Twin Tower: जागेची किंमत इतके कोटी, मंदिर बांधणार की नवी बिल्डिंग, पाडलेल्या ट्विन टॉवरच्या जागी काय होणार? पुन्हा नवा वाद

| Updated on: Sep 04, 2022 | 3:56 PM

संबंधित बिल्डर या जागेवर नवी निवासी योजना विकसीत करण्याच्या प्रयत्नात आहे. तर बिल्डरच्या विरोधात कोर्टात जाणाऱ्या एमराल्ड कोर्टाच्या रहिवाशांनी याला विरोध केला आहे. युपरटेकच्या माध्यामातून या ठिकाणी पुन्हा प्रोजेक्टचे काम सुरु झाले तर पुन्हा कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Twin Tower: जागेची किंमत इतके कोटी, मंदिर बांधणार की नवी बिल्डिंग, पाडलेल्या ट्विन टॉवरच्या जागी काय होणार? पुन्हा नवा वाद
Image Credit source: social media
Follow us on

नोएडा- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दिल्लीला लागून असलेल्या नोएडा(Noida)तील 100 मीटर उंचीच्या ट्विन टॉवरला (twin towers)स्फोटांनी जमीनदोस्त करण्यात आले. आता या जागी नव्याने कोणती वास्तू (new construction) उभी राहणार, यावरुन नवा वाद सुरु झाला आहे. आता हे प्रकरणही पुन्हा कोर्टात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. नोएडातील या जागी सुपरटेकच्या माध्यमातून अनधिकृत रित्या दोन टॉवर्स बांधण्यात आले होते. सध्या आता बिल्डिंग पाडण्यात आल्यानंतर या जागी नव्याने काय बांधण्यात येणार, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सध्याच्या जमिनीच्या दरांचा विचार करता या जागेची किंमत 80 कोटी रुपयांच्या आसपास आहे. अशी माहितीही बिल्डरकडून देण्यात आलेली आहे.

काय आहे नवा वाद?

पीटीआय न्यूज एजन्सीच्या एका वृत्तानुसार, संबंधित बिल्डर या जागेवर नवी निवासी योजना विकसीत करण्याच्या प्रयत्नात आहे. तर बिल्डरच्या विरोधात कोर्टात जाणाऱ्या एमराल्ड कोर्टाच्या रहिवाशांनी याला विरोध केला आहे. युपरटेकच्या माध्यामातून या ठिकाणी पुन्हा प्रोजेक्टचे काम सुरु झाले तर पुन्हा कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एमराल्ड कोर्ट निवासी असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितले आहे की, बिल्डरने असा निवासी योजना बांधण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रयत्नांचा आम्ही विरोध करु. वेळ पडल्यास या प्रकरणात कोर्टातही धाव घेऊ.

या प्रकरणात चर्चा करण्यासाठी या परिसरात राहात असलेल्या नागरिकांची लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आता या ट्विटन टॉवरच्या जागी मंदिर बांधावे असाही एक प्रस्ताव समोर आलेला आहे.

हे सुद्धा वाचा

मंदिर बांधायचे की गार्डन याचा निर्णय होणार

एमराल्ड कोर्ट रहिवासी असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितले आहे की- या सोसायटीच्या परिसरात अनधिकृतरित्या या ट्विन टॉवरचे बांधकाम करण्यात आले होते. ही जागा ओपन स्पेस म्हणजे बगिच्यासाठी निश्चित करण्यात आलेली होती. या ठिकाणी आता एक उद्यान तयार करण्याची आमची योजना आहे. या ठिकाणी एक मंदिर उभारावे असाही प्रस्ताव आलेला आहे. याबाबत सोसायटीतील लोकांची एक बैठक आम्ही लवकरच घेऊ. त्या बैठकीच्या आधारावरच याबाबतचा निर्णय करण्यात येणार आहे.

बिल्डरला हवा आहे हौसिंग प्रोजेक्ट

सुपरटेकचे अध्यक्ष आर के अरोरा यांनी सांगितले आहे की, या जमिनीवर नवा हौसिंग प्रोजेक्ट विकसीत करण्याची योजना आहे. यासाठी आवश्यकता पडल्यास निवासी रहिवाशी असोसिएशनची परवनगीही घेण्यात येईल. कंपनीकडे या परिसरात २ एकर जमीन आहे आणि ती जागा हिरवळीसाठी राखून ठेवण्यात आलेली नाही, असेही बिल्डरकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. जर बिल्डिंग बांधण्याची परवानगी देण्यात आली नाही. तर नोएडा प्राधिकरणाकडे या जमिनीसाठी देण्यात आलेली रक्कम परत मागण्यात येणार आहे. अरोरा यांनी सांगितले आहे की- सध्याच्या जमिनीच्या दरांचा विचार करता या जागेची किंमत 80 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या योजनेसाठी अतिरिक्त एफएसआयसाठी २५ कोटी रुपये दिल्याचेही बिल्डरने सांगितलेले आहे.