Antilia: अँटिलियाच्या शेजारी असलेल्या छोट्या दुकानाचे भाडे किती? आकडा ऐकून थक्क व्हाल
Antilia: मुकेश अंबानी यांचे राहते घर अँटिलिया हे कायमच चर्चेत असते. या लग्झरी घराशेजारी असलेल्या छोट्या दुकानाचे भाडे किती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. अंबानींनकडे 15000 ते 17000 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे बोलले जाते. कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्यामुळे अंबानी कुटुंबिय लग्झरी आयुष्य जगत आहेत. त्यांच्या महागाड्या वस्तूंची नेहमीच चर्चा होते.
अंबानी कुटुंबीय मुंबईतील अँटिलिया या आलिशान आणि लग्झरी घरात राहतात. या घराची कायमच सुरु असते. येथे काम करणाऱ्या कामगारांना देखील लाखो रुपये पगार दिला जातो. जर तुम्ही अँटिलिया परिसरात गेले असाल तर या आलिशान घराच्या शेजारी एक छोटे दुकान आहे.
अँटिलियाच्या शेजारी असलेल्या दुकानाची सध्या चर्चा सुरु आहे. या दुकानाला दरमहिना किती भाडे असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अँटिलिया या घराच्या शेजारच्या दुकानाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. या दुकानाचे भाडे किती आहे? याबाबत माहिती देण्यात आली आहे.
अँटिलियाच्या शेजारी असेलल्या छोट्या दुकानासाठी 5 लाख रुपये दर महिना भाडे आकारले जात असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच