जागतिक महिला दिन विशेष : कंफर्ट व्हर्सेस फॅशन, दोन्ही कसे मिळवाल?

नेल्सन जाफरी, डिझाईन हेड, लिवा, बिर्ला सेल्यूलोज जागतिक महिला दिन विशेष : “आरामदायीपणा सर्वात महत्वाचा” हे सर्वश्रूत आहे. परंतु जेव्हा स्त्रियांच्या फॅशनचा विषय येतो, तेव्हा एखादी गोष्ट निवडताना केवळ ह्या एकाच गोष्टीचा विचार करुन चालत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ऍथलेअरचा ट्रेंड वाढत आहे. स्त्रियांना दोन्ही गोष्टी मिळवून देण्यासाठी अनेक काळापासून फॅशन विरूद्ध कम्फर्ट असे वादविवाद […]

जागतिक महिला दिन विशेष : कंफर्ट व्हर्सेस फॅशन, दोन्ही कसे मिळवाल?
Nupur Chilkulwar

| Edited By: Team Veegam

Jul 05, 2019 | 4:12 PM

नेल्सन जाफरी, डिझाईन हेड, लिवा, बिर्ला सेल्यूलोज

जागतिक महिला दिन विशेष : “आरामदायीपणा सर्वात महत्वाचा” हे सर्वश्रूत आहे. परंतु जेव्हा स्त्रियांच्या फॅशनचा विषय येतो, तेव्हा एखादी गोष्ट निवडताना केवळ ह्या एकाच गोष्टीचा विचार करुन चालत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ऍथलेअरचा ट्रेंड वाढत आहे. स्त्रियांना दोन्ही गोष्टी मिळवून देण्यासाठी अनेक काळापासून फॅशन विरूद्ध कम्फर्ट असे वादविवाद सुरु आहेत. जेव्हा फॅशनचा विषय येतो, तेव्हा फॅशनचे समर्थक निःसंशयपणे अधिक क्रियेटीव्ह होतात. मात्र, त्यात कम्फर्टकडे तेव्हढे लक्ष दिले जात नाही.

आपण 21 व्या शतकात आहोत, जिथे आज स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. यातच जग ज्या वेगाने धावत आहे, त्याच वेगाने आता स्त्रियांच्या कपड्यांमध्येही बदल होतो आहे. तसेच ऑफिसमध्ये काम करताना किंवा मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवताना कुठले कपडे घालावे, कुठली फॅशन करावी हेही महत्त्वाचं ठरतं. त्यामध्ये कम्फर्ट हा कुठेतरी हरवून जातो. कारण जर फॅशन करायची असेल तर त्यात कम्फर्ट हा खूप कमी असतो. पण आता अधिक आरामदायक सोबतच फॅशनेबल कपड्यांची निवड करण्याची वेळ आली आहे.

अलीकडच्या काळात लाउंजवेअर (Loungeware) खूप वर्षांनी फॅशनमध्ये परत आले आहे. हे आरामदायक तर आहेतच, सोबतच सध्या ट्रेंड मध्येही आहेत. मैत्रिणींसह फिरायला जाताना तुम्ही हे सहज कॅरी करु शकता, तसेच तुम्ही ते ऑफिस किंवा इतर कुठल्या पार्टीमध्येही घालू शकता. हे फॅशनेबल आहे आणि कम्फर्टेबलही.

तुम्ही त्यांना ‘जॉगर्स’ही म्हणू शकता. जॉगिंगला जाताना हे स्वेटपॅन्टस म्हणूनही घालू शकता. सध्या आपण फॅशनच्या सुवर्णयुगात राहत आहोत, याला आपण एका आळशी मुलीच्या फॅशनचे स्वर्गही म्हणू शकतो. कारण हे लाउंजवेअर अगदी घरच्या कपड्यांसारखा आरामदायकपणाचा अनुभव करवून देतात. त्यामुळे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव राहत नाही. तुम्ही निसंकोचपणे वावरु शकता.

व्हिस्कोस हा एक अशाप्रकारचा कपडा आहे, जो पुर्णपणे पर्यावरण अनुकुल आहे. हा कपडा उत्कृष्ट कम्फर्ट देतो. त्यामुळे लाउंजवेअरसाठी या कपड्याची निवड करण्यात आली. व्हिस्कोसपासून बनवलेल्या कपड्यांचे टेक्सचर हे सॉफ्ट असते. त्यामुळे त्यांना सहजरित्या कॅरी करता येते. यामध्ये ब्राईट कलर्स तसेच पेस्टल कलर्स सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हालाही फॅशनेबल आणि तितकेच आरामदायक कपडे घालायचे असेल तर तुम्ही लाउंजवेअरची निवड नक्की करु शकता.

(नोट : ब्लॉगमधील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें