
काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप आहे. हा आतापर्यंतचा काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला मोठा हल्ला आहे. यात 26 निरपराध लोकांचा मृत्यू झालाय. या दरम्यान काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात काही महिला अस काही बोलून गेल्या की, सोशल मीडियावर यूजर्स भडकले. या महिलांची युजर्सनी शाळा घेतली. ‘थोडी शी गडबड’, ‘छोटीशी गोष्ट’ अशी वाक्य वापरुन या महिलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची भयानकता, गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला असा आरोप नेटीझन्सनी महिलांवर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काश्मीरच्या कुठल्यातरी हॉटेलमध्ये महिला पर्यटकांचा ग्रुप दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला हसत, हसत बोलतेय की, आम्ही लोक इथे काश्मीरला आलो आहोत. भरपूर मजा करतोय. इथे पहलगाममध्ये थोडीशी गडबड झालीय. तरीही काही अशी गोष्ट नाहीय. तुम्ही सुद्धा या. त्यानंतर दुसरी एक महिला बोलते, असं थोड बहुत चालूच असतं. त्यावर अन्य महिला मान हलवून आपली सहमती देतात.
जे पाहून नेटीझन्स भडकले
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये काही पर्यटक हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की, ते हल्ल्याच्या एकदिवसानंतर काश्मीर फिरत आहेत. त्या जागेच्या सौंदर्याबद्दल लोकांना सांगत आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडिया X वर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जे पाहून नेटीझन्स भडकले आहेत.
यांची जीभ अडखळली नाही का?
अशा एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना यूजरने लिहिलय की, लाज वाटली पाहिजे. या गोष्टीतून तुमचं संगोपन दिसून येतं. दुसऱ्या युजरने म्हटलं किती बेशर्म आहेत, थोडीशी गडबड आणि असं चालू असतं बोलते. हे बोलताना यांची जीभ अडखळली नाही का?. एका अन्य यूजरने लिहिलय, हे देवा! ही काय बोलतेय.
Secular “heartless” women of India said “CHOTA BOHOT CHALTA HI REHTA HAI KOI BAAT NAHI SAB KASHMIR AAO”
shame! pic.twitter.com/xOQkE0flo3
— Hindutva Vigilant (@VigilntHindutva) April 24, 2025
पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव आहे. बैसारन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यानंतर भारताने आपल्या शेजारी देशाविरोधात अनेक निर्णय घेतले आहेत.