नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. देशाला गेल्या 70 वर्षांत जे हवे होते ते आता घडले आहे. भारतात 1947 मध्ये शेवटचा चित्ता दिसला होता. यानंतर चित्ता नामशेष झाला. सरकारने चित्ते नामशेष झाल्याची घोषणा केली. त्यानंतर 2022 चा सप्टेंबर महिन्यात नामिबिया येथून 8 चित्ते आणण्यात आले. या आठ चित्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवले. त्यात आनंदाची बातमी यातील एका चित्ताने चार पिल्लांना जन्म दिला आहे.
कुनोमध्ये जन्मलेले चित्ते परदेशी नसून भारतीय आहेत. यामुळे भारत सरकारने या भारतीय चित्तांची नावे सूचवण्याचे आवाहन केले आहे. या चित्त्यांना कोणत्या नावाने हाक मारावी अशी तुमची इच्छा आहे? तर मग फक्त इतके करा.
काय आहे प्रक्रिया
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एक स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेत तुम्ही कुनो येथे जन्मलेल्या 4 चित्त्यांची नावे तुम्ही देऊ शकता. MyGovIndia या वेबसाइटवर ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. यासोबतच, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ट्विटरवरही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. स्पर्धा 1 एप्रिल 2023 पासून सुरू झाली आहे अन् 30 एप्रिलपर्यंत सुरु असेल. चला, आता त्यात सहभागी होण्याची प्रक्रिया समजून घेऊया…
काय आहेत नावे
कोणी चित्यांचे नाव राम ठेवण्यास सांगितले आहे, तर कोणी स्वातंत्र्यसैनिकांचे नाव सुचवले आहे.स्पर्धा 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अशा स्थितीत आणखी हजारो नावे येण्याची शक्यता आहे. त्यानंतर चार नावांची निवड केली जाईल, त्यात तुम्ही सूचवलेले नावही असू शकते.