AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plane Crash : ‘आम्हाला 1 कोटी नकोत…आमचे पापा हवेत, मीच तुम्हाला 2 कोटी…,’ फाल्गुनीच्या सवालाने यंत्रणा हादरली..

तुम्ही सुरक्षितपणे उड्डाण करू शकत नसाल तर एअर इंडिया बंद करुन टाका... हा काही जोक नाही. एखाद्याच्या जीवापेक्षा जगात काहीही महत्त्वाचे नसते असा जळजळीत सवाल फाल्गुनी हिने करुन सर्वांनाच अंतर्मुख केले आहे.

Plane Crash : 'आम्हाला 1 कोटी नकोत...आमचे पापा हवेत, मीच तुम्हाला 2 कोटी...,' फाल्गुनीच्या सवालाने यंत्रणा हादरली..
| Updated on: Jun 13, 2025 | 4:35 PM
Share

‘जर तुम्ही आम्हाला एक कोटी देऊ इच्छीत आहात तर, मी तुम्हाला दोन कोटी देते, फक्त मला माझे पापा परत करा…,’ या शब्दात फाल्गुनी हिने प्रशासनाला खडसावले आहे. माझ्या वडिलांना परत करा असा टाहो फाल्गुनी हीने केला आहे. फाल्गुनी हिने तिच्या भावना एका खाजगी चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या. फाल्गुनी हीच्या आवाजातील दु:ख , राग, एका मुलीचे पित्याबद्दलचे प्रेम व्यक्त होत आहे.

पापांची काय चुकी ?

फाल्गुनी हीने सवाल केला की कोणी सांगावे माझ्या पापाची काय चूक आहे. की त्यांनी हे फ्लाईट पकडले. मी मुलगी आहे. मला माझे पापा परत करा. एअर इंडियाने काय अवहेलना केलीय, काहीच उत्तर नाही, त्यांना काही संवेदनशीलता आहे की नाही असा सवालच फाल्गुनी हिने केला आहे.

पैसा नको तुमचा , माझे पापा मला परत करा

आम्हाला एक कोटी देण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. मी तु्म्हाला दोन कोटी देते, परंतू माझ्या पापा मला परत कराल. पैशाने माणूस परत येतो काय ? आम्ही त्या पैशांतून पलंग खरेदी करु, परंतू त्यावर झोप कशी येईल.जे खरे प्रेम मला माझे पापा द्यायचे, ते कुठे मिळेल ? असा आर्त सवाल फाल्गुनी हीने केला आहे.

देशभक्तीचे बक्षीस म्हणून काय मिळाले?

फाल्गुनी पुढे म्हणते की माझे वडील देशभक्त होते. ते स्वतः एअर इंडियाचा प्रवास अभिमानाने करायचे. ते नेहमी म्हणायचे, एअर इंडियाचा आम्हाला अभिमान वाटतो. तो देशाचा अभिमान आहे. पण, माझ्या वडिलांना त्यांच्या देशभक्तीचे बक्षीस म्हणून काय मिळाले? देशाचे नाव असे चालवायचे आहे का? जर तुम्ही सुरक्षितपणे उड्डाण करू शकत नसाल तर एअर इंडिया बंद करुन टाका. हा काही विनोद नाही. एखाद्याच्या जीवापेक्षा जगात काहीही महत्त्वाचे नसते असा जळजळीत सवाल फाल्गुनी हिने करुन सर्वांनाच अंतर्मुख केले आहे.

260  जणांचा मृत्यू

एअर इंडियाच्या सर्वात विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या ड्रीमलायनर या विमानाला काल दुपारी अहमदाबाद येथून टेक ऑफ घेत असताना ते हॉस्टेलवर कोसळल्याने विमानातील 242 प्रवाशांसही हॉस्टेलच्या 12 जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणानंतर आता एअर इंडियाने मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या वारसांना एक कोटीची मदत जाहीर केलेली आहे. या विमानाच्या अपघाताला देशातील सर्वात मोठा विमान अपघात म्हटला जात आहे. या प्रकरणातील मृतांची ओळख पटवण्यासाठी 200 हून अधिक जणांच्या डीएनए टेस्ट घेण्यात येत आहेत.

दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.