AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केबिन क्रू आणि फ्लाईट अटेंडेन्टमध्ये फरक काय ? दोघांचे काम वेगळे ? खरे उत्तर तुम्हाला माहीती आहे का?

फ्लाईट अटेंडेन्ट, एअर होस्‍टेस आणि केबिन क्रू या शब्दाचा अर्थ काय ? विमान प्रवास करताना या व्यक्ती घेतात प्रवाशांची काळजी परंतू कोणास काय म्हणतात हे अनेकांना माहीती नाही....

केबिन क्रू आणि फ्लाईट अटेंडेन्टमध्ये फरक काय ? दोघांचे काम वेगळे ? खरे उत्तर तुम्हाला माहीती आहे का?
| Updated on: Jun 16, 2025 | 3:39 PM
Share

जर तुम्ही विमानाने कधी प्रवास केला असेल तर एअर होस्टेसना नक्कीच पाहीले असेल . विशेष पोशाखात असलेल्या एअर होस्टेस विमानात सर्वाधिक काम करताना दिसत असतात. त्या प्रवाशांची काळजी घेतात. त्यांना काय हवे काय नको याची विचारपूस करतात. प्रवाशांनी सीट ब्लेट नीट लावला की नाही याची काळजी घेत असतात. परंतू विमानात एअर होस्टेस नसतात. तर काही फ्लाईट अटेडंन्ट तर काही क्रु मेंबर्स असतात. यात वेगळे काय असा सवाल तुम्हाला पडला असेल. ऑनलाईन प्लॅटफॉर्म क्वारा याला एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर दिले गेले ते मोठे माहितीपूर्ण होते. तर पाहूयात एअर होस्टेस, केबिन क्रु आणि फ्लाईट अटेडन्टमध्ये फरक काय ? आणि पुरुष या पदावर असतील तर त्यांना कोणते नाव आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात.

हवाई वाहतूक एक्‍स्पर्टच्या मते , केबिन क्रू शब्‍द विमानात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना वापरला जातो. विमानात प्रवाशांची काळजी घेणाऱ्यांना सर्वांना केबिन क्रु म्हणतात. या पायलट-को-पायलट, एअर होस्टेस सर्वांचा समावेश होतो. फ्लाईट अटेडेंन्ट केवळ त्याच कर्मचाऱ्यांना म्हटले जाते, जे विमानात प्रवाशांची काळजी वाहतात. त्यांच्या तक्रारी ऐकतात. त्यांची मदत करतात. गेटवर स्वागत करण्यापासून प्रवासाचा शेवट होईपर्यंत फ्लाईट अटेडेंन्टच प्रवाशाची काळजी घेतात. त्यांचे काम प्रवास सुरु झाल्यापासून प्रवास संपल्यानंतरही असते. आपल्याला वाटते जसे आपण विमानातून उतरुन जातो तसे एअर होस्टेस आणि फ्लाईट अटेडेंन्टची ड्यूटी देखील संपते असे नाही.त्यांना नंतर फ्लाईटचे फिडबॅक देखील द्यावा लागतो. प्रवाशांच्या संदर्भात माहीती द्यावी लागते. जर कोणाला मेडिकल इमर्जन्सी झाली तर त्याबाबत विस्ताराने रिपोर्ट तयार करावा लागतो. म्हणजे पुढे चौकशी झाली तर उत्तर द्यायला सोपे होते.

 फ्लाईट स्टीवर्ड कोणाला म्हणतात?

फ्लाईट अटेंडेन्ट देखील दोन प्रकारचे असतात. मह‍िला फ्लाईट अटेंडेंन्टला एअर होस्‍टेस देखील म्हणतात. तर पुरुषांना फ्लाईट स्टीवर्ड या नावाने ओळखले जाते. परंतू आजकाल बहुतांशी लोक विमानातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना फ्लाईट अटेडेन्टच समजतात. केबिन क्रु एक व्यापक शब्द आहे. या विमानात काम करणाऱ्या सर्वच लोकांचा समावेश आहे. हे कर्मचारी विमानाच्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवतात.विमानाचे उड्डाण होताना प्रवाशांना कोणताही धोका होऊ नये याची जबाबदारी त्यांच्यावर असते. यात सिनीयर पायलट, फ्लाईट अटेडेन्ट, पर्सर एवढेच काय तर ऑनबोर्ड शेफ यांचा देखील समावेश आहे. विमानात बसण्यापासून ते विमानातून उतरेपर्यंत प्रवाशांची सर्वच जबाबदारी त्यांच्यावर असते.

सर्व केबिन क्रू फ्लाईट अटेंडेंट नसतात…

काही एअरलाईन्स एक्‍स्‍ट्रा शेफ देखील ठेवतात. म्हणजे प्रवाशांच्या मागणीनुसार डीश तयार केल्या जाव्यात. त्यांना ऑनबोर्ड शेफ नावाने ओळखले जाते. त्यांच्याकडे संपूर्ण किचन नसले तर त्यांच्या अंगभूत कौशल्याने तेथील उपलब्ध सामुग्रीनुसार खास पदार्थ तयार करतात. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास चांगला होतो.त्यामुळे प्रवाशांना फ्लाईट रेस्टॉरंटचा अनुभव घेता येतो. सोप्या भाषेत सांगायचे तर सर्व फ्लाईट अटेडन्ट केबिन क्रु सदस्य असतात. परंतू सर्व केबिन क्रु फ्लाईट अटेडन्ट नसतात.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.