AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, 2 जणांचा जागीच अंत, नक्की काय घडलं?

महाराष्ट्रात दोन भीषण अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनर आणि ट्रकच्या धडकेत २ जणांचा मृत्यू झाला, तर अंबरनाथमध्ये भरधाव कारने धुमाकूळ घातला असून याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, 2 जणांचा जागीच अंत, नक्की काय घडलं?
mumbai pune accident
| Updated on: Jun 01, 2026 | 8:47 AM
Share

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनर आणि ट्रकच्या झालेल्या जोरदार धडकेत २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. तर दुसरीकडे, अंबरनाथ-उल्हासनगर मार्गावर एका भरधाव कारने मध्यरात्री धुमाकूळ घालत अनेकांना जखमी केले आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.

एक्सप्रेसवेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ट्रकचा चक्काचूर

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास खोपोली हद्दीत एक अत्यंत भीषण अपघात झाला. पुण्‍याहून मुंबईकडे तेलाचे डबे घेऊन जाणारा एक भरधाव कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट मुंबई मार्गिकेत उलटला. हा अपघात घडला त्यावेळी मागून तांदूळ घेऊन एक ट्रक येत होता. या अपघातानंतर ट्रक चालकाला वाहन कंट्रोल करता आले नाही. यामुळे हा ट्रक थेट उलटलेल्या कंटेनरवर जाऊन आदळला. ही धडक इतकी वेगवान आणि भीषण होती की ट्रकमधील चालक आणि क्लिनरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या दोन्ही अवजड वाहनांच्या धडकेच्या कचाट्यात बाजूने जाणारी एक एर्टिगा कारही सापडली. या कारमधील एक ८० वर्षांच्या वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. हायवे पोलीस आणि बचाव पथकाने युद्धपातळीवर वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.

अंबरनाथमध्ये भरधाव कारचा थरार

तर दुसऱ्या घटनेत अंबरनाथ ते उल्हासनगर दरम्यान काल मध्यरात्री एका भरधाव स्विफ्ट डिझायर कारने रस्त्यावरील पादचाऱ्यांना आणि इतर वाहनांना धडक देत अक्षरशः धुमाकूळ घातला. या धडकेत अनेक जण जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात घडताच परिसरातील संतप्त नागरिकांनी फॉलोवर लाईन चौक येथे कारला वेढा घातला. तिची तोडफोड केली. या तोडफोडीत कारचे मोठे नुकसान झाले. तसेच मागची काच पूर्णपणे फुटली आहे. मात्र, नागरिकांच्या या रोषाचा आणि गोंधळाचा फायदा घेत चालक कार सोडून घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती शांत केली. फरार चालकाच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन त्याचा शोध सुरू केला आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात