AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs ZIM : कोण आहे हा 6 फुटी 8 इंच उंचीचा क्रिकेटर? ज्याने टी20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला गुडघ्यावर आणलं

AUS vs ZIM : टी20 वर्ल्ड कप 2026 सुरु झाल्यापासून आज पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली. कोणी कल्पना केली नव्हती ते घडलं. बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दुबळ्या झिम्बाब्वे सारख्या टीमने पराभव केला. ही किमया ज्याच्यामुळे शक्य झाली, तो गोलंदाज कोण?

AUS vs ZIM : कोण आहे हा 6 फुटी 8 इंच उंचीचा क्रिकेटर? ज्याने टी20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला गुडघ्यावर आणलं
blessing muzarabaniImage Credit source: instagram
| Updated on: Feb 13, 2026 | 4:29 PM
Share

आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आज शुक्रवारी सर्वात मोठ्या धक्कादायक निकालाची नोंद झाली. झिम्बाब्वे सारख्या दुबळ्या संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. या निकालाबद्दल ऐकल्यानंतर कोणालाचा विश्वास बसत नाहीय. हे कसं होऊ शकतं? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानी या विजयाचा हिरो ठरला. त्याने आपल्या घातक गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियन टीमचं कंबरडं मोडलं. 6 फूट 8 इंच उंचीच्या मुजारबानीने वेगवान गोलंदाजी आणि अचूक टप्पा-दिशा याच्या बळावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खेळपट्टीवर टिकूच दिलं नाही. मॅचची दिशा झिम्बाब्वेच्या बाजून वळवली.

वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानीने 4 ओव्हर्समध्ये 17 धावा देऊन 4 विकेट काढले. या फॉर्मेटमधील त्याचं हे उत्तम प्रदर्शन आहे. त्याने जोश इंगलिस, टिम डेविड, मॅथ्यू रेनशॉ आणि एडम जाम्पा यांचे विकेट काढले. या शानदार परफॉर्मन्ससाठी मुजारबानीची प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारासाठी निवड झाली. मुजारबानीचा झिम्बाब्वे क्रिकेटच्या दमदार गोलंदाजांमध्ये समावेश होतो. उसळी घेणारे चेंडू टाकणं आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी ही त्याची खासियत आहे. टेस्ट, वनडे आणि टी20 तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने झिम्बाब्वेसाठी नेहमीच चांगली कामगिरी केलीय.

आयपीएलमध्ये किती लाखात विकत घेतलेलं?

ब्लेसिंग मुजारबानी आयपीएल फ्रेंचायजींच्या नजरेत आलाय. आयपीएलच्या मागच्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लुंगी एनगिडीची रिप्लेसमेंट म्हणून मुजारबानीला 75 लाख रुपयात विकत घेतलं होतं. मुजारबानीला त्या सीजनमध्ये संधी मिळाली नाही.

ब्लेसिंग मुजारबानीने कधी डेब्यू केला?

ब्लेसिंग मुजारबानीने जगभरातील टी20 लीग्समध्ये खेळून अनुभव कमावलाय. फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये मुजाबानीने दमदार प्रदर्शन करुन ग्लोबल लेव्हलवर ओळख बनवलीय. आज ऑस्ट्रेलिया सारख्या टीम विरुद्ध त्याला त्याचा हा अनुभव कामी आला. मुजारबानीने 2017 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता.

त्याच्या नावावर किती विकेट?

ब्लेसिंग मुजारबानी आतापर्यंत झिम्बाब्वेकडून 18 टेस्ट, 57 ODI आणि 85 टी20 इंटरनॅशनल सामने खेळलाय. टेस्ट क्रिकेटमध्ये मुजारबानीने 26.20 च्या सरासरीने 67 विकेट काढले. वनडे इंटरनॅशनलमध्ये त्याच्या नावावर 33.35 च्या एवरेजने 70 विकेट आहेत. टी20 इंटरनॅशनलमध्ये मुजारबानीने 21.08 च्या सरासरीने 7.10 च्या इकोनॉमी रेटने 100 विकेट घेतले आहेत. झिम्बाब्वेने पहिली फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून 169 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 षटकांत 146 धावांवर ऑलआऊट झाला त्यांनी 23 धावांनी विजय मिळवला.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...