ये 2.6 लाख रूपयांपर्यंत पोहोचला. मार्च 2026 मध्ये ब्रँडची अधिकृत वेबसाईट सुरू झाली आणि जान्हवी कपूरशी संबंधित व्हिडिओलाही चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर एका महिन्यातच त्यांना 8.2 लाखांचा फायदा झाला.आतापर्यंत 1,400 हून अधिक ग्राहकांनी त्यांच्या उत्पादनांची खरेदी केली आहे.

आता व्यवसाया वाढवण्याची तयारी

आता जुओला आणि अर्शिन यांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे. अँड्रॉइड फोन,एअरपॉड्स आणि आयपॅडसाठीही कव्हर उपलब्ध करून देण्याची त्यांची योजना आहे. याशिवाय टीम वाढवून व्यवसायाचा महसूल दुप्पट करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.

Follow Us
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया