AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

⁠Maharashtra ZP Election Results 2026 : अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय, सिंधुदुर्गातील विजयानंतर नितेश राणेंनी कोणाला इशारा दिला?

⁠Maharashtra ZP Election Results 2026 : "राणे साहेबांनी आमच्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न साडेचार लाखापर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प बोलून दाखवलेला. जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील सत्ता केंद्राचा वापर करुन ते साध्य करण्याचा प्रयत्न करु" असं नितेश राणे म्हणाले.

⁠Maharashtra ZP Election Results 2026 : अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय, सिंधुदुर्गातील विजयानंतर नितेश राणेंनी कोणाला इशारा दिला?
Nitesh Rane
| Updated on: Feb 09, 2026 | 3:21 PM
Share

“देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं काम सिंधुदुर्गाच्या जनतेने केलय. रवींद्र चव्हाण यांनी जे मार्गदर्शन केलं, पाठिंबा दिला, त्यामुळे सांघिक काम चांगल्या पद्धतीने करु शकलो. सिंधुदुर्गाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याची संधी चालून आलेली आहे. आज केंद्रात आणि राज्यात भाजप, एनडीए, महायुतीचं सरकार आहे. सत्तेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आम्ही जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या माध्यमातून करु” असं मंत्री, आमदार नितेश राणे म्हणाले. “राणे साहेबांनी आमच्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न साडेचार लाखापर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प बोलून दाखवलेला. जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील सत्ता केंद्राचा वापर करुन ते साध्य करण्याचा प्रयत्न करु” असं नितेश राणे म्हणाले.

“निवडून आलेले जे पाच अपक्ष आहेत, तसं म्हटलं तर भाजप बंडखोर म्हणून त्यांचा उल्लेख करु शकतो. मला प्रामाणिकपणे वाटतं, या जिल्ह्यात भाजपला, महायुतीला हरवण्याची ताकद इथे ना उबाठामध्ये आहे, ना महाविकास आघाडीत आहे” असं नितेश राणे म्हणाले.

तो निश्चित महायुतीला गालबोट लावणारा आहे

“महायुती म्हणून सांघिक लढलो. अपक्ष आणण्याचा जो प्रकार झाला, तो निश्चित महायुतीला गालबोट लावणारा आहे. हे अपक्ष सावंतवाडी येथे आले आहेत. त्यांनी रवी चव्हाण यांच्या नावाचा वापर करुन त्यांचा पाठिंबा आहे असं सांगून ते भाजपचं अधिकृत कमळ चिन्ह पाडून आलेले आहेत. हे निश्चित रवी चव्हाण व आम्हाला मान्य नसेल” असं नितेश राणे म्हणाले.

अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय

“देवेंद्र फडणवीस, राणे साहेब, रवी चव्हाण व एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने महायुतीचा निर्णय झाला. पण तरीही एकाबाजूला शर्टावर कमळ चिन्ह लावायचं आणि दुसरीकडे कमळ चिन्हाचे उमेदवार पाडण्यासाठी ताकद लावायची. त्यांनी ताकद लावली असती तर महायुतीचा एकतर्फी विजय झाला असता. मी तर बोलतो 50 चे 50 उमेदवार निवडून आणण्यासाठी चांगली, सकारात्मक स्थिती सिंधुदुर्गात होती. हे मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हातांनी सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे हे जे लोक आहेत, अदृष्य हातांच्या नावाने भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय” असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं