AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress Siddaramaiah : कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी काँग्रेसने सिद्धारमैया यांना काय ऑफर दिलीय? सात तास बैठक

Congress Siddaramaiah : कर्नाटकात होणाऱ्या संभाव्य नेतृत्व बदलाविषयी दिल्लीत जवळपास सात तास काँग्रेसची बैठक चालली. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि अन्य नेते उपस्थित होते.

Congress Siddaramaiah : कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी काँग्रेसने सिद्धारमैया यांना काय ऑफर दिलीय? सात तास बैठक
Shivkumar-Siddaramaiah
| Updated on: May 27, 2026 | 9:11 AM
Share

लवकरच कर्नाटकच्या राजकारणात आपल्याला मोठा बदल पहायला मिळू शकतो. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कर्नाटकात कमबॅक केलं. कर्नाटकात काँग्रेस आता सर्वात मोठा नेतृत्व परिवर्तनाचा निर्णय घेईल अशा राजकीय हालचाली सुरु आहेत. सिद्धारमैया गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. 2029 विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस नेतृत्वाने सिद्धारमैया यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका निभावण्याचा प्रस्ताव दिला आहे. सिद्धारमैया यांनी दिल्लीत काँग्रेसचा प्रमुख ओबीसी चेहरा म्हणून काम करावं अशी पक्षाची इच्छा आहे. सिद्धारमैया यांनी सामाजिक न्याय, जातीय जनगणना आणि मागास वर्ग या मुद्यांवर पक्षाची रणनिती भक्कम बनवावी अशी काँग्रेस नेतृत्वाची इच्छा आहे.

कर्नाटकात होणाऱ्या संभाव्य नेतृत्व बदलाविषयी दिल्लीत जवळपास सात तास काँग्रेसची बैठक चालली. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, काँग्रेस सरचिटणीस केसी वेणूगोपाल आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला उपस्थित होते. काँग्रेस नेतृत्वाने सार्वजनिक स्तरावर नेतृत्व परिवर्तनाची शक्यता फेटाळलेली नाही. पण सध्या सुरु असलेल्या राजकीय हालचाली पाहत सिद्धारमैया मुख्यमंत्री पद सोडू शकतात असा अंदाज आहे.

काँग्रेस नेतृत्वाने त्यांना काय संदेश दिलाय?

राष्ट्रीय स्तरावर आता तुम्हाला महत्वाची भूमिका द्यायची आहे हा पक्ष नेतृत्वाने सिद्धारमैया यांना स्पष्ट संदेश दिला आहे, काँग्रेस बैठकीतील अंतर्गत घडामोडींची माहिती असणाऱ्या सूत्राने ही माहिती दिली आहे. तुम्ही काँग्रेसचा सर्वात मोठा, सन्मानित ओबीसी चेहरा आहात. 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धारमैया यांनी राष्ट्रीय राजकारणात यावं आणि राष्ट्रीय स्तरावर एक प्रभावी भूमिका बजावावी हे काँग्रेस नेतृत्वाने त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसने काय शब्द दिलाय?

काँग्रेस नेतृत्वाने सिद्धारमैया यांना शब्द दिला आहे की, ते जर दिल्लीला यायला तयार झाले, तर त्यांच्या सर्व चिंता आणि क्षेत्रीय हिताची पक्ष काळजी घेईल. राज्यसभेच्या माध्यमातून सिद्धारमैया यांना संसदेवर पाठवण्याचा आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये एक मोठ पद सोपवण्याची योजना आहे. हा एक सन्मानजनक राजकीय बदल असेल. सिद्धारमैया यांना असं वाटू नये की त्यांना हटवलं जातय. तुमची राजकीय प्रतिष्ठा कुठेही कमी होणार नाही याची काँग्रेसने हमी दिली आहे. कर्नाटकात राज्यसभेच्या जागेसाठी नामांकन दाखल करण्याची 8 जून अंतिम तारीख आहे.

Follow Us
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त