AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Satara Highway Accident : कार डिव्हायडरला धडकून पलटली, त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने..पुणे-सातारा रोडवर भयानक अपघात

Pune Satara Highway Accident : सातार-पुणे रस्त्यावर शिरवळमध्ये मध्यरात्री भीषण अपघात घडला.

Pune Satara Highway Accident : कार डिव्हायडरला धडकून पलटली, त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने..पुणे-सातारा रोडवर भयानक अपघात
Car Accident
| Updated on: Aug 11, 2026 | 8:24 AM
Share

सातारा-पुणे महामार्गावर शिरवळमध्ये मध्यरात्री भीषण अपघात घडला आहे. भरधाव कार डिवायडरला धडकून पलटली व विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मावळ तळेगावमधील चार तरुणांचा या अपघातात मृत्यू झाला. अपघातग्रस्त टाटा नेक्सॉन कारमधील चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडला. अपघातातील दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिरवळ पोलीस ठाण्यात या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.

वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत अशी मृत तरुणांची नावं आहेत. शिरवळच्या हॉटेल शिवालय समोर हा भीषण अपघात घडला. सारोळा महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या मदतीने वाहन रस्त्यातून हटवून वाहतूक सुरळीत केली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तसच पुण्याकडे जाणाऱ्या अन्य मार्गांवर आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. मुंबई-बंगळुरु, जुना पुणे-मुंबई हायवे, पुणे-नाशिक मार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर हे चारही महामार्ग आतापर्यंत अपघाताचे हॉटस्पॉट ठरले आहेत. एका खासगी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या दोन-अडीच वर्षात या चार महामार्गांवर झालेल्या विविध अपघातांमध्ये आतापर्यंत जवळपास 355 जणांचा मृत्यू झाला आहे, त्याचेळी 492 जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची कारणं काय?

महामार्गांवर होणाऱ्या या अपघातांमागे काही ठराविक कारणं आहेत. उदहारणार्थ घालून दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा जास्त स्पीड, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणं, अचानक लेन बदलताना मागून येणाऱ्या वाहनाची धडक, मोबाइल सुरु असताना कार चालवणं आणि मद्यप्राशन करुन ड्रायव्हिंग अशी काही अपघाताची ठराविक कारणं आहेत. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण सुद्धा कमी नाही.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत