AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! अभिजीत दीपके अचानक ढसाढसा रडला… म्हणाला, जेव्हा मी… नेमकं काय घडलं?

कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या एका व्हिडीओत भावूक होऊन रडले. कुटुंबाची चिंता आणि भारतात येण्यापूर्वीच्या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. जंतरमंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर त्यांनी अमेरिकेतून भारतात येण्याच्या धाडसी निर्णयामागील कारणे आणि या आंदोलनातून शिकलेले धडे स्पष्ट केले.

सर्वात मोठी बातमी ! अभिजीत दीपके अचानक ढसाढसा रडला... म्हणाला, जेव्हा मी... नेमकं काय घडलं?
abhijeet dipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 11:57 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या एका व्हिडीओत ढसाढसा रडताना दिसत आहेत. जंतरमंतरवर एक महिना आंदोलन करून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणारे दीपके यांनी एका मुलाखतीत अमेरिकेतून भारतात आल्यावर काय काय चिंता होत्या या स्पष्ट केल्या. या आठवणीने ते भावूक झाले. त्याचवेळी कुटुंबाविषयी बोलताना दीपकेंना भावना अनावर झाल्या आणि ते ढसाढसा रडू लागले. दीपकेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिजीत दीपके यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये ‘ओपिनियन’ कॅटेगिरीत एक डॉक्युमेंट्री रिलीज केली आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये दीपके स्वत: सीजेपी आंदोलनावर विस्तृतपणे बोलताना दिसत आहेत. त्यांनी एका अमेरिकन वृत्तपत्राच्या युट्यूबवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यात त्यांनी बोस्टनमध्ये कसे शिक्षण घेताना सोशल मीडियावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची एक टिप्पणी कशी वाचली. त्यानंतर गंमत म्हणून कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने एक हँडल तयार केलं. त्यानंतर हे नाव हीट झालं. इन्स्टावर मिळालेल्या प्रतिसादापासून भारतात येऊन आंदोलन करण्यापासून ते सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयापर्यंत काय काय घडलं याची विस्तृत माहिती या व्हिडिओत दीपकेंनी दिली आहे.

कुटुंबाची चिंता होती…

भारतात आल्यावर तुरुंगात जाण्याबाबतची शंका आणि कुटुंबाविषयी वाटणारी चिंता याची माहितीही त्यांनी या व्हिडीओत दिली आहे. जेव्हा विमान भारताच्या जवळ आलं होतं, तेव्हा मी हिमालय पर्वत पाहत होतो. आता मी शेवटचंच मोकळं आकाश पाहणार आहे, असं मला वाटत होतं. पण मला सर्वाधिक काळजी माझ्या कुटुंबाची होती, असं म्हणताना अभिजीत दीपके या व्हिडीओत ढसाढसा रडतात. त्यानंतर अश्रू पुसत ते स्वत:ला सावरताना दिसत आहेत. दीपकेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अन् आई रडायला लागली

जंतरमंतरवरील आंदोलनातून कोणत्या दोन गोष्टी शिकल्या याची माहितीही त्यांनी दिली आहे. या आंदोलनाने मला दोन गोष्टी शिकवल्या. तुम्हाला निश्चितच भाग्य आणि योग्यवेळेची साथ मिळण्याची आश्यकता असते, हा पहिला धडा मी शिकलो. मी भलेही तेव्हा अमेरिकेत होतो. पण त्यावर मी तुरंत प्रतिक्रिया दिली. आज आमच्याकडे 2.6 कोटी फॉलोअर्स आहेत. हे सर्व दोन महिन्यात झाले. तसेच, तुम्हाला धाडसी व्हावं लागेल आणि दुसरं कोणीच धोका पत्करायला तयार नाही. तुम्हाला तो धोका पत्करावा लागेल, हा दुसरा धडा मी शिकलो. मी परत येण्याचा निर्णय घेतला. कारण मी राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका नाहीये हे मला दाखवून द्यायचं होतं. जेव्हा मी भारतात येण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सर्व प्रथम मी त्याची माहिती माझ्या आईला दिली. माझा हा निर्णय ऐकून माझी आई रडली. तेव्हा मी तिला सांगितलं, धोका आहे. पण हा धोका तर पत्करलाच पाहिजे, असं अभिजीत या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप