AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धमकी, जालन्यात गुन्हा दाखल

| Edited By: | Updated on: Aug 11, 2026 | 7:25 PM
Share

Maharashtra News LIVE Updates : मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील बैठकीनंतर नाशिकमधील सर्व संबंधित अधिकारी ॲक्शन मोडवर आहेत. कुंभमेळ्याच्या कामांसोबतच खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीच्यान प्रश्नावर प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन तयार आहे.

Maharashtra News LIVE : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धमकी, जालन्यात गुन्हा दाखल
Image Credit source: TV9 Marathi

LIVE NEWS & UPDATES

  • 11 Aug 2026 07:41 PM (IST)

    अन्नात भेसळ करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करावी : एकनाथ शिंदे

    दूध, पनीरसह अन्न भेसळखोरांवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्य पदार्थ भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत असं शिंदे यांनी म्हटले आहे.

  • 11 Aug 2026 07:27 PM (IST)

    मनोज जरांगे यांनी अभ्यास करून बोलावं – सचिन खरात

    मनोज जरांगे यांनी अजिंठा लेणीतील गौतम बुद्धाच्या शिल्पांबद्दल त्यांनी केलेला हावभाव चुकीचा असून, यापुढे मनोज जरांगे यांनी अभ्यास करून बोलण्याचं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केलं आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांनी प्रत्येक सभेमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वर्णावर टीका करताना अजिंठा लेणीमधील शिल्पाचा संदर्भ दिला होता यावर खरात यांनी भाष्य केले आहे.

  • 11 Aug 2026 07:16 PM (IST)

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धमकी, जालन्यात गुन्हा दाखल

    फेसबुक वरून महसूलमंत्री बावनकुळे यांना त्रिशूल पाटील नावाच्या फेसबुक अकाउंट वरून अश्लील शिवीगाळ, धमकी आणि द्वेष पसरवल्या प्रकरणी सदर बाजार पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्ते मोहन अबोले यांनी दिलेल्या तक्रारी वरून जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • 11 Aug 2026 06:44 PM (IST)

    विरार पूर्वेच्या कंटेनरखाली आल्याने एकाचा जागीच मृत्यू

    विरार पूर्वेच्या चंदनसार हॉस्पिटलसमोर मुख्य रस्त्यावर कंटेनरखाली आल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश केसरया ( वय ३२ ) असे मयत तरुणाचे नाव असून तो लिंबू मिरची विकायचे काम करत होता. रस्ता ओलांडताना अचानक तो कंटेनरच्या खाली आला आणि जागीच मृत्यू झाला. विरार पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

  • 11 Aug 2026 06:22 PM (IST)

    पुण्यात नळस्टॉप ते कर्वेनगर ट्रॅफीक जाम

    पुण्यात नळस्टॉप ते कर्वेनगर ट्रॅफिक जाम झाले आहे. नळस्टॉप ब्रीज बंद केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गरवारे चौक येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातील अनेक रस्त्यावरून पर्यायी वाहतुक केल्याने नॉन स्टॉप येथे ट्रॅफिक जाम झाले आहे.

  • 11 Aug 2026 04:55 PM (IST)

    मारोतराव कोवासेंच्या आश्रमशाळेतील 2 मुलींना सर्पदंश

    गडचिरोलीत काँग्रेस नेते मारोतराव कोवासे यांच्या आश्रमशाळेतील दोन मुलींना सर्पदंश… योग्य उपचारांअभावी एकीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने नागपूरला हलवलं. असुविधांमुळे घटना घडल्याचा भाजपचा आरोप….या संपूर्ण प्रकरणाची प्रकल्प अधिकारी आयुषी सिंग यांच्याकडून चौकशी सुरू…

  • 11 Aug 2026 04:46 PM (IST)

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून ‘वंदे मातरम्’ विधेयकाला मंजुरी

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून ‘वंदे मातरम्’ विधेयकाला मंजुरी. ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण मिळणार

  • 11 Aug 2026 04:45 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा

    मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पुण्यात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय..पुण्यातील ललित महाल चौक ते गरवारे चौकपर्यंत पायी तिरंगा यात्रा सुरु आहे..भाजप पदाधिकारी आणि पुणेकर नागरिक तिरंगा यात्रेत सहभागी झालेत

  • 11 Aug 2026 04:36 PM (IST)

    15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून व्हिडीओ पोस्ट

    15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून व्हिडीओ पोस्ट. हर घर तिरंगा , हर मन तिरंगा व्हिडीओ मोदींकडून पोस्ट. स्वातंत्र्य सेनानींना श्रद्धांजली अपर्ण करूया.  विकसित भारताचा संकल्प सर्वांनी घेऊ या- मोदी

  • 11 Aug 2026 04:24 PM (IST)

    चाकणमध्ये 8 तासांपासून वाहतूक कोंडी

    चाकणमध्ये 8 तासांपासून वाहतूक कोंडी. 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. कामगारांच्या बस, शाळकरी विद्यार्थी आणि मालवाहू वाहनं कोंडीत अडकली.  कालच चाकणमधील 20 कंपन्या खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे स्थलांतर करणार असल्याची बातमी आली होती.. ढिम्म प्रशासन याप्रकरणाकडे लक्ष देणार का…का झोपाच काढत राहणार.. स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया…

  • 11 Aug 2026 04:13 PM (IST)

    कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर हल्लाबोल

    कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर हल्लाबोल. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्यावरुन सिब्बल यांच्याकडून आयोगाच्या भूमिकेवर सवाल. 2018ची पक्ष घटना असंवैधानिक तर पक्षाची नोंदणी रद्द का केली नाही. निवडणूक आयोग चिन्ह दुसऱ्या गटाला कसं देऊ शकतं?-सिब्बल.

  • 11 Aug 2026 03:58 PM (IST)

    आम्ही लोकशाही तत्वावर काम कर नव्हतो तर नोटीस का दिली नाही? कपिल सिब्बल

    “आम्ही लोकशाही तत्वावर काम कर नव्हतो तर नोटीस का दिली नाही. आयोगानं नोटीस दिली नाही , सुनावणीही घेतली नाही” असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

  • 11 Aug 2026 03:57 PM (IST)

    2018 ची पक्ष घटना असंवैधानिक तर नोंदणी रद्द का केली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला

    2018 ची पक्ष घटना असंवैधानिक तर नोंदणी रद्द का केली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे तर निवडणूक आयोगानं चिन्ह दुसऱ्या गटाला का दिलं? असाही सवाल उपस्थित करण्यात आला

  • 11 Aug 2026 03:55 PM (IST)

    वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी रचना असते-सिब्बल

    वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी रचना असते, पक्षाच्या कार्यकारणितील सदस्य निवडून आलेत, जिल्हाप्रमुख आणि पक्षाच्या नियुक्याताही तशाच आहेत. असे सिब्बल म्हणाले

  • 11 Aug 2026 03:53 PM (IST)

    आमदारांची फोडाफोच आणि पळापळ ही घटनात्मक हाराकिरी- सिब्बल

    “आमदारांची फोडाफोच आणि पळापळ ही घटनात्मक हाराकिरी आहे, सध्या आमदार एका चिन्हावर निवडून येतात आणि नंचर दुसऱ्याच पक्षाच जातात त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याचा” युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे.

  • 11 Aug 2026 03:47 PM (IST)

    पक्ष लोकशाही मार्गानं आहे की नाही हे ठरवणार आयोग कोण?- सिब्बल

    पक्ष लोकशाही मार्गानं आहे की नाही हे ठरवणार आयोग कोण? आपल्या कार्यक्षेत्राबाहेरचे निर्णय निवडणुक आयोगाने घेतल्याचे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे.

  • 11 Aug 2026 03:44 PM (IST)

    पक्षात येतात, लाभ घेतात आणि नंतर म्हणतात की पक्षच लोकशाहीविरोधी- कपिल सिब्बल

    पक्षात येतात लाभ घेतात आणि नंतर म्हणतात की पक्षच लोकशाहीविरोधी आहे. असा प्रश्न आता कोर्टात कपिल सिब्बल यांनी विचारला आहे.

  • 11 Aug 2026 03:41 PM (IST)

    पक्ष लोकशाही की अलोकशाही मार्गानं हे ठरवणार आयोग कोण ठरवणार?असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला

    पक्ष लोकशाही की अलोकशाही मार्गानं हे ठरवणार आयोग कोण ठरवणार, पक्षाचा लाभ घेता आणि नंतर म्हणता की पक्ष असंवैधानिक आहे असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

  • 11 Aug 2026 03:38 PM (IST)

    पक्ष घटना संवैधानिक आणि असंवैधानिक ठरवू शकत नाहीत असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे

    2018 च्या घटनेनुसार शिंदेंना मुख्य नेता सांगितलं जातंय, तर पक्ष घटना संवैधानिक आणि असंवैधानिक ठरवू शकत नाहीत असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

  • 11 Aug 2026 03:35 PM (IST)

    सर्व निकालात फुटीबद्दल बोलले गेलं, विधीमंडळ गटाबद्दल नाही- कपिल सिब्बल

    सर्व निकालात फुटीबद्दल बोलले गेलं, विधीमंडळ गटाबद्दल नाही. १ तृतीयांश सदस्यांच्या गट स्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी, अन्यथा त्या गटाला कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावं लागते असा युक्तिवाद कपिल सिब्बल म्हणाले आहे.

  • 11 Aug 2026 03:33 PM (IST)

    2018 ची घटना असंवैधानिक तर शिंदेची नियुक्ती संवैधानिक कशी?- कपिल सिब्बल

    “2018 ची घटना असंवैधानिक तर शिंदेची नियुक्ती संवैधानिक कशी?” 2018 ची घटना शिंदेच्याच गटानं असंवैधानिक ठरवली होती. असा सवाल उपस्थित केला आहे.

  • 11 Aug 2026 03:30 PM (IST)

    तुम्ही स्वत: ला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलता-कपिल सिब्बल

    तुम्ही स्वत: ला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलता, आमच्या घटनेत मुख्य नेता नाही तर पक्षप्रमुख पदाचा उल्लेख असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

  • 11 Aug 2026 03:27 PM (IST)

    फूट जर पडली तर ती राजकीय विधीमंडळ पक्षातही पडली पाहिजे- कपिल सिब्बल

    फूट जर पडली तर ती राजकीय विधीमंडळ पक्षातही पडली पाहिजे. आयोगानं देसाईच्या 25 जूनच्या पत्राचा आधार घेतला शिंदे आणि काही आमदार पक्षविरोधी कारवायाचा करत असल्याचा उल्लेख कपिल सिब्बल यांच्याकडून उल्लेख

  • 11 Aug 2026 03:24 PM (IST)

    3 दस्तांऐवजांआधारे आयोगानं आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर केला- कपिल सिब्बल

    3 दस्तांऐवजांआधारे आयोगानं आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर केला आहे. हे दस्तऐवज पक्षात फुट पडल्याचा पुरावा ठरत नसतील तर परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्ष देण्याचा अधिकारच नव्हता. असा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे.

  • 11 Aug 2026 03:20 PM (IST)

    कपिल सिब्बल यांच्याकडून 10 व्या परिशिष्टचा दाखला

    कपिल सिब्बल यांच्याकडून 10 व्या परिशिष्टचा दाखला देण्यात आला आहे. विधी मंडळ आणि राजकीय पक्ष वेगळा आहे असा युक्तिाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

  • 11 Aug 2026 03:18 PM (IST)

    आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडून प्रश्न उपस्थित

    आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले गेले. “परिच्छद 15 नुसार आयोगाला पक्षाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही.” असं सिब्बल यांनी म्हटले आहे.

  • 11 Aug 2026 03:15 PM (IST)

    सिब्बल यांनी चार भागात युक्तिवाद सादर

    तिसरा भाग- पक्षातील बहुमताची चाचणी हाच योग्य निष्कर्ष ठरवला तर चौथा भाग विधीमंडळातील बहुमतावर पक्ष चिन्ह दिलं गेले, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.

  • 11 Aug 2026 03:12 PM (IST)

    सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद सुरु

    पहिला भाग- शिवसेनेत फूट पडली असा आयोगाचा निष्कर्ष तर दुसरा भाग पक्षाच्या घटनेच्या आधारे दाव सोडवणं अयोग्य असे सिब्बल यांनी म्हटले आहे.

  • 11 Aug 2026 03:10 PM (IST)

    सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत देखील सादर केली

    निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु आहे. सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत देखील सादर केली आहे. 1 जुलैला आयोगाकडे अनिल देसाईनी पत्र दिलं होत. असे सिब्बल म्हणाले.

  • 11 Aug 2026 03:07 PM (IST)

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणावर आता कोर्टात सुनावणी सुरु

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणावर आता कोर्टात सुनावणी सुरु आहे.  कोर्टात येण्यास उशीर झाल्याने सिब्बल यांनी न्यायमूर्तींची माफी मागितली.

  • 11 Aug 2026 03:00 PM (IST)

    धाराशिव भाजप युवा मोर्चात खांदेपालट

    धाराशिवमध्ये नगरसेवक तथा आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे निकटवर्तीय राहुल काकडे यांना युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाहून हटवलं. गणेश इंगळगी यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. राहुल काकडे यांच्या पत्नी धाराशिवच्या नगराध्यक्ष, तर काकडे स्वतः नगरसेवक आहेत. एका व्यक्तीकडे अनेक पदे नको, म्हणून बदल केल्याची भाजपमध्ये चर्चा आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी नेतृत्व बदल केल्याचीही चर्चा आहे.

  • 11 Aug 2026 02:50 PM (IST)

    शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी शिक्षणाधिकाऱ्याला घातला घेराव

    हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेला शिक्षक देण्याच्या मागणीसाठी चक्क शिक्षण अधिकाऱ्याला घेराव घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिक्षणधिकारी ,शिक्षक दिल्याचा दावा करत असल्याने विद्यार्थिनींनी शाल व हार घालून सत्कार करण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेला शिक्षणाअधिऱ्यांनी सत्कार ही नाकारला

  • 11 Aug 2026 02:40 PM (IST)

    जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत सकाळपासून पावसाची रिपरिप

    जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. जिल्ह्यात गेल्या दहा दिवसानंतर पावसाचे पुनरागमन झाले. पावसाचा खंड पडल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला. हवामान खात्याने पुढचे पाच दिवस जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे..

  • 11 Aug 2026 02:30 PM (IST)

    वसई विरार नालासोपारामध्ये दीड तासापासून मुसळधार पाऊस

    वसई विरार नालासोपारामध्ये मागच्या दीड तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पाण्यातून शाळकरी विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास करावा लागत आहे. विरार पूर्व मनवेलपाडा परिसरातील जिल्हा परिषद शाळेत सुधा पाणी साचले आहे. विरार पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. विरार चा विवा कॉलेज रस्ता, एम बी इस्टेट परिसर , नालासोपार सेंट्रलपार्क, ओसवाल नागरी, नागिंदास पाडा, आचोळा , ओसवाल नगरी , वसई सातिवली नवजीवन परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. पावसाचा जोर वाढतच आहे त्यामुळे पुन्हा एकदा अतिवृष्टी चा धोका निर्माण झाला आहे

  • 11 Aug 2026 02:20 PM (IST)

    चंद्रपुरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस, कुत्र्याने ५२ नागरिकांना चावा घेतल्याचा दावा, शिवसेना आक्रमक आंदोलनाचा दिला इशारा

    चंद्रपूर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. तुकुम परिसरात एका मोकाट कुत्र्याने तब्बल ५२ नागरिकांना चावा घेतल्याची बाब समोर आली आहे. या गंभीर समस्येकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे. माजी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.नागरिकांच्या तक्रारीनंतर मनपाकडून कुत्रे पकडण्यासाठी वाहन पाठविले जाते; मात्र कुत्र्यांना पकडल्यानंतर काही वेळाने ते पुन्हा त्याच परिसरात परत येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तुकुम परिसरात मोकाट कुत्र्यांचे समूह वाढले असून नागरिकांना घराबाहेर पडतानाही हातात काठी घेऊन जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली. दरम्यान, निवेदन स्वीकारताना मनपा आयुक्त अकनूरी यांनी संबंधित भागातील सर्व कुत्र्यांचे लसीकरण झाले असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढे काही करता येणार नसल्याचे उत्तर दिल्याचा आरोप माजी नगरसेवक पचारे यांनी केला असून, या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला.

  • 11 Aug 2026 02:10 PM (IST)

    कळंब येथे संत नामदेव महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक

    संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे शिंपी समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिंपी समाजबांधवांचा आणि महिलांचा मोठा सहभाग संत नामदेव महाराजांच्या जयघोषाने कळंब शहर दुमदुमले. पारंपरिक वेशभूषा आणि धार्मिक वातावरणामुळे मिरवणुकीला उत्साहाचे स्वरूप पहायला मिळाले. संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले आहे

  • 11 Aug 2026 02:00 PM (IST)

    पुढील चार ते पाच दिवस राज्यात सामान्य पावसाची शक्यता

    भारताच्या सीमेला लागून असलेल्या चीनला ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे चीनचा पूर्वेकडील परिसर जलमय झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा भारतातील मान्सूनवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सद्यस्थितीत महाराष्ट्राला या चक्रीवादळाचा कोणताही धोका नसल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात सामान्य पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची स्थिती अतिसामान्य राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

  • 11 Aug 2026 01:56 PM (IST)

    मराठे मुंबईला जाण्याचा निर्णय घेऊ शकतील – जरांगे पाटील

    समाज संकटात आल्यावर झोपून चालणार नाही. मराठा समाज मुंबईला जाण्याचा निर्णय घेऊ शकतात –  सांगली दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य

  • 11 Aug 2026 01:54 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारातील सोन्याचे, चांदीचे दर समोर

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीचे  दरात वाढ झाली आहे.  सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात देखील 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

    सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 560 रुपये झालेत.  चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 46 हजार 170 रुपयांवर पोहोचलेत.

    सोन्याच्या दरात आठ दिवसात 9 हजार 500 तर चांदीच्या दरात तब्बल 18 हजारांची वाढ झाली आहे.

  • 11 Aug 2026 01:47 PM (IST)

    वसई विरार नालासोपारा मध्ये मागच्या दीड तासापासून मुसळधार पाऊस , मुख्य रस्ते जलमय

    वसई विरार नालासोपारा मध्ये मागच्या दीड तासापासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.  शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते जलमय झाले आहेत.  अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे

    विरार पूर्व मनवेलपाडा परिसरातील जिल्हा परिषद शाळेत सुद्धा पाणी साचलं आहे.  विरार पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे

  • 11 Aug 2026 01:36 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची होणार बैठक

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक होणार आहे. मंत्र्यांच्या विभागासंदर्भात कामकाजाचा एकनाथ शिंदे आढावा घेणार .  मागे झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांच्या खात्याचा आढावा घेतला होता.

    या बैठकीत प्रामुख्याने संबंधित मंत्र्यांच्या विभागाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय व त्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने करण्यात आलेली वा करण्यात येणारी कार्यवाही यावर चर्चा करून आढावा घेतला जाईल.

  • 11 Aug 2026 01:29 PM (IST)

    जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात BLO चं काम करणार्या कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली

    जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात BLO चं काम करणार्या कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली.  कामाच्या वाढत्या ताणामुळे जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील BLO क्रमांक 37, हेमेंद्र मेस्त्री यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे. उच्च कामाच्या दबावामुळे त्यांचा ब्लड प्रेशर वाढल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  हेमेंद्र मेस्त्री यांच्यावर सध्या वॉकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहे.

    निवडणूक प्रक्रियेतील वाढते काम, कागदपत्रांची पूर्तता आणि मतदार यादीशी संबंधित जबाबदाऱ्यांमुळे BLO वर मोठा ताण असल्याची चर्चा.

  • 11 Aug 2026 01:21 PM (IST)

    श्रावणात भाविकांना मोठा दिलासा; पाच महिन्यांनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पूर्णवेळ खुले

    पाच महिने पूर्णपणे बंद आणि गेल्या दोन महिन्यांपासून केवळ चार तास दर्शनासाठी खुले असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आता श्रावणाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी पूर्णवेळ खुले राहणार आहे. पहाटे पाच वाजता पूजा झाल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

  • 11 Aug 2026 01:08 PM (IST)

     मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

    मनोज जरांगे यांचे विटा येथे स्वागत होत असताना ताफ्यामधील वाहनाचा अपघात झाला.  एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत वाहनाने झाल्याने स्वतः मनोज जरांगे यांनी गाडीमध्ये बसवून रुग्णालयात दाखल केले.  स्वागतावेळी स्वागत मार्गावर प्रचंड गर्दी होती याच दरम्यान वाहनाचा धक्का लागल्याने कार्यकर्ता जखमी झाला होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

  • 11 Aug 2026 12:57 PM (IST)

    अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांची अखेर बदली

    महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख हे मराठाद्वेषी अधिकारी असल्याची टीका नरेंद्र पाटलांनी केली होती. दरम्यान देशमुखांच्या जागी अविनाश रणखांब यांची एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मराठा समाजातील उद्योजकांच्या नाराजीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नुकताच पाच जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मंजूर झालेल्या तरुणांचे एलवाय अचानक रद्द केल्याने त्यांच्या विरोधात मोठी नाराजी होती.

  • 11 Aug 2026 12:50 PM (IST)

    आदिवासी विकास विभागाच्या प्रलंबित देयकांवर आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक

    आदिवासी विकास विभागाच्या लेखाशीर्ष ५०५४, ५९२७ अंतर्गत प्रलंबित देयकांबाबत आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २ वाजता मंत्रालयातील मंत्री दालनात बैठक होणार.  महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या अध्यक्षांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठवण्यात आलं, प्रलंबित देयकांच्या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक आहे.

  • 11 Aug 2026 12:40 PM (IST)

    जैन मुनी निलेशचंद्रजी महाराजांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, घराघरात भवानी तलवार ठेवण्याचे केलं आवाहन

    अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर जैन मुनी निलेशचंद्रजी महाराज यांनी संताप व्यक्त केला . समाजाच्या सुरक्षेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केलं शस्त्र बाळगण्याच्या आवाहनामुळे त्यांच्या अहिल्यानगरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या वक्तव्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 11 Aug 2026 12:30 PM (IST)

    नंदुरबारच्या सातपुड्यातील दुर्गम भागात आजही रस्त्यांअभावी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास

    नंदुरबारच्या सातपुड्यातील दुर्गम भागात आजही रस्त्यांअभावी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. डबा ग्रामपंचायतीअंतर्गत माळी आंबा जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बांबूच्या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे. डबा ग्रामपंचायतीतील सहा पाड्यांना जोडणारा हा बांबूचा पूल असून, या सहा पाड्यांची लोकसंख्या सुमारे १ हजार ९०० आहे. वन विभागाच्या परवानगीअभावी माळीआंबा येथील वरखडी नदीवर साकव पूल उभारण्याचे काम रखडले आहे. ग्रामपंचायतीकडून ३:२ अंतर्गत प्रस्ताव सादर करूनही वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे, धोकादायक बांबूच्या पुलावरून विद्यार्थी, गर्भवती महिला आणि सर्पदंश झालेल्या रुग्णांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे…

  • 11 Aug 2026 12:20 PM (IST)

    बीडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न ; आरोपी पती मिलिंद शिरसट फरार.

    बीडमधील पिंपळनेर येथे कौटुंबिक वादातून व चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या 37 वर्षीय पत्नी अनुष्का शिरसट वर पेट्रोल ओतून पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या पीडितेवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, घटनेनंतर आरोपी पती मिलिंद शिरसाट फरार झाला आहे. उपचारादरम्यान पोलिसांकडे दिलेल्या जबाबात पतीने सतत केलेल्या छळ केला, तसेच पाढा वाचत पीडितेने “त्याला जन्मठेप द्या साहेब” अशी मागणी केली आहे. पेट्रोल ओतून पेटवण्यापूर्वी प्रचंड मारहाण झाली यादरम्यान मुलाने रोखण्याचा प्रयत्न केला मम्मीला मारू नका अशी विनवणी केली मात्र क्रूरपित्याने पेट्रोल ओतून पेटवून दिले. दरम्यान जबाब नोंदवला असुन पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास सुरू असल्याची माहिती पिंपळनेर पोलीसांनी फोनवरून बोलताना दिली आहे.

  • 11 Aug 2026 12:11 PM (IST)

    कोरोनानंतर विधी संघर्षित गुन्हेगारी वाढली पोलीस आयुक्तांचा स्पष्टीकरण

    विधिसंघर्षग्रस्त बालकांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर ठेवून त्यांच्यात सकारात्मक विचार, आत्मविश्वास, शिक्षण, कौशल्य, स्वावलंबन आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करण्यासाठी पुणे पोलिस आणि आदर्श मित्र मंडळ, धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद परिवर्तन यात्रा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. कोरोना नंतर बाल गुन्हेगारी वाढल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.. त्यामुळे या विधी संघर्ष बालकांचं मत परिवर्तन करण्यासाठी ही यात्रा मी काढली आहे. पुढील काळामध्ये शहरातील सर्व ठिकाणी अशी यात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 11 Aug 2026 11:50 AM (IST)

    संजय सरोवरातून वैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग

    मध्यप्रदेश राज्यात बरसलेल्या पावसामुळे संजय सरोवर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. 75 टक्के संजय सरोवर धरण भरला असल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता वैनगंगा नदी पात्रामध्ये पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

  • 11 Aug 2026 11:40 AM (IST)

    भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्या मुलावर हल्ला

    पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकल्या मुलावर हल्ला केला आहे. चिंचवड येथील चिंचवडेनगर परिसरात चार-पाच भटक्या कुत्र्यांनी मिळून एका चिमुकल्या मुलावर हल्ला केला आहे. भटके कुत्रे चिमुकल्या मुलावर हल्ला करत असतानाची संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

  • 11 Aug 2026 11:30 AM (IST)

    प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे बजाज कंपनीच्या गेटवर काम बंद आंदोलन

    प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे बजाज कंपनीच्या गेटवर काम बंद आंदोलन. टीमलिश फाउंडेशनने फसवणूक केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. डिग्री देतो म्हणून तीन वर्षे काम करून घेतल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. बजाज कंपनीचे एमडी राजू बजाज यांच्या सोबत राज ठाकरे याचं फोन वरून साधला संवाद झाला,

  • 11 Aug 2026 11:20 AM (IST)

    राहुल गांधीला पार्लमेंटमध्ये फक्त हंगामा करायचा आहे- संजय उपाध्याय

    राहुल गांधीला पार्लमेंटमध्ये फक्त हंगामा करायचा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चांगला काम करत आहे. काल अमित शहाजींनी एक एक प्रश्नाचे उत्तर दिलेला आहे असे आमदार संजय उपाध्याय म्हणाले.

