AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zilla Parishad Election Result : अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं; पराभव की विजय?

अजित पवार यांनी त्यांची शेवटची सभा खेड तालुक्यात घेतली होती. या सभेत त्यांनी एका उमेदवाराची थेट घोषणा केली होती. त्या उमेदवाराचा विजय झाला की पराभव असे विचारले जात आहे.

Zilla Parishad Election Result : अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं; पराभव की विजय?
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 09, 2026 | 6:57 PM
Share

Zilla Parishad Election Result : राज्यात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी स्थानिक पातळीवर ताकद लावली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत राज्यातील बड्या नेत्यांनीही प्रचारसभा घेतल्या. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर सर्वोच्च नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मतदारांनी आपल्याच पक्षाला मत द्या, असे आवाहन केले होते. दरम्यान, या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपा 50 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे. असे असतानाच दिवंगत नेते अजित पवार यांच्या पक्षाने या निवडणुकीत काय कामगिरी केली? असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी त्यांच्या शेवटच्या सभेत ज्या उमेदवाराची घोषणा केली होती, त्या उमेदवाराबाबतही मोठी माहिती समोर आली आहे.

ज्याची उमेदवारी जाहीर केली त्याचा विजय

पुण्याच्या खेड तालुक्यातील वराळे येथे अजित पवार यांची शेवटची सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी त्यांनी जाहीर केलेल्या जिल्हा परिषद उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शरद बुट्टे पाटील यांचे त्यांनी नाव जाहीर केले होते. त्यांचा ३९९ मतांनी विजय झाला आहे. हीच ती सभा होती जिथे अजित पवार यांनी “राजकारण लई वंगाळ असतं” अशी टिप्पणी करत कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता.

राष्ट्रवादीला खेड तालुक्यात मोठे यश

त्याच सभेत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या शरद बुट्टे पाटील यांना अजितदादांनी थेट उमेदवारी जाहीर केली होती. आता त्याच उमेदवाराने विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसला खेड तालुक्यात मोठं यश मिळवून दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात कशी कमागिरी केली?

अजित पवार हे परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार करायला बारामतीत विमानाने जात होते. परंतु त्यांचा लँडिंगच्या वेळी अपघात झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीत कोणताही प्रचार केला नाही. कुठेही सभा घेतली नाही. दरम्यान, या निवडणुकीत एकूण 12 जिल्हापरिषदांपैकी दोन जिल्हापरिषदांवर अजितदादांच्या पक्षाने बाजी मारली आहे. तर एकूण 125 पंचायत समितींपैकी 25 पंचायत समित्यांवर अजित पवार यांच्या पक्षाची सत्ता आली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?