AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar News: अजितदादांचा अपघात नसून…; रोहित पवारांचा दावा, 15 नोव्हेंबरला मोठा बॉम्ब फोडणार, काय उघड करणार?

Rohit Pawar Questions Probe Into Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या अपघाताबाबत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास अपेक्षित गतीने पुढे जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Rohit Pawar News: अजितदादांचा अपघात नसून...; रोहित पवारांचा दावा, 15 नोव्हेंबरला मोठा बॉम्ब फोडणार, काय उघड करणार?
Rohit Pawar Challenges Ruling Leaders Over Ajit Pawar Crash Probe
| Updated on: Nov 09, 2026 | 8:52 PM
Share

अजितदादांच्या अपघाताबाबत आम्हाला शंका आहे. तपास संथ गतीने सुरू आहे. ज्या पद्धतीने तपास व्हायला हवा होता, तसा होताना दिसत नाही. सत्ताधारी योग्य दिशेने तपास करत नसल्याचा आमचा संशय आहे. महाराष्ट्रातील ९० टक्क्यांहून अधिक लोकांना हा अपघात नसून घातपात असावा, असं वाटतं, असा दावा रोहित पवारांनी केला आहे.

या प्रकरणात साधी एफआयआरही दाखल होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, 15 नोव्हेंबरला या प्रकरणासंदर्भात महत्त्वाचं प्रेझेंटेशन करणार असल्याची माहिती दिली. या प्रेझेंटेशनमधून काही महत्त्वाच्या बाबी समोर आणणार आहोत. त्यातून अजितदादांना न्याय मिळवून देण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. दिवाळी होऊ दे, त्यानंतर शेवटचं प्रेझेंटेशन मी घेईन, असंही त्यांनी सांगितलं. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता ते आरोप आपण ऐकले नसल्याचं रोहित पवार म्हणाले.

मात्र, सुनील तटकरे यांचं नाव या प्रकरणाशी जोडण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. सत्ताधाऱ्यांकडे या प्रकरणाबाबत काही वेगळी माहिती असेल, तर त्यांनी केवळ नावं घेण्याऐवजी पुरावे समोर आणावेत. त्यामुळे सत्य शोधण्यास मदत होईल आणि अजितदादांना न्याय मिळू शकेल, असं आवाहनही त्यांनी केलं. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तासंघर्षावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं.

सतेज पाटील यांच्या पॅनेलचे बहुतांश उमेदवार निवडून आले असतानाही भाजप आणि मित्रपक्षांकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गोकुळमध्ये बंटी पाटील यांच्या पॅनेलला लोकांनी कौल दिला. मात्र दुर्दैवाने भाजप आणि मित्रपक्ष रडीचा डाव खेळत आहेत. आज मी गोकुळमधील भाषणं ऐकली. त्यात सगळ्यांनी हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केलं. मात्र या सगळ्यामागचे मुख्य सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्याबाबत कोणीही बोललं नाही, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय चार जणांना मतदानाचा अधिकार देण्यासारखी गोष्ट शक्य नसल्याचा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणात ज्यांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यांनाच लक्ष्य करणं गरजेचं होतं. मात्र आजच्या भाषणांमध्ये ते दिसलं नाही, असं रोहित पवार म्हणाले. गोकुळमधील संघर्ष हा केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील संविधान वाचवण्याचा लढा असल्याचंही त्यांनी म्हटलं.

सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणात केवळ आरोप-प्रत्यारोप न करता पुरावे समोर आणावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या भेटीवरून विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं असताना रोहित पवार यांनी अशा कोणत्याही चर्चेचा विरोध केला आहे. अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना त्यांनी गोकुळच्या सत्तासंघर्षातही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Follow Us
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!