चिमुकल्या मुंग्यांनी बांधलेल्या वारुळातच सापांना राहायला का आवडतं? आश्चर्यकारक कारण समोर
वारूळ दिसलं की अनेकांना त्यात साप असण्याची भीती वाटते. पण स्वतः वारूळ न बांधणारे साप मुंग्या आणि वाळवीने तयार केलेल्या या जागेत नेमके का राहतात? तापमानापासून सुरक्षित आश्रयापर्यंत अनेक रंजक कारणं यामागे आहेत.

तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, मुंग्यांच्या वारुळामध्ये इतके साप का असतात? सापांबद्दल आपल्या सर्वांना भीती वाटते, त्यांच्याबद्दल अनेक माहिती मिळते. कधी ती बरोबर असते तर कधी ती चुकीची असते. त्यातूनच या सापांच्या जीवाला धोका निर्माण होणाऱ्या कृती मानवाकडून केल्या जातात. त्यामध्ये अनेक बिनविषारी सापांच्या जीवाला आपण धोका निर्माण करतो. मनुष्य जीवाला सापाबद्दल भीती जरी वाटत असली तर त्याच्याबद्दल प्रचंड क्रेझही पाहायला मिळते. अनेक देवी देवता यांचे सापांशी नाते आहे. महादेवाचे स्वरुप म्हणून सापाकडे पाहिले जाते.
त्याचवेळी सापांवर आधारीत अनेक सिनेमेही निघाले आहेत. फक्त बॉलिवूडच नाही तर मराठी आणि थेट हॉलिवूडनेही सापांवर आधारीत सिनेमे निर्माण केले आहेत, एवढी प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल त्यांच्याबद्दल राहिलेले आहे. मात्र आपण अनेकदा बघतो की साप बिळातून बाहेर येतात. असा सीन अनेकांनी सिनेमांमध्येच पाहिलेला असतो.
मुंग्या आपली घरटी सुंंदर अशा किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या वारुळांनी बांधतात. पण अशा वारुळांमध्ये साप का राहतात? आणि ते तिथेच राहणं का पसंत करतात, असे प्रश्न साहजिकच उपस्थित होतात. त्याच उत्तर आता मिळालं आहे. आपण पाहतो की मुंग्या या त्यांना राहण्यासाठी मातीचे वारुळ तयार करतात. आणि सापांआधी तिथे मुंग्या १०० टक्के प्रमाणात आढळून येतात. यात अजून एक विशेष बाब म्हणजे वारुळांमध्ये केवळ मुंग्याच आढळून येतात. त्याशिवाय इतर कोणीही त्याठिकाणी अधिवास करत नाही. पण तिथे साप मात्र जाऊन राहायला लागतो.
काय आहे कारण?
त्यामागे कारण असं आहे की, साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे. त्यामुळे मुंग्यांनी बनवलेले वारुळ हे त्यासाठी अतिशय अनुकूल असते. बाहेर वातावरण उष्ण असो किंवा थंड सापासाठी जमिनीवर किंवा जमिनीच्या आत खोलवर बनवलेले मुंग्यांचे वारुळ हे अतिशय आरामदायी असते. त्याशिवाय वारुळामध्ये अनेक लहान मोठी छिद्र असतात. त्यामुळे गरुड आणि मुंगूस यांसारख्या त्याच्या शिकारी शत्रूंपासून स्वतःचा बचावही करु शकतात.