AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोड बातमी! अमित ठाकरे यांना कन्यारत्न, दुसऱ्यांदा झाले बाबा

गोड बातमी! अमित ठाकरे यांना कन्यारत्न, दुसऱ्यांदा झाले बाबा

गोड बातमी! अमित ठाकरे यांना कन्यारत्न, दुसऱ्यांदा झाले बाबा
amit thackeay and Mitali BorudeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2026 | 6:44 PM
Share

Amit Thackeray : राजकीय नेते सामान्यांच्या विकासासाठी, लोकांचे जीवन आनंददायी व्हावे यासाठी सतत प्रयत्नरत असतात. काही नेते मंडळी तर कायम जनहितासाठी झगडत असतात. मनसेचे नेते अमित ठाकरे हेदेखील कायम मराठीचा पुरस्कार करून लोकांसाठी वेगवेगळा लढा देत असतात. सामान्यांचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. दरम्यान याच अमित ठाकरे यांच्या घरी गोड बातमी आली आहे. अमित ठाकरे दुसऱ्यांदा बाबा झाले आहेत. अमित ठाकरे हे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. आता अमित ठाकरे दुसऱ्यांदा बाबा झाल्याने राज ठाकरे हेदेखील दुसऱ्यांदा आजोबा झाले आहेत. अमित ठाकरेंना कन्यारत्न झाले आहे.

अमित ठाकरेंना पहिला मुलगा

अमित ठाकरे यांच्या पत्नीचे नाव मिताली बोरुडे असे आहे. त्यांचे लग्न 27 जानेवारी 2019 रोजी झाले होते. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांना पहिला मुलगा झाला. त्यांच्या मुलाचे नाव कियान असे आहे. आता या दाम्पत्याला दुसरी मुलगी झाली आहे. सध्या राज ठाकरे यांच्या शीवतीर्थ बंगला आनंदात आहे.

अमित ठाकरेंची राजकीय कारकीर्द

दरम्यान, अमित ठाकरे हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी 2024 सालची विधानसभा निवडणूक माहीम या विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. ही जागा जिंकण्यासाठी मनसेने चांगलाच जोर लावला होता. परंतु त्यांचा या जागेवरून पराभव झाला होता. या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत हे विजयी झाले होते. आमदार होण्यासाठी अमित ठाकरे यांनी या मतदारसंघात पूर्ण ताकदीने प्रचार केला होता. परंतु त्यांना यात यश आले नाही. प्रचारात अमित ठाकरे यांच्यासोबत त्यांची पत्नी मिताली बोरुडे यादेखील दिसल्या होत्या. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मिताली बोरुडे यांनीही प्रचार केला होता. परंतु अमित ठाकरे निवडणूक जिंकू शकले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याने अमित ठाकरे आता पुन्हा नव्याने चर्चेत आले आहेत. पुण्याच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूला मोदी यांचा फोटो लावल्याने अमित ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?