  • 11 Aug 2026 11:10 AM (IST)

    राहुल गांधींना रांचीची गुंज ऐकू येत नाहीये का?- आशिष शेलार

    इंडिया आघाडीकडून झारखंडच्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. राहुल गांधींना रांचीची गुंज ऐकू येत नाहीये का? काँग्रेस आणि राहुल गांधींची भूमिका दुटप्पी आहे असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

  • 11 Aug 2026 10:55 AM (IST)

    मुंब्रा रेल्वे ब्रिजजवळ रेल्वेतून पडून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    ठाण्यातील मुंब्रा रेल्वे ब्रिजजवळ रेल्वेतून पडून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साईराज बेणारे असं मृत तरुणाचं नाव आहे. रेल्वेतून पडल्यानंतर तो मुंब्रा खाडीतील लोखंडी रॉडला अडकला होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वे पोलीस आणि मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • 11 Aug 2026 10:36 AM (IST)

    धुळेकरांना मोठा दिलासा! बारा प्रकल्पापैकी ५ प्रकल्प पूर्ण भरले

    धुळ्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील बारा माध्यम प्रकल्पांपैकी पाच माध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले आहेत. त्याचबरोबर उर्वरित सात मध्यम प्रकल्प कमी अधिक प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे लवकरच धुळेकरांना पाणीदिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • 11 Aug 2026 10:22 AM (IST)

    NDA खासदारांचा संसद भवन परिसरात मोर्चा

    NDA खासदारांचा संसद भवन परिसरात मोर्चा सुरू आहे. या खासदारांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात मोर्चा काढला आहे. भाजप प्रणित एनडीएच्या खासदारांकडून राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. या खासदारांच्या हातात पोस्टर देखील दिसत आहे.

  • 11 Aug 2026 10:16 AM (IST)

    Jharkhand Bandh : झारखंडमध्ये बंदची हाक; भाजप नेते रस्त्यावर उतरले

    झारखंडच्या रांचीमध्ये पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात भाजपने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजप नेते रस्त्यावर उतरले आहेत. तर काही ठिकाणी टायर जाळून झारखंड सरकारचा निषेध करण्यात येत आहे.

  • 11 Aug 2026 10:08 AM (IST)

    पुण्यात गाड्या तोडफोडीचं सत्र सुरूच

    पुण्यात अज्ञातांनी रस्त्यावरील उभ्या गाड्या फोडल्या आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील सुयोगश्री सोसायटी समोरील गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञातांकडून जवळपास चारचाकी पाच ते सहा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • 11 Aug 2026 09:50 AM (IST)

    श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी ९६७ ग्रॅम वजनाचा चांदीचा टोप अर्पण

    पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पांगरे येथील अभिजीत विलास काकडे यांनी आज श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी ९६७ ग्रॅम वजनाचा चांदीचा टोप अर्पण केला. अर्पण केलेल्या चांदीच्या मुकुटाची जवळपास दोन लाख 41 हजार एवढी किंमत आहे. अभिजीत काकडे हे सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवींची ओटी भरून कुलधर्म-कुलाचार करत देवींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी ९६७ ग्रॅम वजनाचा चांदीचा टोप अर्पण केला.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अभिजीत काकडे यांचा सन्मान करण्यात आला.

  • 11 Aug 2026 09:40 AM (IST)

    धाराशिवच्या आठही तालुका कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन

    धाराशिव जिल्ह्यामध्ये कृषी निविष्ठेच्या घोटाळा प्रकरणांमध्ये निलंबित झालेल्या 15 कृषी अधिकाऱ्यांमध्ये धाराशिव जिल्ह्याच्या आठही तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी निलंबित झाले आहेत.यामुळे कृषी विभागाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. तालुक्याला कृषी अधिकारी नसल्याने मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांच्या योजनांसह पीक पाहणी, पंचनामे आणि अनुदानाच्या कामांवर परिणाम झाल्याचे दिसत आहे

  • 11 Aug 2026 09:30 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात पोलिस दलाची धडक अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम

    जळगाव जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या शेकडो हातभट्टी व गावठी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी. दारूबंदी कायद्यान्वये दाखल ८२ गुन्ह्यांत ८२ आरोपींना अटक करत २४ लाख १३ हजार ७३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. या कारवाईत २२,०२३ लिटर गावठी दारू, रसायने जप्त करून जागीच नष्ट. शैक्षणिक संस्था व रुग्णालयाच्या ५० मीटर अंतराच्या आत असलेल्या ३१ पानटपऱ्या निष्कासित. चोरीचा माल खरेदी-विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यातील ११३ भंगार दुकानांची झाडाझडती

  • 11 Aug 2026 09:20 AM (IST)

    सिंहगड रोडवरील सुयोगश्री सोसायटी समोरील गाड्यांची तोडफोड नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

    पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणी वरती आला आहे सिंहगड रोडवरील आमची सोसायटी हा शांत परिसर आहे मात्र अज्ञात व्यक्तीकडून या ठिकाणी येऊन गाड्यांची तोडफोड करत अशांतता प्रस्थापित करण्यात आली पोलिसांकडून आरोपीला जबर वचक बसला पाहिजे आमच्या महिलांमध्ये तसेच मुलांमध्ये भीतीच वातावरण आहे.

  • 11 Aug 2026 09:07 AM (IST)

    सातपुड्यातील मोलगी-मनीबेली रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचा जीवघेणा प्रवास

    जिल्ह्याच्या ठिकाणापासून १२५ किलोमीटर अंतरावरील रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष….मोलगी-मनीबेली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; दहा गावांचा दळणवळणाचा मार्ग धोक्यात….२००९ मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार झालेला रस्ता देखभालीअभावी उद्ध्वस्त…. रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने नागरिकांमध्ये संताप; आरोग्यसेवेसाठीही हालअपेष्टा….जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न कायम….

  • 11 Aug 2026 08:54 AM (IST)

    वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन कर्मचारी यांचा आज सकाळपासून संप

    वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन कर्मचारी यांचा आज सकाळपासून संप सुरू आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. आज सकाळपासूनच परिवहन कर्मचारी संपावर गेल्याने सर्व परिवहनच्या बस आगारातच ठप्प झाल्या आहेत. इतर महापालिकांप्रमाणे परिवहन सेवेचं वेतन लागू करा, ओटी चालू करा, कामाचे आठ तास करा, यासह अन्य मागण्यासाठी परिवहन कर्मचारी यांनी संप पुकारला आहे. परिवहनच्या संपामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत.

  • 11 Aug 2026 08:44 AM (IST)

    नाशिक- अवघ्या चार महिन्यांपूर्वीचा काँक्रिटचा रस्ता पुन्हा फोडल्याने नगरसेविका हेमलता पाटील आक्रमक

    नाशिक- अवघ्या चार महिन्यांपूर्वीचा काँक्रिटचा रस्ता पुन्हा फोडल्याने नगरसेविका हेमलता पाटील आक्रमक झाल्या आहेत. महापालिकेने काँक्रिटीकरण केलेल्या कॅनडा कॉर्नर परिसरातील रस्त्याची चार महिन्यांतच पुन्हा स्मार्ट सिटीकडून खोदकाम करण्यात आलं. वर्षभर बंद असलेला रस्ता नुकताच सुरू झाला असताना पुन्हा काँक्रिट फोडण्याचं काम सुरू झालं. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्हीसाठी चेंबरचं काम सुरू असल्याचं समोर आलं आहे.

  • 11 Aug 2026 08:34 AM (IST)

    अमरावतीच्या धामोरी इथल्या हत्याकांडातील आरोपींची पोलिसांकडून धिंड

    अमरावतीच्या धामोरी इथल्या हत्याकांडातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. मृत राहुल रावेरकर यांच्या वाठोडा शुक्लेश्वर गावात आरोपी साहिल भगत आणि पियुष गायकवाड यांची गावकऱ्यांसमोर धिंड काढण्यात आली. आरोपीची धिंड काढत असताना संपूर्ण गाव एकत्र जमा झालं होतं. आरोपींची धिंड काढत असताना गावकरी प्रचंड आक्रमक झाले होते. राहुल रावेरकर यांच्या हत्येच्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 11 Aug 2026 08:24 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुण्यात आज भाजपची तिरंगा यात्रा

    पुण्यात आज भाजपची तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी ४ वाजता फर्ग्युसन रस्त्यावरील ललित महाल हॉटेल पोलीस परेड ग्राउंड ते धर्मवीर संभाजी महाराज पुतळा डेक्कन इथपर्यंत रॅली असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक यांच्याकडून रॅलीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

  • 11 Aug 2026 08:23 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर मंदिरात 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान व्हीआयपी दर्शन राहणार बंद

    नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. श्रावण महिन्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थानने हा निर्णय घेतला आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संख्येवर देखील मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दिवसभरात ठरवून दिलेल्या वेळेत फक्त वीस अति महत्त्वाच्या व्यक्तींची दर्शन व्यवस्था होणार आहे.

  • 11 Aug 2026 08:20 AM (IST)

    नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त आक्रमक

    नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त आक्रमक झाले आहेत. खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्तांकडून 5 कार्यकारीसह 8 उपअभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसला सात दिवसात उत्तर द्या अन्यथा थेट राज्य शासनाकडे अहवाल पाठवणार, अशा इशारा देण्यात आला आहे. शहरातील खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत 6 जणांचा बळी गेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीनंतर नाशिकमध्ये अधिकारी ॲक्शन मोडवर आले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामं आणि शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. नाशिक महापालिका आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, पोलीस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून शहरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. रस्त्यांची कामं वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले आहेत. किमान 1 लेन सुरू होईल या अनुषंगाने 31 ऑगस्टपर्यंत रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत एक लेन सुरू करण्याचं नियोजन आहे. त्र्यंबक रोडवरील कामेही वेगाने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा-मनोरंजन क्षेत्रातील आणि इतरही बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Aug 11,2026 8:16 AM

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...