या 5 वेब सीरिज कुटुंबासोबत न पाहिलेल्याच बऱ्या, 3 नंबरची तर प्रचंड खतरनाक

सध्या OTT वर मोठ्या प्रमाणात बोल्ड आणि रोमँटिक वेब सीरिज पाहिल्या जात आहेत. अशातच आम्ही तुम्हाला अशा पाच सीरिजबद्दल सांगणार आहोत ज्या एकट्यानेच बघणे ठरेल फायदेशीर.

| Updated on: Jun 02, 2026 | 10:54 AM
1 / 6
डिजिटल युगात OTT प्लॅटफॉर्म्सने मनोरंजनाची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकली आहे. पारंपरिक चित्रपट आणि टीव्हीपेक्षा वेगळ्या विषयांवर आधारित कथा, वास्तववादी मांडणी आणि प्रौढ प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आलेले आशय यामुळे OTT वरील वेब सीरिज मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत.

डिजिटल युगात OTT प्लॅटफॉर्म्सने मनोरंजनाची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकली आहे. पारंपरिक चित्रपट आणि टीव्हीपेक्षा वेगळ्या विषयांवर आधारित कथा, वास्तववादी मांडणी आणि प्रौढ प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आलेले आशय यामुळे OTT वरील वेब सीरिज मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत.

2 / 6

नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज ही वेब सीरिज भारतीय OTT विश्वातील चर्चित सीरिजपैकी एक मानली जाते. आधुनिक नातेसंबंध, वैवाहिक आयुष्य आणि वैयक्तिक भावविश्वाचे चित्रण यामध्ये करण्यात आले आहे.

3 / 6

अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील फोर मोर शॉट्स प्लीज ही सीरिज चार मैत्रिणींच्या आयुष्याभोवती फिरते. करिअर, मैत्री, प्रेमसंबंध आणि वैयक्तिक संघर्ष यांचा वेध घेणारी ही कथा शहरी जीवनशैलीचे वास्तववादी चित्रण करते.

4 / 6

भारतीय OTT इतिहासातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सीरिजपैकी सेक्रेड गेम्स ही एक आहे. या सीरिजमध्ये गुन्हेगारी, राजकारण आणि सत्तासंघर्ष यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. थरारक कथानकासोबत काही धाडसी सीनमुळेही ही सीरिज चर्चेत राहिली होती.

5 / 6

मूळ बंगाली भाषेतील चरित्रहीन ही वेब सीरिज नातेसंबंध आणि मानवी भावनांच्या गुंतागुंतीवर आधारित आहे. आधुनिक शैलीत सादर करण्यात आलेल्या या मालिकेत प्रेम, विश्वासघात आणि रहस्य यांचे मिश्रण पाहायला मिळते. हिंदी डब आवृत्तीमुळेही तिला मोठी लोकप्रियता मिळाली.

6 / 6

शी ही सीरिज एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी ती गुप्त मोहिमेवर जाते आणि त्या प्रवासात तिच्या आयुष्यात अनेक बदल घडतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us