रेल्वे इंजिनवर शूट झालेलं सुपरहिट गाणं, 49 वर्षांनंतरही प्रत्येकजण वेळ काढून ऐकतो
49 वर्षांपूर्वीचं गाणं जे संपूर्ण रेल्वेच्या इंजिनवर केलं शूट. गुलजार यांच्या शब्द आणि आरडी बर्मन यांचा आवाजामुळे बनले सुपरहिट. आजही ते गाणं प्रचंड ऐकतात लोक.

बॉलिवूडमध्ये दरवर्षी शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात आणि हजारो गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र प्रत्येक चित्रपट किंवा प्रत्येक गाणं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेलच असे नाही. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत पण त्यातील एखादे गाणं काळाच्या कसोटीवर उतरून अजरामर ठरते.

अशाच एका चित्रपटाची आजही आवर्जून आठवण काढली जाते. तब्बल 57 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'किताब' या चित्रपटाने व्यावसायिकदृष्ट्या विशेष यश मिळवले नाही. मात्र या चित्रपटातील 'धन्नों की आँखों में है रात का सुरमा' हे गाणं आजही संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरते.

चित्रपटाची कथा एका लहान मुलाभोवती फिरते. शिक्षणासाठी त्याला आपल्या बहिणीकडे शहरात पाठवले जाते. मात्र अभ्यासात त्याचे मन लागत नाही. त्यामुळे त्याला वारंवार रागावले जाते. अभ्यासाचा कंटाळा आल्यामुळे तो गावाकडे परत जाण्याचा प्रयत्न करतो.

मात्र प्रवासादरम्यान काही अनपेक्षित घटना घडतात आणि त्यानंतर तो पुन्हा शहरात परततो. अखेरीस मन लावून शिक्षण घेण्याचा निर्धार करत त्याच्या आयुष्याला नवे वळण मिळते.

आज अनेक दशकांनंतरही 'धन्नों की आँखों में है रात का सुरमा' हे गाणं ऐकताना जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीची आठवण ताजी होते. 'किताब' हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला नसला, तरी त्यातील संगीत आणि गाणी आजही चर्चेत आहेत.