
शिल्पा शेट्टी हिची लहान बहीण शमिता शेट्टी ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी शमिता शेट्टी ही बिग बाॅसमध्येही सहभागी झाली. बिग बाॅसमध्ये धमाकेदार गेम खेळताना शमिता दिसली.

शमिता शेट्टी हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत एकून नऊ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मात्र, तिचे जवळपास सर्वच चित्रपट फ्लाॅप जाताना दिसले.

शमिता शेट्टी हिचे वय 44 आहे. मात्र, शमिता शेट्टी हिने अजूनही लग्न केले नाहीये. अनेक अभिनेत्यांसोबत शमिता शेट्टी हिचे नावे जोडले गेले.

शमिता शेट्टी ही मनोज वाजपेयी याच्यासोबत रिलेशनमध्ये होती. मात्र, त्याच्यासोबत लग्न होऊ न शकल्याने ती अजूनही सिंगल असल्याचे सांगितले जाते.

राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्यामध्येही काही दिवस अफेअर होते. मात्र, बिग बाॅसच्या घरातून बाहेर आल्यानंतर हे नाते फार काळ टिकू शकले नाही.