14 वर्षांपूर्वीचं 3 मिनिट 54 सेकंदाचं वादग्रस्त गाणं, ज्यामुळे झालेला प्रचंड वाद, लोक लपून लपून बघायचे
बॉलिवूडमधील ते 3 मिनिट 54 सेकंदाचं गाणं जे सापडले होते प्रचंड वादात. मात्र, याच गाण्याने 14 वर्षांपूर्वी मोडले होते अनेक रेकॉर्ड. लोक लपून लपून बघायचे.

विद्या बालन तिच्या अभिनय, आत्मविश्वास आणि प्रत्येक भूमिकेमुळे गेल्या 20 वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. आज 46 वर्षांची असलेली विद्या बालन बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

विद्या बालन प्रत्येक भूमिकेत इतकी फिट बसते की, तिच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. मात्र आज आपण तिच्या करिअरमधील अशाच एका वादग्रस्त गाण्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने रिलीजच्या वेळी प्रचंड गदारोळ उडवला होता.

विद्या बालन आणि दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं 2011 मध्ये आलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात विद्यासोबत इमरान हाशमी आणि तुषार कपूर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

यामधील 3 मिनिट 54 सेकंदांचा ते गाजलेलं गाणं ‘ऊ ला ला’ सर्वाधिक चर्चेत राहिलं. या गाण्याचे बोल, विद्या बालनचा बोल्ड डान्स आणि तिचा आत्मविश्वास यामुळे हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्याला बप्पी लहरी आणि श्रेया घोषाल यांनी आवाज दिला होता.

‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट अवघ्या 18 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र या चित्रपटाने जगभरात 117 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. या यशामध्ये विद्या बालनच्या दमदार अभिनयाचा सिंहाचा वाटा होता.