AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटनला मिळणार पहिल्या मुस्लीम पंतप्रधान?, कोण आहेत शबाना महमूद?

ब्रिटनच्या राजकारणात एपस्टीन फाईलने वादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची खुर्ची अडचणीत आली आहे. जर त्यांनी राजीनामा दिला तर संभाव्य पंतप्रधान म्हणून शबाना महमूद यांचे नाव पुढे आले आहे, कोण आहेत शबाना महमूद ?

ब्रिटनला मिळणार पहिल्या मुस्लीम पंतप्रधान?, कोण आहेत शबाना महमूद?
Shabana Mahmood
| Updated on: Feb 09, 2026 | 9:45 PM
Share

ब्रिटनचे राजकारण सध्या मोठ्या संकटातून जात आहे. पंतप्रधान कीर स्टार्मर यांना लेबर पार्टीतून अंतर्गत विरोध होत आहे. याच दरम्यान पंतप्रधान पदासाठी शबाना महमूद यांचे नाव चर्चेत आहे. शबाना महमूद सध्या ब्रिटनच्या गृहमंत्री ( होम सेक्रेटरी ) आहेत. जर ब्रिटनचे राजकारणात उलटफेर झाला तर त्या देशाच्या पहिल्या मुस्लीम पंतप्रधान होऊ शकतात.

या राजकीय संकटाचे मोठे कारण आहे अमेरिकेत उघड झालेले एपस्टीन फाईल्स प्रकरण. एपस्टीन फाईल्समध्ये ब्रिटनचे पंतप्रधान कीर यांनी नियुक्त केलेल्या राजदूत पीटर मंडेलसन यांचे नाव आल्यानंतर स्टार्मर यांच्यावर दबाव वाढला आहे. स्टार्मर यांच्यावर लेबर पार्टीचे बहुतांशी खासदार नाराज असल्याचे म्हटले जात आहे. ब्रिटनमध्ये लेबर पार्टीचे सरकार आहे. लेबर पार्टीकडे हाऊस ऑफ कॉमन्सच्या ६५० पैकी ४०४ जागा आहेत.

शबाना महमूद कोण आहेत ?

शबाना महमूद ४५ वर्षाच्या आहेत आणि पेशाने एक वकील आहेत. त्यांची गणती लेबर पार्टीच्या मजबूत आणि महत्वाकांक्षी नेत्यात केली जाते. त्या पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या जवळच्या मानल्या जातात. आणि पक्षातील एक प्रभावशाली वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. वैचारिक रुपाने त्या लेबर पार्टीच्या उजव्या विचारसरणीच्या गटाशी संबंधित ओळखल्या जातात.

शबाना बर्मिंघम लेडीवुड सीटवरुन लेबर पार्टीच्या खासदार आहेत.त्यांचा जन्म १९८० मध्ये बर्मिंघम मध्ये झाला होता. तेथे त्या जुळ्या भावासोबत मोठ्या झाल्या. शबाना यांचा परिवार पाकव्याप्त कश्मीरच्या मीरपुरशी संबंधित आहे. त्यांनी साल २००२ मध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लिंकन कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर साल २००३ मध्ये त्यांनी इनस ऑफर कोर्ट स्कुल ऑफ लॉमधून बार व्होकेशनल कोर्स केला आणि त्या बॅरिस्टर बनल्या.

राजकीय प्रवास

साल २०१० मध्ये शबाना महमूद पहिल्यांदा ब्रिटनच्या खासदार झाल्या. त्या रुशानारा अली आणि यास्मीन कुरेशी यांच्या सोबत पहिल्या मुस्लीम महिला खासदारात समाविष्ट झाल्या. हळूहळू त्यांनी पक्षात आपले स्थान तयार केले आणि ओळख बनवली. साल २०२५ मध्ये त्यांना ब्रिटनचे गृहमंत्री केले होते.

इमिग्रेशनवर कठोर धोरण

शबाना महमूद यांची ओळख एकीकडे मुस्लीम समुदायाशी जोडलेल्या नेत्या म्हणून आहे ,त्यामुळे त्या मुस्लीम आणि प्रो-पॅलेस्टाईन समर्थकांपर्यंत त्यांची पोहचू शकतात. मात्र त्यांची धोरणे खास करुन इमिग्रेशन संदर्भात कठोर आहेत. त्यांच्या मते ब्रिटनमध्ये स्थायी निवास हा अधिकार नाही, ती एक विशेष सुविधा आहे.

शबाना या पंतप्रधान होण्याची संधी मिळण्यासाठी एकतर कीर स्टार्मर यांनी राजीनामा देणे गरजेचे किंवा लेबर पार्टीतून कीर यांना आव्हान मिळणे गरजेचे आहे. यासाठी किमान ८१ लेबर खासदाराचे समर्थन हवे आहे. येत्या काही दिवसात शबाना ही संधी प्राप्त करतात का हे पाहणे गरजेचे आहे.

Follow Us
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.