लग्नात नवरदेव नवरीपेक्षा मोठाच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नाही त्यामागचं खर कारण

सामान्यपणे जी लग्न अरेंज पद्धतीनं केली जातात, त्यामध्ये वर हा वधूपेक्षा एखाद्या वर्षानं का होत नाही पण मोठाच असल्याचं दिसून येतं, जाणून घेऊयात त्या मागचं नेमकं कारण काय आहे ते

लग्नात नवरदेव नवरीपेक्षा मोठाच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नाही त्यामागचं खर कारण
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 02, 2025 | 8:07 PM

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. हिंदू धर्म पद्धतीमध्ये लग्नाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मानुसार लग्न झाल्यानंतर व्यक्तीचा गृहस्थाश्रमात प्रवेश होतो. लग्न झाल्यानंतर त्या व्यक्तीवर नवी जबाबदारी येते. जर जोडीदार योग्य भेटला तर त्याचा संसार सुखाचा होतो. गृहस्थाश्रमातूनच पुढील दोन आश्रमांचा मार्ग जातो. त्यामुळे हिंदू धर्मच नाही तर प्रत्येक धर्मामध्ये लग्न हा विशेष सोहळा असतो. प्रत्येक जण आप-आपल्या धर्मात सांगितलेल्या प्रथा परंपरेनुसार लग्न करत असतो.

हिंदू धर्मात लग्नाबाबत अनेक नियम सांगितलेले आहेत, मंत्रोच्चार आणि अग्निच्या साक्षीने वधू वर सप्तपदी करतात. दरम्यान लग्नाच्या पद्धती प्रत्येक धर्मात जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व धर्मामध्ये एक नियम तुम्हाला सारखाच पाहायला मिळेल तो म्हणजे वर हा नेहमी वधूपेक्षा मोठाच असतो. सामान्यपणे जी अरेंज मॅरेज होतात त्या लग्नात तरी वधू ही वरापेक्षा लहान असल्याचं दिसून येते. याला लव्ह मॅरेजचे अपवाद देखील असू शकतात. मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे की असं का? वधू ही वरापेक्षा लहानच का असते? कायआहे त्यामागचं कारण? आज आपण त्या मागचं कारण जाणून घेणार आहोत.

काय  आहे कारण? 

त्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मुली या मुलांपेक्षा जास्त लवकर मॅच्युअर होतात. म्हणजे 28 वर्ष वयाच्या तरुणाला जेवढी समज असते तीच समज 21 वर्षाच्या मुलीकडे असते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय समाज जीवनात जन्मापासून मुली ज्या परिस्थितीमधून जातात, ज्या शारीरिक बदलांमधून जातात, त्यामुळे त्या मुलाच्या तुलनेत जास्त लवकर मॅच्युअर होतात. 21 वर्षांची मुलगी आणि 28 वर्षांचा मुलगा यांची मॅच्युअरेटी सारखीच असते. त्यामुळे लग्न करताना पत्नी ही नेहमी पतीच्या वयाच्या तुलनेत लहान असते.  पती हा मोठा असतो.  याला काही अपवाद देखील आहेत.  दुसरी गोष्ट अशी आहे की, लग्नानंतर अर्थजनाची जबाबदारी ही अनेक घरांमध्ये मुलांवर येऊन पडते, त्यादृष्टीने देखील तो सक्षम असावा असा विचार देखील त्यामागे आहे.