खरंच AI 171 फ्लाईट अशुभ होती?, 12 तारीख आणि Flight क्र. 171 यांचा विचित्र योगायोग काय ?

अहमदाबाद येथील विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी याच्या सह 200 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला. बोईंग कंपनीने तयार केलेल्या 787-8 ड्रिमलायनर प्लेनची एअर इंडियातील ओळख AI-171 अशी होती. मात्र या नंबरचे अपघाताशी जुने कनेक्शन आहे.

खरंच AI 171 फ्लाईट अशुभ होती?, 12 तारीख आणि Flight क्र. 171 यांचा विचित्र योगायोग काय ?
ai flight - 171
| Updated on: Jun 16, 2025 | 4:59 PM

230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबसना घेऊन अहमदाबादहून लंडन जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी अहमदाबादच्या  सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टने उड्डाण भरताना काही सेंकदात कोसळले. सध्या या भयानक विमान अपघाताची नेमकी कारणं पुढे आलेली नाहीत. परंतू पायलटने ATC कडे इमर्जन्सी मदत मागितली होती. परंतू पायलटने ATC ला मेडे-मेडे असा संदेश पाठवला. आणि कम्युनिकेशन चॅनल बंद पडले. त्यानंतर नेमके काय झाले हे आता DGCA च्या चौकशीतून पुढे येणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार एअर इंडियाला अपघाग्रस्त विमानासंबंधी DGCA ने अनेक कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत. तर दिल्ली ते अहमदाबादला याच विमानाने काही तासांपूर्वी आलेल्या एका प्रवाशाने या विमानात काही तर असामान्य जाणवत होते अशी पोस्ट केली होती. आता अपघाताची कारणे या विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या डाटाचा तपास केल्यानंतर मिळणार आहेत. नेमके 260  हून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या या विमानात असा काय बिघाड झाला की ते टेक ऑफ न घेताच खाली कोसळले या कारणांचा छडा लावला जाणार आहे.

171 क्रमांकाचे अपघाताशी जुने नाते

हे पहिल्यांदा घडलेले नाही की फ्लाईट क्रमांक 171 अपघाताचे शिकार झाले. गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला त्याचाही क्रमांक क्रमांक 171 च होता. सुमारे पाच दशकांपूर्वी फ्लाईट क्रमांक 171 लाच अपघात झाला होता. त्यामुळे हा विचित्र योगायोग म्हटला जात आहे की एकाच क्रमांकाच्या विमानाचा दुसऱ्यांदा अपघात झाला आहे.

भयावह होती 1976 ची घटना

12 ऑक्टोबर, 1976 रोजी इंडियन एअरलाईन्सच्या फ्लाईट क्रमांक 171 इंजिनात बिघाड झाल्याने आपात्कालिन लँडिंग करताना दुर्घटनाग्रस्त झाले होते. या विमानातील सर्व 95 प्रवासी ठार झाले होते. या अपघातात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या अपघातात काँग्रेस नेते आणि वकील आर. पोन्नप्पन नादर आणि मळ्यालम-तामिल अभिनेत्री राणी चंद्रा यांचा मृत्यू झाला होता. TV9च्या बातमीनुसार या विमानात प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र बसणार होते. परंतू ऐनवेळी त्यांनी बेत रद्द केला होता.

12 तारखेचाही अपघाताशी संबंध

अहमदाबादचा विमान अपघात 12 जून रोजी झाला होता , तर साल 1976 चा अपघातही 12 तारखेलाच झाला होता.जपानमध्ये 1985 मध्ये झालेला विमान अपघातही 12 ऑगस्ट रोजी झाला होता. या अपघातात तब्बल 520 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

माजी मुख्यमंत्री यांचा कारनंबर

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा या अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या प्रत्येक कारमध्ये नंबरप्लेटना लकी क्रमांक 1206 असा होता. आणि अपघातही 12 जून रोजी झालेला आहे.