मोठी बातमी! अमेरिका, इराणमध्ये पुन्हा युद्धाला सुरुवात , ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, जगभरात मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं आहे. शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे, ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे जगात खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! अमेरिका, इराणमध्ये पुन्हा युद्धाला सुरुवात , ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, जगभरात मोठी खळबळ
Donald Trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 10, 2026 | 9:42 PM

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. तर दुसरीकडे इराणने देखील आपल्या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याने अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली, इराणच्या ड्रोन हल्ल्यामध्ये इस्त्रायलचं प्रचंड नुकसान झालं तसचे अमेरिकेचे सैन्य तळ ज्या ज्या आखाती देशांमध्ये होते, त्या देशांवर देखील इराणकडून भीषण हल्ले करण्यात आले. दरम्यान त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला, त्यामुळे जगाने सुटकेचा निश्वास सोडला होता.

परंतु आता जगाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे, इराण आणि अमेरिकेमधील युद्धविराम आता संपल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे अमेरिका इराणसोबत चर्चा सुरू ठेवण्यास देखील तयार आहे, असंही ते म्हणाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही इराणसोबत चर्चा करण्यास तयार आहोत, परंतु आता इराणसोबतचा अमेरिकेचा युद्धविराम संपला आहे. दरम्यान न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, जर समजा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला आणि त्यानंतर त्यांनी इस्त्रायलची मदत मागितली तर पुन्हा एकदा इस्त्रायल या यु्द्धात उडी घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान गुरुवारी अमेरिकेकडून इराणच्या अब्बास पोर्टवर भीषण हल्ला करण्यात आला होता. दोन दिवसांमध्ये इराणचे 14 नागरिक मारले गेल्याचं वृत्त आहे, तर प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील अमेरिकेचे सहकारी देश असलेल्या कुवेत, बहरीन सारख्या देशांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे आता हे युद्ध चांगलंच पेटण्याची शक्यता आहे.

 

Follow Us