मला सासूसोबतच राहायचे… तरुणाचे 5 मुलांच्या आईवर प्रेम, लग्नाच्या हट्टावर कायम, पत्नीला थेट…

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक तरुण मुलगा चक्क 5 मुलांची आई असलेल्या महिलेच्या प्रेमात पडला आहे. त्याच्या आईने त्याला प्रचंड समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगा हट्टाला पेटला आहे.

मला सासूसोबतच राहायचे... तरुणाचे 5 मुलांच्या आईवर प्रेम, लग्नाच्या हट्टावर कायम, पत्नीला थेट...
Tejveer love story
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 11:12 AM

‘आम्हाला दोघांना एकत्र राहायचे आहे. नात्यात ही माझी सासू लागते. पण मला तिच्याशी लग्न करायचे आहे. माझी पत्नी माझ्यासोबत राहिली किंवा नाही, याचा काहीही संबंध नाही. हे चुकीचे आहे, पण काय करायचे. तिच्या पाच मुलांना आमच्यासोबत राहायचे असेल तर आम्ही त्यांचाही सांभाळ करु…’ असे एका तरुणाचे म्हणणे आहे. एक तरुण चक्क सासूच्या प्रेमात पडला आहे. त्याने थेट तिच्याशी लग्न करणार असल्याचे म्हटले आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे वाचा?

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील शहर कोतवाली क्षेत्रातील खरगजीत नगरचे असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबात सासू आणि तरुण यांच्यातील जवळिकीची बाब समोर आल्यानंतर लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. महिलेच्या मुलांनाही जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी याला विरोध केला. कुटुंबातील लोकांचे म्हणणे आहे की दोघांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. या दरम्यान घरात खूप गोंधळ झाल्याची बाब समोर आली.

दोघांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम

या प्रकरणात प्रेमी तरुण तेजवीर याचेही विधान समोर आले आहे. त्याचे म्हणणे आहे की त्याचे सासूवर प्रचंड प्रेम आहे. सासूचे देखील त्याच्यावर प्रेम आहे आणि दोघांना एकत्र राहायचे आहे. तर महिलेचा मुलगा अंशुल याने सांगितले की त्याने आपली आई आणि तेजवीर यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही त्याची कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नाहीत.

महिलेच्या मुलाने काय सांगितले?

अंशुल याने असाही आरोप केला की वादादरम्यान दोघेही प्रचंड चिडले होते. त्यांनी थेट गॅस सिलिंडरला आग लावण्याचा प्रयत्न केला होता. अंशुलचे म्हणणे आहे की आईने त्याला सांगितले आहे की ते दोघे एकत्र राहतील, नाहीतर आम्हाला गोळ्या घाला. घटनेसंदर्भात पोलीस तेव्हा प्रत्यक्षात काय घडले आणि आग लावण्याची परिस्थिती कशी निर्माण झाली, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. आता पुढे काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us