AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP त पुन्हा मास्क सक्ती; ‘या’ शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक, कोविडच्या वाढत्या प्रकरणांमुळे सरकारचा निर्णय

लखनौ : अख्या जगावार आपली दहशत माजवणाऱ्या कोरोनाने काही काळ विश्रांती घेतली होती. तो आता पुन्हा आपले पाय पसरत आहे. याचे उदाहरण म्हणजे चीन (china).येथे कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. तर मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे चीनची आर्थिक राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर असणाऱ्या शांघाई (Shanghai) शहरात लॉडाऊन करण्यात आला आहे. यादरम्यान देशाचीही […]

UP त पुन्हा मास्क सक्ती; 'या' शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक, कोविडच्या वाढत्या प्रकरणांमुळे सरकारचा निर्णय
मास्क Image Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Apr 18, 2022 | 3:52 PM
Share

लखनौ : अख्या जगावार आपली दहशत माजवणाऱ्या कोरोनाने काही काळ विश्रांती घेतली होती. तो आता पुन्हा आपले पाय पसरत आहे. याचे उदाहरण म्हणजे चीन (china).येथे कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. तर मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे चीनची आर्थिक राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर असणाऱ्या शांघाई (Shanghai) शहरात लॉडाऊन करण्यात आला आहे. यादरम्यान देशाचीही चिंता वाढवणारी बातमी आली आहे. देशात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत असून गेल्या 24 तासांत, कोरोनाचे 2,183 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 214 रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वात भयावह आकडेवारी दिल्ली-एनसीआरमधून समोर येत असून दिल्ली-नोएडामध्ये देशातील प्रत्येक चौथा कोरोनाचा रुग्ण समोर येत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने काही महत्वाचे निर्णय घेताना पुन्हा मास्क सक्ती केली आहे. तसेच राजधानी लखनौ आणि एनसीआरच्या सहा जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क (Mask) घालणे अनिवार्य केले आहे.

कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ

कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचा परिणाम राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR)अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांवर झाला आहे. एका सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, हे लक्षात घेऊन सरकारने गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि राजधानी लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या 24 तासांत गौतम बुद्ध नगरमध्ये 65, गाझियाबादमध्ये 20 आणि लखनऊमध्ये 10 नवीन बाधीत समोर आले आहेत.

फेस मास्क अनिवार्य

कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीतील सुधारणा लक्षात घेता, उत्तर प्रदेश सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला फेस मास्क घालण्यास सूट दिली होती. पण आता अनेक जिल्ह्यांमध्ये फेस मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. अलीकडेच दिल्ली सरकारने लोकांना मास्कपासून सूट दिली होती. मात्र त्यानंतर दिल्लीत कोरोना बाधीतांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे.

दिल्लीत नवीन रुग्ण आढळले

रविवारी दिल्लीत कोविड-19 चे 517 नवीन रुग्ण आढळले आहेत. संसर्ग दर 4.21 टक्के नोंदवला गेला आहे. रविवारी आलेल्या नवीन प्रकरणांसह, राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंत एकूण 18,68,550 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आणि संसर्गामुळे 26,160 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. शनिवारी, राष्ट्रीय राजधानीत कोविड -19 चे 461 नवीन रुग्ण आढळले, तर 2 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला.

इतर बातम्या :

SNDT University : ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थीनींचा विरोध, कॉलेजच्या गेटसमोरच मुलींची घोषणाबाजी

Lasalgaon Onion: 2 दिवसांमध्येच ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर प्रश्नचिन्ह, कांदा उत्पादक संघटनेची नेमकी भूमिका काय?

Wedding video : तुमच्यापैकी कुणी रडत का नाही? नवरीचा प्रश्न, घरच्यांच्या उत्तरानंतर म्हणाली “ओके बाय…”

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार