
Bijnor Station : अमृतभारत अंतर्गत भारतीय रेल्वेच्या स्थानकांचा पुनर्विकास केंद्र करणार करीत आहे.या योजनेंतर्गत देशातील १०३ स्थानकांचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे २२ मे २०२५ रोजी होत आहे.

Samalpatti Station : रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भारत सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या 'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत, देशभरातील १०३ स्थानकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील.

Sihor Station : या प्रसंगी,द. मध्य रेल्वे South Central Railway, नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या ५ स्थानकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदर्शप्रणालीद्वारे ऑनलाईन होत आहे. यावेळी सिवनी,सिहोर, डोंगरगड, इतवारी, चांदा किल्ला आणि आमगाव आदी रेल्वे स्थानकांच्या नव्या रुपड्यांचे उद्घाटन होणार आहे.

जुनी स्थानके आधीच्या लोकसंख्येनुसार बांधली होती आता प्रवासी संख्या वाढल्याने पार्किंगची गैरसोय ही स्थानके चांगल्याप्रकारे विकसित केले आहे. प्रवेश-निर्गमन दरवाजे, रुंद रस्ते, दुचाकी पार्किंग आणि वाहतूक नियंत्रण प्रणालीने सुसज्ज आहे.

या रेल्वे स्थानकांना प्रवाशांसाठी अनुकूल केंद्र म्हणून विकसित केले गेले आहे.या महत्त्वाकांक्षी स्थानकांचा पुनर्विकास 'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत झाला आहे.

आमगाव रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास - अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ७.१७ कोटी रुपयांमध्ये झाला आहे. आमगाव रेल्वे स्थानकाला आधुनिक आणि नवे रूप देण्यात आले आहे.

आमगाव रेल्वे स्थानक - विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील आमगाव एक शहर आहे. आमगाव स्टेशन गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून २४ किमी पूर्वेला आहे. स्थानिक आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

Orchha Railway Station- या स्थानकांच्या सुशोभीकरणात स्थानिक संस्कृती आणि समृद्ध वारसा देण्यात आला आहे. ही स्थानके आकर्षक केंद्र बनली आहेत. जेथे प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच, रोजगार वाढीची मोठी संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे स्थानिकांना फायदा होणार आहे.

लासलगाव रेल्वे स्थानक - प्रवाशांच्या मागणी आणि सोय ध्यानात घेऊन, भारतीय रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. दक्षिण मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विकासासाठी वचनबद्ध आहे.