Vinod Tawde : बिहारनंतर आता उत्तर प्रदेशात ‘खेला होबे’; विनोद तावडे यांच्यासमोर काय आव्हाने असणार? भाजप नेता काय जादू करणार?

बिहारनंतर आता उत्तर प्रदेशात 'खेला होबे' होणार आहे. या निवडणुकीत विनोद तावडे यांच्यासमोर काय आव्हाने असणार, जाणून घेऊयात .

Vinod Tawde : बिहारनंतर आता उत्तर प्रदेशात खेला होबे; विनोद तावडे यांच्यासमोर काय आव्हाने असणार? भाजप नेता काय जादू करणार?
vinod tawde
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 20, 2026 | 1:47 PM

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नवीन मोहरे राष्ट्रीय राजकारण्याच्या मंचावर आणले आहेत. यात भाजपचे दिग्गज नेते विनोद तावडे यांचाही समावेश आहे. विनोद तावडे यांना कार्यकारिणीत महासचिवपदी कायम ठेवलं आहे. तसेच विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी पद म्हणून अतिरिक्त जबाबदारी देखील दिली आहे. बिहारच्या निवडणुकीत भाजपचा दबदबा निर्माण केल्यानंतर आता उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंतची तावडे यांना सर्वात मोठी दिल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशात विनोद तावडे यांच्यासमोर काय आव्हाने असणार, याकडे साऱ्याचं लक्ष लागलं आहे.

भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी तावडे यांनी उत्तर प्रदेशचे प्रभारी केलंय. तर जगदीश पटेल यांना पटेल यांना सहप्रभारी केलं आहे. सध्या उत्तर प्रदेशचा बालेकिल्ला मानला जात आहे. तावडे यांच्यावर भाजपकडून विश्वास दाखवला जात आहे. तावडे हे मराठा समाजातून येतात. तर जगदीशभाई पटेल हे कुर्मी समाजातून येतात. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैर यादव असलेला ओबीसी आणि कोअर मतदारांचं नियंत्रण तावडेंना ठेवावं लागणार आहे.

समाजवादी आणि बसपाचा मतदार

भाजपला 2024 सालच्या निवडणुकीत मोठा फटका बसला होता. समाजवादी आणि बहुजन समाजाचा (BSP) मतदार वळवण्याचेही आव्हान तावडेंना असणार आहे. मायावती या देखील ब्राह्मण आणि दलित मतदारांना जवळ करत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कारकि‍र्दीचे दोन टर्म झाले आहेत. त्यांच्या कारकि‍र्दीवर काही प्रमाणात रोष निर्माण झाल्याचेही बोललं जात आहे.

देणगी चोरीचा मुद्दा 

काही महिन्यांपूर्वी अयोध्येच्या मंदिरात चोरी झाल्याची देखील घटना घडली. लोकसभा निवडणुकीत राम मंदिर असलेल्या मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. आताही राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरण गाजत आहे. यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. याअर्थी विकासासहित हिंदुत्वाचा मुद्दा देखील भाजपला हाती घ्यावा लागणार आहे. भाजपला मित्र पक्षांची तिकीट वाटपावरून होणाऱ्या नाराजीवर देखील तोडगा काढावा लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us