AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांना मत म्हणजेच महायुतीला मत; चंद्रशेखर बावनकुळे यांची निकालानंतर पहिली मोठी प्रतिक्रिया

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे. याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.

अजितदादांना मत म्हणजेच महायुतीला मत; चंद्रशेखर बावनकुळे यांची निकालानंतर पहिली मोठी प्रतिक्रिया
Bawankule and PawarImage Credit source: Google
| Updated on: Feb 09, 2026 | 5:08 PM
Share

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीतही भाजप आणि महायुती शानदार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 12 पैकी 8 जागांवर आता भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष असणार आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही शानदार कामगिरी केली आहे. या निवडणुकीतील यशावर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. बावनकुळे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

जनता आमच्या पाठीशी – बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच्या निकालावर बोलताना म्हटले की, ‘भाजप हा महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल असे यापूर्वी बोललो होतो. महानगरपालिका प्रमाणेच जिल्हा परिषदेत सुद्धा जवळपास आठ जागेवर भाजपचे अध्यक्ष असतील. डबल इंजन सरकार जनतेपर्यंत घेऊन गेलो आणि जिल्हा परिषदेतही नवीन विकसित ग्रामीण महाराष्ट्र या माध्यमातून कामे होणार आहे. हे जनतेपर्यंत घेऊन गेलो. निवडणूक प्रचारादरम्यान ग्रामीण जनता राज्य आणि केंद्र सरकारच्या पाठीशी उभी राहिली.

अजितदादांना मत म्हणजेच महायुतीला मत – बावनकुळे

अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘पुणे जिल्हा अजित दादाच्या पाठीशी होताच. पुणे जिल्ह्याने जे मत दिलं ते अजित दादांना मिळालेला मत आहे, ते मत महायुतीलाच मिळालेलं आहे. महायुती महाराष्ट्रात येणार आहे. काही जिल्हा परिषदेवर अजितदादांचे तर काही ठिकाणी शिंदे सेनेचे तर काही जागेवर भाजपचे अध्यक्ष बसतील.

महाविकास आघाडीने आत्मपरिक्षण करावं – बावनकुळे

काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत दणका बसला आहे. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी खाली गेली आहे. आता टीका टिप्पणीवर महाराष्ट्र मत देत नाही, तर विकासाला मतदान करते. काँग्रेसने टीका टिप्पणी आणि निगेटिव्ह प्रचार केला. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारलं. शरद पवारही महाविकास आघाडीला मार्गदर्शन करण्यात कमी पडले. महाविकास आघाडीसाठी वाईट निकाल आले आहे. त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे.

जनता काँग्रेसच्या पाठीशी नाही – बावनकुळे

काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का? यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस पार्टीची भूमिका चुकत आलेले आहे. त्यांची नकारात्मक भूमिका आहे, त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन विकासाच्या योजना मांडायला पाहिजे होत्या. महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती वाईट आहे. कारण त्यांच्याकडे कुठलेही व्हिजन नसल्यामुळे त्यांच्यासोबत जनता नाही.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं